How To Learn Adivasi Pawara Language : नमस्कार मित्रांनो, अगदी सोप्या भाषेत आपण आदिवासी पावरा भाषा शिकणार आहोत. आजच्या या पोस्ट मध्ये आपण बेसिक भाषा शिकण्यासाठी आवश्यक महत्वाचे मुद्यावर चर्चा करणार आहोत. अश्या प्रकारे यापुढील आर्टिकल मध्ये एक एक भाग करून आपण पावरा भाषा शिकणार आहोत .
सर्वांना याच आर्टिकल मध्ये खाली एक दैनंदिन जीवनात लागणारे शब्द मराठी व पावरा अनुवाद ADIVASI ENGLISH TRASLATION नसून ADIVASI LANGUAGE IN MARATHI TRANSLATION प्रदेशानुसार भाषेचे अनुवाद मी करून दिले आहे. तो तक्ता नक्की वाचा . जर तुम्हाला PDF स्वरूपात मराठी व पावरी भाषा अनुवाद शब्द हवे असतील तर ,तेही कमेन्ट मध्ये नक्कीच कळवा .
भाषा शिकायची गरज काय ? How To Learn Adivasi Pawara Language
मित्रांनो ,तुम्हाला खानदेशी भागातील आदिवासी भाषा शिकणे आजच्या काळाची गरज आहे. कारण ही भाषा शिकण्यासाठी तुम्हाला खूप स्रोत ऑनलाइन मिळतील ,परंतु आपला चांगला प्रतिसाद मिळाला तर नक्कीच भविष्यात एक चांगला स्रोत आदिवासी भाषा शिकण्यासाठी मिळवून देईल .
ग्रामीण नोकरदार : ग्रामीण भागातील जि पान नोकरदार वर्ग आहेत त्यांना या आदिवासी भागातील मुलांना शाळेत शिकवण्यासाठी फार अडचणींना सामोरे जावे लागते. कारण आदिवासी भाषा Adivasi Language (पावरा,कोंकणी,भिल ) या बोलीभाषांना स्वतंत्र लिपि नाहीत. त्यामुळे ह्या आदिवासी भाषा पिढ्यानपिढ्या शिकण्यासाठी अवघड वाटते.
ही भाषा शिकण्यासाठी सोपी व्हावी हा माझ्या महत्वाचा उद्देश आहे. ग्रामीण,खेड्यापड्यातील गोरगरीब,लाजरे मुजरे मुलांना आपल्या बोलीभाषेत प्रत्येक आदिवासी भागात नोकरी करणाऱ्याला सोपी वाटावी हा उदेश आहे. शिक्षणतील अडचणी दूर होतील .
दवाखाने : ग्रामीण आदिवासी भागातील ग्रामीण रुग्णालयातील इतर समाजवर्ग कर्मचाऱ्यासाठी दवाखान्यात येणाऱ्या आदिवासी रुग्ण यांच्याशी संवाद करण्यासाठी गरजेची आहे. कारण ट्रीटमेंट करतांना अडचणी येऊ नयेत, चुकीचा उपचार होऊ नये, यासाठी ही भाषा गरजेची आहे.
कारण बऱ्याच आदिवासी समुदाय बांधवांना मराठी किंवा इतर भाषा बोलत किंवा समजत नाही. त्यासाठी ही पावरा आदिवासी भाषा शिकणे यांच्यासाठी फार गरजेचे ठरणार आहे.
शाळा : आदिवासी भागात शिक्षकाची नोकरी करणाऱ्या जवळ जवळ बऱ्याच शिक्षकांना आदिवासी पावरी भाषा समजत नसल्याने ,आणि शिकण्यासाठी स्रोत नसल्याने खूप अडचणींना सामोरे जावे लागते. शिकवत असतांना आदिवासी ग्रामीण भागातून आलेल्या मुलांना कुठलीच भाषा अवगत नसल्याने ,सुरुवात पासूनच संवाद होण्यास शिक्षक व विद्यार्थी यांना अडचण येते.
बरेच शिक्षक यांचे म्हणणे असे असते की,आदिवासी भागातील मुलांना शिकवतांना भाषेची अडचण असल्याचे समजते. ही भाषा शिकण्यासाठी इंटरनेट वर स्रोत नाही. आदिवासी पावरा भाषेची लिपि नाही. त्यामुडे कुठेतरी शिक्षकांना ही भाषा शिकावी अशी इच्छ्या असते.
आदिवासी भाषेचा इतिहास
नमस्कार मित्रांनो,तुम्हाला आदिवासी भाषा शिकायची आहे ( How To Learn Adivasi Pawara Language ). उद्देश काहीही असो परंतु तुम्हाला या आर्टिकल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील खानदेशी पावरा भाषा शिकवणार आहे. अगदी सोप्या पद्धतीने.
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यात एकूण 47 आदिवासी जमाती आहेत. आदिवासी समुदयांची ADIVASI SAMUDAY स्वतःचीच बोलीभाषा आहेत. खानदेशातील धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे पच्शिम महणून ओळखले जातात. आणि प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची संख्या असल्याचे येथे दिसून येते .
महाराष्ट्रातील आदिवासी जमाती पैकी सर्वात जास्त भिल्ल जमातीची संख्या अधिक प्रमात आहे. भिल्ल जमातीच्या समुदायातील लोकांची भिल्ल,किंवा भिल्लॉरी या त्यांच्या बोलीभाषा आहेत. साधारणपणे आदिवासींची भाषा ही त्यांच्या जमातीच्या नावाप्रमाणेच असते. जसे – पावरांची पावरी , भिल्लाची भिल्ल (BHIL TRIBE) , कोकणीची कोंकणी, माठवाडीची तडवी किंवा डोंगरी भिल्ल इ .
आदिवासी जमातीवर Tribal Adivasi काही संशोधकांनी जसे- इरावती कर्वे, गोविंद गरे,आणि विलास सांगावे यांनी आदिवासी भिल्ल जमातीचा विस्तृत अभ्यास केला आहे. 15 व्या शतकात शौरसेनी प्राकृत अपब्रमश्या पासून अनेक भाषा विकसित झाल्या. त्यापइकीच भिल्ल यांचे मोठे योगदान आहे. ज्या भौगोलिक प्रदेशात ते बोलले जातात त्या प्रदेश प्रभाव प्रत्येक बोलीभाषेवर प्रभाव झालेला दिसून येतो.
महाराष्ट्रात उत्तरेकडे , मद्यप्रदेश , राजस्थान,पर्व गुजरात मध्ये भिल्ल वस्त्या ,आणि पावरा वस्त्या आढळून येतात. अरवली पासून ते सातपुड्यापर्यंत आदिवासी जमाती Original Adivasi पसरलेल्या आहेत. अनेक आदिवासी बोललीभाषा वर आर्य भाषेचा प्रभाव आहे. भिल्ल ही बोलीभाषा मारती भाषेची उपभाषा आहे.
म्हणूनच मराठी भिल्ल , गुजराती भिल्ल,खानदेशी भिल्ल, खानदेशी पावरा Adiwasi Language असे वर्गीकरण दिसू येते.
पावरा भाषेचे विविध प्रदेशात वेगवेगळ्या बोलीभाषेचा प्रभाव झालेला दिसून येतो – Adivasi tribe language in maharashtra
पावरा समाज ही भिल्ल ची प्रमुख शाखा मानली जाते. म्हणूनच पावरा जमातला पावरा-भिल्ल असेही म्हणतात. गुजरात मधील “पावागढ “ हे पावरा जमातीचे मुळ ठिकाण असल्याचे कळते.
- पावरा जमात नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी /धडगाव ,शहादा , तळोदा तालुक्यात आढळते.
- धुळे जिल्ह्यात -शिरपूर
- व जळगाव जिल्ह्यात रावेर , यावल , चोपडा तालुक्यात आढळते.
- जळगाव जिल्ह्यात- बारेला -पावरा म्हणून ओळखली जाते .
- बुलडाणा जिल्ह्यात -जमोड ,संग्रामपूर तालुका
- अमरावती जिल्ह्यात – धारणी तालुका तुरळक आहे .
- शहादा – पावरी भाषा
- तळोदा – पावरी भाषा
- शिरपूर – पावरी, पाली व निंबाडी भाषा
- धडगाव – पावरी भाषा
- सेंधवा – निंबाडी ,पाली भाषा
- पानसेमल – पावरी व निंबाडी
- नंदुरबार – पावरी
- खंडवा –
- बडवानी –
मित्रांनो! आदिवासी पावरा भाषा ( How To Learn Adivasi Pawara Language )शिकण्यासाठी आपल्याला शब्द संग्रह असणे आवश्यक आहे. कुठलीही भाषा शिकण्याआधी आपल्याकडे पुरेसा शब्द साठा असणे गरजेचे आहे. पावरा बोलीभाषा शब्दसंग्रह मी तुम्हाला या आजच्या आर्टिकल मधून देण्याचा प्रयत्न करत आहे. जर तुम्हाला उपयोगी पडला तर शेवटी नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा . शिवाय आपल्या पावरा बोली भाषा What Language Adivasi Speak विषयी अडचणी असल्यास नक्कीच शेअर करा . चला तर आता पुढे वाचूया –
आपण सर्वात आधी मराठी आणि पावरी बोलीभाषा यांच्यात नेहमी मराठीत उच्चारली जाणारी शब्द यांची नावे जाणून घेऊयात –
सर्वनाम तक्ता – How To Learn Adivasi Pawara Language
मराठी मध्ये नेहमी उच्चारले जाणारे शब्द | शहादा | शिरपूर | धडगाव/ अक्राणी | बडवानी | निंबाडी भाषा |
मी | मी | मी | मी | मी ,हूं | में |
तो | च्यु | च्यु | च्यु | च्यु | च्यु |
ती | ची | ची | ची | ची | ची |
ते | च्या | च्या | च्या | च्या | च्या |
तू | तू..ने | तू..ने | तू..ने | तू..ने | तुसेक |
हा | यू | यू | यू | यू | यू |
ही | यी | यी | यी | यी | यी |
हे | या | या | या | या | या |
माझा | मारू | मारू | मारू | मारू | मारू |
माझी | मारी | मारी | मारी | मारी | मारी |
माझे | मारा | मारा | मारा | मारा | मारा |
बोलणे | बुलतलू | बुलतलू | बुलतलू | ||
सांगतो /सांगते | कोयतलू /कोयतली | कोयतलू /कोयतली | कोयतलू /कोयतली | कोहतलू /कोहतली | कोहतेलू/कोहतली |
मला | मेहे | मेहे | मेहे | मेसेक | मेशेक |
आहे | से | से | से | से | शे |
मुलगा | सुरा ,सुरा (अनेक वचन ) | सुरा ,सुरा (अनेक वचन ) | सुरा ,सुरा (अनेक वचन ) | पुऱ्यू | पुऱ्यू |
मुलगी | सूरी | सूरी | सूरी | पुराय | पुराय |
स्त्री | बायोर , बायरा -अनेकवचन | बायोर , बायरा -अनेकवचन | बायोर , बायरा -अनेकवचन | बायरो | बायरो |
पुरुष | माणूह , माणहे – अनेकवचन | माणूह , माणहे – अनेकवचन | माणूह , माणहे – अनेकवचन | माणुश | माणुश |
नवरा | जवायलू | जवायलू | जवायलू | पाहनू ,लाडू | पाहनू ,लाडू |
नवरी | लाडी | लाडी | लाडी | लाडी | लाडी |
सर्वनाम चा वापर करून वाक्य बनवणे | How To Learn Adivasi Pawara Language
उदा –
- मला पुस्तक दे. – मेहे पुस्तक लाव /आप .
- तो मराठी भाषा बोलतो . – च्यु मोराठी भाषा भूलतेलू .
- ही माझी मुलगी आहे. – यी मारी सूरी/पुराय से.
- हा माझ्या मुलगा आहे.- यू मारू सुरू/पुऱ्यू से .
- ही माझी बायको आहे . – यी मारी लाडी से .
- तुझे नाव काय आहे ? – तार नाव काय से.
- तुझे गाव कोणते ? तारो गाव काल्लो से .
- तु कोणत्या गावाची आहे ? तु काल्ला गावोन से .
वस्तूवाचक शब्द – How To Learn Adivasi Pawara Language
कपडे | लुगडा | लुगडा | लुगडा | चिंदरा | चिंदरा |
घर | घोर | घोर | घोर | घोर | घोर |
जेवण | रुटू | रुटू | रुटू | रुटू | रुटू |
इकडे ये | उरी /ऊरु आव | उरी /ऊरु आव | वेघी हे | इनखुर आव ओशे | इनखुर आव ओशे |
आण | लाव | लाव | लाव | लाव | लाव |
चप्पल | चाट्या | चाट्या | चाट्या | ||
बूट | खाहळा | खाहळा | खाहळा | ||
पिशवी /बॅग | थोयलू | थोयलू | खुतलू | ||
झाडू | बारी | बारी | बारी | बारी | बारी |
दरवाजा | जुपू | जुपू | जुपू | जुपू | जुपू |
बाथरूम | मुरी | मुरी | मुरी | मुरी | मुरी |
हँडपंप | पोम्पो | पोम्पो | पोम्पो | पोम्पो | पोम्पो |
सूर्य उगवणे | दिह उघ्यू | दिह उघ्यू | दिह उघ्यू | दिस उघ्यू | दिस उघ्यू |
सूर्य मावळणे | दिह जाणे | दिह जाणे | दिह जाणे | दिस बुटघ्यू | दिस बुटघ्यू |
पॅन्ट | चोड्डो | चोड्डो | चोड्डो | ||
शर्ट | डोगलो | डोगलो | डोगलो | ||
भाजी | उलोण | उलोण | उलोण | ||
ताट | थाट | थाट | थाट | थावी | थावी |
खाट | खाटलू | खाटलू | खाटलू | खाटलू | खाटलू |
भांडे | रासे /बासणे | रासे /बासणे | बासणे | टाहरा | टाहरा |
क्रियावाचक शब्द – How To Learn Adivasi Pawara Language
- बसणे – बोहने
- जेवणे – खानेह
- येणे – आवणे
- करणे – कोर
- चालवणे – चालाडणे
- रडणे – रोडणे
- झाडणे – बारणे
- भरणे – भोरने
- फेकणे – नाखणे
- ओढणे – आपोकने
- हसणे – आहणे
- रूसणे – खोतायणे
- रागावणे – जुलणे
- खेळणे – खेलणे
- झोपणे – हुवणे
- लिहणे – लेखणे /लिखने
- वाचणे – वाचने
- नाचणे – नाचने
- वाकणे – वाका वोवणे
- धुणे – धूवनेह
- तोडणे – तुडनेह
निष्कर्ष :
सर्व आर्टिकल वाचून झाल्यावर मला अशा आहे की, आपल्याला बऱ्याच पैकी How To Learn Adivasi Pawara Language कशी शिकायची समजले असेल आणि आनंदही झाला असेल. अजून यापुढील भाग वर पोस्ट येणार आहेत . ते नक्की वाचा . या आर्टिकल बद्दल काही शंका असतील किंवा ही माहिती आपल्याला उपयोगी वाटली की नाही ते मला खाली कोममएन्ट मध्ये नक्की सांगावे .