Anganwadi Supervisor Exam Marathi | अंगणवाडी मुख्यसेविका | अंगणवाडी पर्यवेक्षिका

Anganwadi Supervisor Vacancy | icds supervisor : अंगणवाडी सूपरवायजर साठी कुठे अर्ज करावे? , वय , अभ्यासक्रम , एक्झॅम कशी पास करावी याबाबत ची संपूर्ण माहिती आपण या शैक्षणिक संकेतस्थळ वर आजच्या लेखात घेणार आहोत . anganwadi supervisor पदालाच , icds supervisor ,अंगणवाडी पर्यवेक्षिका व अंगणवाडी मुख्य सेविका देखील म्हणतात . याबाबत कोणाचाही गोंधळ होता कामा नये .

icds anganwadi supervisor हे पद जिल्हा परिषद द्वारा सरलसेवा भरती मार्फत भरले जाते. हे anganwadi supervisor हे पद फक्त महिला उमेदवारसाठी असते . त्यामुळे महिलासाठी ही सुवर्णसंधी असू शकते . एक चांगल्या पगारची नोकरी शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात .

icds supervisor study material

महिलांसाठी योग्य नोकरी अंगणवाडी सूपरवायजर हीच असू शकते असे माझे वैयक्तिक मत आहे . या पद बाबतची संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहेत आणि तयारी देखील कशी करावी ? हेही सांगणार आहे . अंगणवाडी सूपरवायजर ही पोस्ट / पद एकात्मिक बाल विकास विभाग अंतर्गत राज्य आणि केंद्र स्तरावरती राबविण्यात येते .

Anganwadi supervisor syllabus

अंगणवाडी सूपरवायजर चा अभ्यासक्रम आपण पाहणार आहोत सविस्तर –

विषय प्रश्न गुण संख्या काठिन्य पातळी माध्यम
मराठी व्याकरण 25 50 गुण बारावी मराठी
इंग्रजी व्याकरण 25 50 गुण पदवी इंग्रजी
अंकगणित व बुद्धिमत्ता 25 50 गुण पदवी मराठी व इंग्रजी
सामान्य ज्ञान 25 50 गुण पदवी मराठी व इंग्रजी
एकूण 100 प्रश्न 200 गुण पदवी मराठी व इंग्रजी

अंगणवाडी सूपरवायजर साठी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण , अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी , सामान्य ज्ञान आणि महिला व बालक विषयी योजना व कायदे इत्यादि विषय असतात . त्यांचा आपण प्रत्येक विषयाचा सविस्तर अभ्यासक्रम बघणार आहोत .

सदर पदासाठी होणारी परीक्षा ही एकूण 200 गुणसाठी असते . त्या मध्ये एकूण प्रश्न संख्या 100 असते . विषय चार असतात. (सामान्य ज्ञान, मराठी, अंकगणित,बुद्धिमत्ता चाचणी ) प्रत्येक प्रश्न हा 2 मार्कसाठी असतो .

मैत्रिणींनो, या पदासाठी होणाऱ्या परीक्षेत आपल्याला सर्व विषय हे पदवी स्तरानुसार प्रश्नांची काठिन्य पाठली असते . परंतु इतर परीक्षेपेक्षा वेगळा फरक या परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयात फरक दिसून येतो .

अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदाची परीक्षा ही आत्ता ऑनलाइन घेण्यात येते . आधी ऑफलाइन हॉट होती . ऑनलाइन परीक्षेत TCS कंपनी परीक्षा घेत असते . आता आपण एक एक विषयाचे मुद्देसुद अभ्यासक्रम कश्या प्रकारे येतो त्यावर चर्चा करूया –

मराठी व्याकरण

अंगणवाडी सूपरवायजर पदाचा विचार केला तर परीक्षेत मराठी व्याकरणावर हमखास मार्क जे तुमचे हक्काचे आहेत ते टॉपिक म्हणजे – समानार्थी शब्द ,विरुधरथी शब्द , शब्द समूह व म्हणी हे टॉपिक आहेत यांचे आताचे प्रश्न पत्रिका स्वरूप बदल दिसून येत कारण आता TCS/IBPS पॅटर्न नुसार तुम्हाला उतार दिला जातो . उताऱ्याचे वचन करून तुम्हाला त्यावर 5 प्रश्न वरील टॉपिक वर विचारण्यात येतात . म्हणजे 10 मार्कसाठी तुमचे प्रश्न पक्के होतात .

  • समानार्थी शब्द
  • विरुद्धरथी शब्द
  • शब्द समूहाबद्दल एक शब्द
  • म्हणी ,वाक्यप्राचार
  • अलंकार व वृत्ते
  • शब्दाचे प्रकार
  • रस व त्यांचे प्रकार
  • प्रयोग
  • विभक्ती
  • सकर्मक व अकर्मक क्रियापदे
  • शब्दांच्या जाती
  • वाक्य व वाक्यांचे प्रकार
  • काळ व त्यांचे प्रकार
  • शुद्ध शब्द, जोडशब्द
  • वेगळा शब्द

अंकगणित व बुद्धिमत्ता

सर्वांना अवघड जाणारा विषय म्हणजे गणित होय , बरोबर ना ! काही हरकत नाही . गणीतला सोपं करून कसं कसा अभ्यास करावा तर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका परीक्षेत आपला स्कॉर वाढवू शकता ते सांगते .

बघा, या परीक्षेत फक्त अंकगणित वरील प्रश्न विचारण्यात येतात , मग जास्त ताण घ्यायचा नाही . फक्त बेसिक गणित तर आपल्याला येते असे मी मानते. 2 ते 30 पर्यन्त पाढे तर पाठच असतात आपले . शिवाय 1 ते 10 पर्यन्त घन व घनमूळ , 1 ते 20 वर्ग आणि वर्गमूळ हे तूमचे पाठ असेल तर अगदी चांगल्या मार्क नि पास होऊ शकता , हा माझ्या विश्वास आहे .

त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी साठी आपण आपला प्रश्न सोडविण्याचा जास्तीती जास्त सराव केला पाहिजे प्रश्न चा . कारण TCS ने फार वेळखाऊ असे प्रश्न विचारलेले आहेत .

TCS नुसार सर्व प्रश्न 3 वेळ तरी आपले रिवीजन झाले पाहिजे . तरच वेळेचे नियोजन करता येणार आहे . कारण परीक्षेत वेळेला फार महत्व आहे मित्रांनो. जर तुम्हाळला दुसऱ्या विषयात कितीही प्रश्न बरोबर आले तरी स्कॉर फक्त याच विषयात असतो बाकी सर्व विषय सर्वांचे सारखेच असतात .

त्यानंतर आता खाली काही गणिताचे मुद्दे दिले आहेत त्याचा अभ्यास करा . चांगले मार्क पडतील .

सामान्य ज्ञान

सामान्य विज्ञान या विषयात इतर परीक्षेच्या प्रमाणात वेगळे प्रश्न असतात . म्हणून जास्त करून महिलांना काय अभ्यास करावा हेच समजत नाही, प्रश्न कसे असतील ? असे बरेच काही प्रश्न पडतात .

जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर माझ्या B ला विजिट करू शकता . तिथे संपूर्ण माहिती मी दिलेली आहे . MH GOVERNMENT JOB हे माझ्या चॅनल चे नाव आहे . या वर सर्व अंगणवाडी सूपरवायजर संबंधित माहिती मी देत असते .

शिवाय जर तुम्हाला अंगणवाडी सामान्य ज्ञान संबंधित संपूर्ण माहिती मार्गदर्शिका EBOOK घ्यायची असेल तर मला 7770060733 या नंबर वर MASSAGE करा फक्त 79 रुपयात मिळून जाईल .

तुमचे मेरिट वाढविण्यास सामान्य ज्ञान हा विषय महत्वाचा ठरू शकतो .

अंगणवाडी सूपरवायजर किंवा अंगणवाडी पर्यवेक्षिका ( anganwadi icds ) साठी सामान्य ज्ञान विषयात खालील महत्वाचे घटक वर प्रश्न विचारले जातात ते घटक आपण अभ्यासणार आहोत –

  • बालक आणि महिला यांच्या आहार संबंधित प्रश्न विचारले जातात
  • शासनाने राबविलेले सर्व योजना व विविध कायदे यावर प्रश्न .
  • बालक व महिला यावर आधारित आजार संबंधित प्रश्न
  • सरकारच्या महत्वाच्या संघटना व धोरणे ,तरतुदी आणि महत्वाचे महिला व बालक संबंधित कायदे यावर प्रश्न असतात .
  • तसेच चालू घडामोडी देखील मिळतात .

वरील सर्व टॉपिक चा अभ्यास करून EBOOK तयार केली आहे . त्यामध्ये वरील सर्व मुद्दे सुद माहिती आहे . ती तुम्ही विकत घेऊ शकता .

मला या परीक्षेचा 8 वर्षाचा अनुभव आहे . तसेच ही सर्व माहिती प्रश्नपत्रिका विश्लेषण करून आपल्यासाठी तयार करण्यात आली आहे .

इंग्रजी व्याकरण

इंग्रजी व्याकरण मधील सर्वच टॉपिक करणे गरजेचे आहे . शिवाय VOCABULARY विशेष अभ्यास करणे .

what is anganwadi supervisor

अंगणवाडी सूपरवायजर म्हणजे अंगणवाडी केंद्राचे सर्व व्यवस्थापन आणि देखरेख करण्याची महत्वाची जबाबदारी किंवा काम असते असे म्हणत येईल . अंगणवाडी पर्यवेक्षक हे बालविकास प्रकल्प अंतर्गतकार्य करत असतात . या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीला अंगणवाडी सेविका , अंगणवाडी मदतनीस, त्यांचे प्रशिक्षण, अंगणवाडी मध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे, तसेच केंद्रामध्ये पोषण व शिक्षणाच्या सर्व योजनाची अमलबजावणी करणे अशा जबाबदऱ्या असतात .

How To Become Anganwadi Supervisor

अंगणवाडी सूपरवायजर होण्यासाठी खालील निकष टप्पे पूर्ण करावे लागतात . अंगणवाडी सूपरवायजर साठी तो प्रकारे भरती प्रक्रिया आपण देऊ शकता 1) अंतर्गत भरती प्रक्रिया 2) सरळ सेवा भरती प्रक्रिया या दोन्ही प्रक्रियेतील फरक पाहूया –

अंतर्गत भरती प्रक्रिया (icds supervisor vacancy ) : अंतर्गत भरतीने अंगणवाडी पर्यवेक्षिका होण्यासाठी संबंधित महिला उमेदवार ही किमान पदवी शिक्षण पूर्ण केलेली असावी सोबतच त्या महिलेने अंगणवाडी सेविका या पदावर काम केल्याचा 10 वर्ष अनुभव असणे गरजेचे आहे . हे उमेदवार सरळ सेवा भरती द्वारे सुद्धा परीक्षा देऊ शकता .

अंगणवाडी सूपरवायजर या पदासाठी अंतर्गत भरती मार्फत अर्ज करणारी महहिला उमेदवार ही त्याच जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका पदासाठी अर्ज सदर करू शकते जिथे ती महिला अंगणवाडी सेविका म्हणून काम करत असेल तेथे . संगणक ज्ञान असणे आवश्यक .

जर महिला उमेदवार समाजशास्त्र /गृहविज्ञान/बालविकास/आहार पोषण या विषया मधून पदवी शिक्षण पूर्ण केलेले असल्यास त्या महिलेस निवंड प्रक्रिया वेळी प्राधान्य देण्यात येते .

  • शैक्षणिक पात्रता आवश्यक : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी शिक्षण पूर्ण केलेली असावी .
  • वय मर्यादा पूर्ण करावी : उमेदवाराचे वय हे 18 वर्ष ते 35 वर्ष पर्यन्त असते . परंतु आरक्षित वर्गासाठी वयात नियमानुसार सूट असते .
  • भरती प्रक्रिया सहभाग : भरती प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागते . त्यासाठी राज्य सरकार किंवा महिला व बालविकास विभाग तर्फे (WCD ) सरळसेवा जिल्हा परिषद मार्फत लेखी परीक्षा घेतली जाते . परीक्षेत सामान्य ज्ञान, गणित, बुद्धिमत्ता चाचणी , मराठी व्याकरण , तसेच महिलचे व बाळकांचे कायदे यावर आधारित प्रश्न येतात .
  • कामाचा अनुभव असावा : प्रत्येक राज्यासाठी वेगळा नियम आहे . काही राज्यामध्ये अंगणवाडी मदतनीस पदाचा अनुभव हवा असतो . महाराष्ट्रात तशी अट नाही .
  • तयारी कशी करावी ? तयारी करत असतांना सर्वात आधी जाहिरात आल्यानंतर अभ्यासक्रम समजून घेणे फार महत्वाचे आहे. सर्वात पहिली पायरी आपली anganwadi supervisor syllabus असायला हवा . तसेच मागील वर्ष च्या प्रश्न पत्रिका तपासून पहा . व नीट अभ्यासा . तयारी करतांना अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे योग्य मार्गदर्शक असायला हवा . जसे – Youtube वरील Tutors , COURCES
  • अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे : जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज भरावा . आणि आवश्यक योग्य माहिती भरावी .
  • महत्वाची कागदपत्रे असावीत : भरती साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे वेळेवर तयार करून ठेवणे गरजेचे आहे . कागदपत्रे कोणती लागतात त्याची पुढे माहिती पाहुयात
  • जाहिराती आल्यास फॉर्म भरणे ( anganwadi supervisor online apply ) : ऑनलाइन संकेतस्थळ आणि वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्धीची ची वेळोवेळी अपडेट राहणे .

हेही वाचा :

DTED COURSE म्हणजे काय ? वाचा

what is age limit of anganwadi supervisor

साधारणतः अंगणवाडी सूपरवायजर पदासाठी वयात 2019 या वर्षीची परीक्षा मध्ये सूट देण्यात आलेली होती. म्हणजे वयात वाढ करण्यात आलेली होती . त्यानुसार आता आपण वयात कसा बदल आहे त्याची सविस्तर माहिती पाहणार आहोत –

  • साधारण उमेदवार : 18 ते 35 वर्ष वय हवे
  • ST/SC/NT उमेदवार : 18 ते 38 वर्ष वय हवे
  • OBC उमेदवार : 18 ते 43 वर्ष वय हवे
  • EWS उमेदवार : 18 ते 43 वर्ष वय हवे
  • अपंग / प्रकल्पग्रस्त / स्वातंत्र्य सैनिक उमेदवार : 18 ते 55 वर्ष वय हवे
  • अंशकालीन कर्मचारी : 18 ते 55 वर्ष वय हवे

what is the salary of anganwadi supervisor

अंगणवाडी पर्यवेक्षिका /सूपरवायजर/मुख्य सेविका या पदासाठी खूप चांगला पगार दिला जातो . महिला वर्गासाठी ही एक चांगल्या पदारची नोकरीची संधी असू शकते . फक्त महिला उमेदवारच अर्ज करू शकता .

अंगणवाडी सूपरवायजर ला 9300 – 34800 ग्रेड वेतन = 4100 इतका पगार असतो

मुख्यसेविका कार्य व जबाबदऱ्या काय असतात | Mukhya Sevika

  1. अंगणवाडी सेविकांच्या कामाचे पर्यवेक्षक कडून पर्यवेक्षण करणे . नागरी भागातील 25 अंगांवड्यासाठी एक मुख्यसेविका/पर्यवेक्षिका /सूपरवायजर असेल तसेच तिच्या जबाबदऱ्या पुढील प्रमाणे –
  2. पर्यवेक्षिका संबंधित अंगणवाडी सेविकासह अंगणवाडी चे कार्यक्रम आखणे . व समस्या निराकरण करणे .
  3. अंगणवाडी सेविकांना कौटुंबिक संपर्क वाढविणे,गृहबहेटी घेणे, गावातील सभा घेणे .
  4. वेळोवेळी सर्व नोंदी ,रजिस्टर, रोख आणि खाती, साठा व साहित्य, तपासणे आणि अंगणवाडी सेविकांना या संदर्भात आवश्यक सूचना आणि मासिक प्रगती अहवाल सदर करण्याची खात्री करून घेणे .
  5. पूरक पोषण आहार कार्यकरण तीन महिन्यातून आणि क्षेत्रीय समस्या आणि त्यांचे निराकरण यावर चर्चा करण्यासाठी ती नियमितपणे तिच्या नियंत्रणाखाली आणि देखरेखीकहाली असलेल्या अंगणवाडी सेविकांशी महिन्यातून किमान एकदा, प्रकल्प मुख्यालयात किंवा तिच्या क्षेत्रीय मुख्यालयात किंवा अंगणवाडी केंद्रावर नियमित बैठका आयोजित करणे .

1 thought on “Anganwadi Supervisor Exam Marathi | अंगणवाडी मुख्यसेविका | अंगणवाडी पर्यवेक्षिका”

Leave a Comment