Shasan Nirnay About Anukamp Teacher: शासन निर्णय 2 सप्टेंबर 2024 मध्ये शिक्षकांना TET शिक्षक पात्रता परीक्षा 3वर्षात उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
शासन निर्णय : प्राथमिक शिक्षक पदावरील अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य करणेबाबत.
प्रस्तावना :Shasan Nirnay About Anukamp Teacher
केंद्र शासनाने दिनांक 31 .03. 2010 च्या अधिसूचनेदवारे शिक्षक पदावर नियुक्तीसाठी पात्रता व सेवाशर्ती ठरविण्यासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांना शैक्षणिक प्राधिकरण म्हणून घोषित केले आहे. राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने दिनांक 23 यगुस्त ,2010 च्या अधिसूचनेदवारे प्राथमिक शिक्षकांकरीता (इ .5 वी ते 8 वी ) किमान शैक्षणिक व यावसईक अहर्ता निश्चित केली असून ,
शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य केली आहे. त्या अनुषंगाने राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक 13.02. 2013 व शुद्धीपत्रक दिनांक 06. 03. 2013 द्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षकांकरिता शिक्षकाची व्यावसायिक किमान अहर्ता निश्चित केली असून , राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद यांच्या मार्गदर्शक तत्वा नुसार केंद्र शासनाद्वारे घेण्यात येत असलेली केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET ) किंवा TET अनिवार्य करण्यात आलेली आहे.
शान निर्णय दिनांक 20. 01. 2016 अन्वये अनुकंपा तत्वावर Shasan Nirnay About Anukamp Teacher नियुक्त शिक्षण सेवकांना शिक्षक पत्राता परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत घेण्यात आलेला निर्णय राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अहर्तेशी विसंगत आहे. यावस्ताव अनुकंपा तत्वा वरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उतीर्ण होणे आवश्यक असल्या बाबतची तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
CTET बाबतची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी या लिक वर करा – CLICK HERE
शासन निर्णय तरतुदी | Shasan Nirnay About Anukamp Teacher
अनुकंपतत्वा वरील नियुक्त व नव्याने नियुक्त होणाऱ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण होण्याच्या अनुषंगाने पुढीलप्रमाणे तरतुदी करण्यात येत आहेत.
- शासन निर्णय दिनकण 13. 02. 2016 मधील परिच्छेद क्र 3 मधील ” मात्र शिक्षक पात्रता परीक्षा व केंद्रीय भरतिपूर्व निवड परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या अटीं मधून त्यास सवलत राहील ” हा मजकूर वगळण्यात येत आहे.
- शासन निर्णय दिनांक 13/02/2013 अन्वये राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आलेली असल्याने शासन निर्णय दिनांक 20/01/2016 अन्वये अनुकंपा तत्वावर प्राथमिक शिक्षक पदावर नियुक्ती दिलेल्या व व्ययक्तिक मान्यता व शालार्थ id देण्यात आलेला आहे अशा शिक्षकांपैकी जे शिक्षक राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा वा केंद्र शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत अशा शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा ही अहर्ता सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 3 वर्षाच्या कालावधीत धारण करावी
- ग्राम विकास विभागाच्या सांदर्भाधीन दि . 11. 10 . 2022 च्या पत्रान्वये अनुकंपा तत्वा वर प्राथमिक शिक्षक पदार नियुक्तीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तथापि शासन निर्णयात तरतूद असल्यामुळे संस्थांनी अनुकंपा तत्वा वर नियुक्ती दिलेली आहे. परंतु शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण पू संचालक यांनी त्यास मान्यता किंवा शालार्थ आयडी दिलेला नाही, अशा उमेदवारांना देखील 3 वर्षाच्या आत शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अहर्ता धरण करण्याच्या अटीवर अनुकंपा तत्वावर मान्यता/शालार्थ आयडी देण्यात यावा.
- तीन वर्षाच्या कालावधी नंतर जे शिक्षक पदावर नियुक्त उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा किंवा केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ही अहर्ता धरण करू शकणार नाहीत , अशा उमेदवारांची शिक्षक पदावरील सेवा समाप्त करण्यात यावी. तथापि, अशी नियुक्ती देणेबाबत नियुक्ती प्राधिकारी यांनी कार्यवाही करावी. अशा उमेदवाराची सेवा ज्येष्ठता, सदर प्रवर्गात ज्येष्ठता यादीमध्ये अंतिम क्रमांकावर राहील.
वरील संपूर्ण शासन निर्णय Shasan Nirnay About Anukamp Teacher संपूर्ण pdf स्वरूपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
मित्रांनो, वरील माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच शेअर करा.