February Gk In Marathi | फेब्रुवारी चालु घडामोडी २०२५

February Gk In Marathi : नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणास या लेख मध्ये फेब्रुवारी महिन्याचे काही ठळक मराठी चालू घडामोडी वाचायला मिळणार आहेत. याचा आपल्याला सर्वच स्पर्धा परीक्षेसाठी अगदी कमी वेळात महत्वाची general knowledge in marathi उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या काही चालू घडामोडी २०२५

मित्रांनो, आपण या आधीच्या एक आर्टिकल मध्ये January Current Affairs याची संपूर्ण माहिती सांगितलेली आहे. आज सर्व मुद्देसूद फेब्रुवारी महिन्याचे JANRAL NOLEJ IN MARATHI पाहणार आहोत –

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी २०२५ | February Gk In Marathi

प्रश्न.१  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत 2025 ?

उत्तर – Donald Trump

 प्रश्न.  कोणत्या देशाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्यात आले आहे  ?

उत्तर –  मॉरिशस

 प्रश्न.  ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ मेडिटेशन लीडर्स कार्यक्रम कोठे पार पडला ?

 उत्तर –  मुंबई

 प्रश्न.  देश का प्रकृती परीक्षण अभियानाची गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून ते कधी सुरू करण्यात आले होते ?

 उत्तर –  29 ऑक्टोबर 2024

 प्रश्न.  कोणत्या देशाच्या शास्त्रज्ञांनी एस के यु एस चा शोध लावला आहे ?

 उत्तर –  चीन

 प्रश्न.  आंतरराष्ट्रीय कला महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला आहे?

 उत्तर –  हैदराबाद 

प्रश्न . सॅम नुजोमा यांचे निधन झाले त्यांना कोणत्या देशाचे राष्ट्रपिता मानले जाते ?

 उत्तर –  नामी बिया 

प्रश्न.  नवाब सलाम यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे ?

 उत्तर –  लेबनॉन

 प्रश्न.  कोणत्या देशाने जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे ? 

 उत्तर –  अर्जेंटिना देश

 प्रश्न.  कधी साजरा करण्यात येतो ? world pulses day 

  उत्तर –  10 फेब्रुवारी 

 प्रश्न. EKUVERIN 2025  सैन्य अभ्यास कोणत्या दोन देशात आयोजित करण्यात आला आहे ?

 उत्तर –  भारत आणि मालदीव

प्रश्न.  कोणत्या भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिकेला ग्रामीण पुरस्कार मिळाला आहे ?

 उत्तर –  चंद्रिका टंडन (JANRAL NOLEJ IN MARATHI)

 प्रश्न.  भारतीय वंशाच्या अमेरिकन गायिका चंद्रिका टंडन यांना कोणत्या अल्बमसाठी ग्रामीण पुरस्कार मिळाला आहे ?

 उत्तर –  त्रिवेणी अल्बम

 प्रश्न. फोर्ब्स ने 2025 मधील जगातील दहा सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून यामध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?

  उत्तर –  अमेरिका देश

प्रश्न. फोर्ब्स ने  2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली देशांची क्रमवारी जाहीर केली असून भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?

 उत्तर –  बाराव्या क्रमांकावर

प्रश्न. आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन वर जाणारे पहिले भारतीय अंतराळवीर कोण बनले आहेत ?

 उत्तर –  कॅप्टन शुभांशू शुक्ला

जानेवारी महिन्याचे सर्व चालुघडामोडी 2025 वाचण्यासाठी येथे क्लिक करा .

राष्ट्रीय चालुघडामोडी २०२५ | February Gk In Marathi

प्रश्न.  केंद्रीय राखीव पोलीस दलाचे नवीन महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे ?

 उत्तर –  ज्ञानेंद्र प्रताप सिंग

 प्रश्न.  तिसरे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले ?

 उत्तर –  पुणे महाराष्ट्र

 प्रश्न.  कोणत्या राज्याने स्वतःचे इंडियन मॅक्रो गुनेरी  नावाचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित केले ?

उत्तर –  गुजरात राज्य

 प्रश्न.  कोणाच्या अध्यक्षतेखाली महाकुंभ दुर्घटना समितीची स्थापना करण्यात आली ?

 उत्तर –  हर्ष कुमार

प्रश्न.  पंतप्रधानांच्या सचिव पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

 उत्तर –  शशिकांत दास

 प्रश्न.  लाइफ ऑन मार्च कलेक्टर स्टोरीज बुक्स चे लेखक कोण आहेत ?

 उत्तर –  नमिता गोखले

प्रश्न.  भारतातील  पहिल्या व विज्ञान संग्रहालयाचे उद्घटन कोठे झाले ?

 उत्तर –  ग्वालियर,  मध्य प्रदेश

 प्रश्न.  भारतातील पहिले शून्य कचरा विमानतळ कोणते ?

 उत्तर –  इंदोर, मध्य प्रदेश

 प्रश्न.  देशातील पहिले सेंद्रिय फिश क्लस्टर कोठे आहे ?

 उत्तर –  सिक्कीम

 प्रश्न.  स्वतःचे उपग्रह असलेली भारतातील पहिली खाजगी कंपनी कोणती ?

 उत्तर – Pixxel

 प्रश्न.  भारतातील पहिले AI धोरण ठरवणारे राज्य कोणते ?

 उत्तर –  महाराष्ट्र राज्य

प्रश्न.  स्वतःचे पहिले जैवविविधता वारसा स्थळ घोषित करणारे राज्य कोणते ?

 उत्तर –  गुजरात राज्य

 प्रश्न.  भारतातील पहिल्या रोड ट्रेनचे उद्घाटन कोठे करण्यात आले ?

 उत्तर –  नागपूर येथे

प्रश्न.  महाराष्ट्र राज्यात पहिले योग व निसर्गोपचार केंद्र कोठे स्थापन करण्यात येणार आहे ?

 उत्तर –  लोणार 

प्रश्न.  एकोणिसावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?

 उत्तर –  छत्रपती संभाजी नगर

 प्रश्न.  19 व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे ?

 उत्तर –  अशोक राणा 

प्रश्न.  नुकतेच कोणत्या राज्य सरकारने राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केली आहे ?

 उत्तर –  गुजरात राज्य

 प्रश्न –  व्हाट्सअप द्वारे प्रशासन सेवा सुरू करणारे हे जगातील पहिले राज्य कोणते बनले आहे ?

 उत्तर –  आंध्र प्रदेश

प्रश्न.  महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग यांच्या पुढाकाराने राज्यात कोठे पहिल्या मधुबन  हनी  पार्कचे उद्घाटन होणार आहे ?

 उत्तर –  महाबळेश्वर

 प्रश्न.  कोणत्या राज्याने सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेतून बोलण्याचे अनिवार्य केले आहे ?

 उत्तर –  महाराष्ट्र राज्य

 प्रश्न.  The mahatmas manifesto या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?

 उत्तर –  राजेश तलवार

क्रीडा घडामोडी २०२५ | February Gk In Marathi

प्रश्न.  आयसीसी तर्फे 2024 वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू आणि सर्वोत्तम कसोटी क्रिकेटपटू हे प्रदान करण्यात आले आहे?

 उत्तर –  जसप्रीत बुमराह

 प्रश्न.  विराट कोहली हा एक दिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावा करणारा जगातील कितवा फलंदाज ठरला आहे ?

 उत्तर –  तिसरा – 

 प्रश्न.  38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सायकलपटू प्रणिता सोमण यांनी कोणते पदक जिंकले आहे ?

 उत्तर –  कांस्यपदक

प्रश्न.  कोणत्या देशाचा क्रिकेट खेळाडू मैथू ब्रीटझके यांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पणात सर्वाधिक धावांची खेळी  करण्याचा विश्वविक्रम केला आहे ?

 उत्तर –  दक्षिण आफ्रिका 

 प्रश्न.  38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या महिला संघाने कोणत्या क्रीडा प्रकारात सांघिक सुवर्णपदक जिंकले आहे ?

 उत्तर –  योगासन

 प्रश्न.  सहावी पुरुष हॉकी इंडिया लीग स्पर्धा  2024- 25 कोणत्या संघाने जिंकली?

 उत्तर –  श्राची रड बंगाल टायगर्स

 प्रश्न.  पहिली महिला हॉकी इंडिया लीग स्पर्धा 2024 – 25 कोणत्या संघाने जिंकली ?

 उत्तर –  ओडिशा वॉरियर्स

प्रश्न.  38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सानवी देशवाल हिने कोणते पदक जिंकले आहे ?

 उत्तर –  सुवर्ण पदक

प्रश्न.  67 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे?

 उत्तर –  पृथ्वीराज मोहोळ

 प्रश्न.  67 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला आहे ?

 उत्तर –  महेंद्र गायकवाड

 प्रश्न.  भारतीय क्रिकेट नियमक महामंडळाकडून देण्यात येणारा सी के नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?

 उत्तर –  सचिन तेंडुलकर

प्रश्न.  सलग दुसऱ्यांदा अंडर 19 महिला टी-20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला आहे ?

 उत्तर –  भारत देश

प्रश्न.  ग्रामीण क्रिकेट लीग सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

 उत्तर –  गुजरात

आर्थिक घडामोडी २०२५ | January Current Affairs

प्रश्न . भ्रष्टाचाराच्या वाडीत जागतिक क्रमवारीत भारत कितव्या क्रमांकावर आहे ?

 उत्तर – ९६ वा 

 प्रश्न.  तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाल्यामुळे कोणत्या देशात अन्नसुरक्षा आणीबाणी लागू करण्यात आली आहे

 उत्तर –  फिलिपाईन्स 

 प्रश्न.  अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया किती निच्य अंकी पातळीवर आला आहे ?

 उत्तर – 87.17 

प्रश्न.  आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी 2025 व 2026 या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज आहे ?

 उत्तर – 6.3 ते 6.8 

प्रश्न.  आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीत राज्याच्या यादीत कोणते राज्य प्रथम स्थानी आहे ?

 उत्तर –  तेलंगाना

 प्रश्न.  स्वतःच्या सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे ?

 उत्तर –  चौथा क्रमांक

 प्रश्न.  भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे ?

 उत्तर –  तिसरा क्रमांक

 प्रश्न.  अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने लाडली बहना निवास योजना सुरू केली आहे ?

 उत्तर –  मध्य प्रदेश 

फेब्रुवारी मधील महत्वाचे दिवस येणारे सर्व सरळ सेवा भरतीसाठी तसेच रेल्वे भरती पोलीस भरती वाल्यांना पाठ करून ठेवा . January Current Affairs

  • १  फेब्रुवारी – भारतीय तटरक्षक दिवस
  •  2 फेब्रुवारी –  जागतिक पाणथळ दिवस
  •  4 फेब्रुवारी –  जागतिक कर्करोग दिवस
  •  सात फेब्रुवारी –  सुरक्षित इंटरनेट दिवस
  •  10 फेब्रुवारी –  राष्ट्रीय जंतनाशक दिवस
  •  12 फेब्रुवारी –  डार्विन दिवस ,  राष्ट्रीय उत्पादकता दिवस
  •  13 फेब्रुवारी –  जागतिक रेडिओ दिवस सरोजिनी नायडू यांची जयंती
  •  19 फेब्रुवारी –  छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिवस
  •  २० फेब्रुवारी –  जागतिक सामाजिक न्याय दिवस
  •  21 फेब्रुवारी –  आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस
  •  24 फेब्रुवारी –  केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस
  •  27 फेब्रुवारी – मराठी भाषा दिवस,  जागतिक एनजीओ  NGO दिवस
  • 28 फेब्रुवारी –  राष्ट्रीय विज्ञान दिवस ,  दुर्मिळ रोग दिवस 

जानेवारी महिन्यातील महत्वाचे दिवस लक्षात ठेवा सरळ सेवा एक्झाम मध्ये यावर प्रश्न विचारले जातात. ( February Gk In Marathi )

  1. 1 जानेवारी –  डीआरडीओ DRDO स्थापना दिवस
  2.  2 फेब्रुवारी –  महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस
  3.  4 फेब्रुवारी –  जागतिक ब्रेल दिवस
  4.  5 जानेवारी –  राष्ट्रीय पक्षी दिन
  5.  नऊ जानेवारी-  प्रवासी भारतीय दिवस
  6.  10 जानेवारी –  जागतिक हिंदी दिवस
  7.  11 जानेवारी –  राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस
  8.  ११ ते १७ जानेवारी –  रस्ता सुरक्षा सप्ताह
  9.  12 जानेवारी –  राष्ट्रीय युवा दिन
  10.  15 जानेवारी –  भारतीय सैन्य दिन
  11.  24 जानेवारी –  राष्ट्रीय बालिका दिन
  12.  25 जानेवारी –  राष्ट्रीय मतदार दिन,  राष्ट्रीय पर्यटन दिवस
  13.  26 जानेवारी –  प्रजासत्ताक दिन,  आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस

CONCLUTION :

मित्रांनो आपण सर्वांनी वरील February Gk In Marathi प्रश्न मालिका सोडवलीच असेल अशी आशा करतो.

Leave a Comment