World Environment Day 2025 : आजच्या आधुनिक युगात पर्यावरणाचे रक्षण हे प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य बनले आहे. विशेष करून विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच पर्यावरणाबद्दलची समज आणि संवेदनशीलता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शाळा आणि महाविद्यालय ही विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व घडवण्याची पायरी असल्यामुळे, अशा शैक्षणिक संस्था मधून पर्यावरण जागरूकता वाढवणारे उपक्रम राबवले गेले पाहिजे. खाली अशाच काही निवडक उपक्रमांची माहिती दिली आहे, जी विद्यार्थ्यांचे निसर्गाशी नातं झोप असताना आणि त्यांना हिरवळीकडे वळवतात.
विद्यार्थ्यांसाठी इको क्लब ची स्थापना करणे
अनेक शाळांमध्ये इको क्लब स्थापन केले गेले आहेत. एक लाख म्हणजे विद्यार्थ्यांसाठी पर्यावरण शिक्षणाचे हक्काचे व्यासपीठ आहे या क्लब द्वारे घेतले जाणारे उपक्रम खालील प्रमाणे दिले आहे .
- नो वेहिकल डे आयोजन करावे तसेच सायकल डे सारखे उपक्रम
- प्लास्टिक विरोधात जनजागृती मोहीम राबवली पाहिजे.
- जलसंवर्धन उपक्रम घेतले पाहिजे.
- ई कचऱ्याचे पुनर्वापर कार्यशाळा हवी.
- पर्यावरणावर आधारित पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजन करावे.
पर्यावरणावर आधारित बालनाट्य सादरीकरणातून संदेश
बालकलाकारांद्वारे सादर होणारे नाट्य हे केवळ मनोरंजना पुरते मर्यादित नसून ते पर्यावरण संरक्षणाचा संदेशही देतात. विद्यार्थी “पाणी वाचवा” “वृक्ष वाचवा” , “हरित ऊर्जा वापरा” , “प्लास्टिकचा वापर कमी करा” या विषयावरून प्रभावी अभिनय सादर करू शकतात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रेक्षकांवरही पर्यावरणासंबंधी संवेदनशील व सकारात्मक संदेश जातो.
वनभ्रमण किंवा निसर्ग अभ्यास सहलींचे आयोजन | World Environment Day 2025
वाचनाऐवजी प्रत्यक्ष अनुभव या नवी शैक्षणिक धोरणातून साध्य करण्याचे योजले आहे त्यानुसार हे शिक्षण प्रभावी ठरते. त्यामुळे शाळा विद्यार्थ्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मंगळवेढा सेंद्रिय शेती प्रकल्प डोंगराळ जैवविविधता केंद्र, औषधी वनस्पती उद्याने, ऐतिहासिक वास्तू, अशा भौगोलिक ठिकाणी सहली यांचे आयोजन केले जाऊ शकते.
त्यामुळे मुलांना जैवविविधतेचे प्रत्यक्ष निरीक्षण, वृक्षांची भूमिका आणि त्यांचे महत्त्व तसेच मानवी कृतीमुळे होणारे दुष्परिणाम यांची देखील माहिती मिळते.
शाळा स्तरावर सेंद्रिय शेती आणि कंपोस्टिंग प्रकल्प सारखे उपक्रम राबविणे.
शाळा वरात छोटे शेततळे, सेंद्रिय भाजीपाला बाग, तसेच कंपोस्ट टाकी यांची स्थापना केली गेली पाहिजे. विद्यार्थी स्वतः त्याच्यात सहभाग असावा. स्वतः बियाणा लावून विद्यार्थी रोज पाणी घालेल आणि नंतर त्या भाजीपाल्याची विक्री देखील विद्यार्थी करतील. असं आयोजन असावे.
कारण यामुळे ( world environment day 2025 )
- स्वावलंबन आणि उद्यमशीलता यांचा विकास होतो.
- शेतीचे महत्व व मूलतत्त्वे समजतात.
- जैविक कचऱ्याचा योग्य उपयोग करता येतो.
अधिक वाचा :
100 environment day slogans in Marathi
बर्ड फिडर आणि पाणीपात्र मोहीम राबवणे

मुलांना उन्हाळ्यात पक्षांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देण्यासाठी बड फिटर आणि पाणीपात्र लावण्याचा उपक्रम खूप आवडतो. तो मुलांकडून करून घ्यावा.
विद्यार्थ्यांना प्लास्टिकच्या बाटल्या, नारळाच्या करवंट्या, पुठ्ठ्याचे डबे इत्यादी साहित्य वापरायला सांगून हा उपक्रम केवळ पक्षांच्या मदतीसाठी नसून तर प्राणीमात्रांविषयी सहवेदना मुलांना शिकवण्यास मदत होते.
पर्यावरण विषयक प्रकल्प आणि विज्ञान प्रदर्शन
पर्यावरण आणि आपण, ऊर्जा संवर्धन, हवा व जल प्रदूषण असे विषय घेऊन विद्यार्थी प्रकल्प तयार करून घ्यावे. आणि विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांची नाविन्यता विद्यार्थ्यांची कल्पकता आणि त्यांची चिंतनशीलता दाखविण्याचे प्रकल्प द्यावे.
यांसारख्या प्रकल्पात मधून विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती पर्यावरण रक्षणासाठी उपाय आणि स्मार्ट सोल्युशन्स यांची मांडणी कशी करायची याची माहिती मिळते.
निसर्ग स्नेही जीवन शैलीचे शिक्षण
शाळांमध्ये आता केवळ अभ्यासापुर ते शिक्षण देऊन चालणार नाही, जागरूक नागरिक घडविणे यावर अधिक भर देऊन शिक्षण दिले गेले पाहिजे. त्यासाठी
- योगासत्रे
- मेडिटेशन
- डिजिटल डिटॉक्स डे
अशा कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना मनशांती, निसर्गाशी सुसंवाद आणि सात्विक जीवनशैली शिकविली गेली पाहिजे.
निष्कर्ष :
विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडणे म्हणजे भविष्याच्या जगाला सुरक्षित, सुदृढ आणि शाश्वत दिशा देणे. शाळेतील हे उपक्रम म्हणजे एक बीज रोवण्याचा प्रयत्न आहे, जे एक दिवस मोठे वटवृक्ष बनून पर्यावरण रक्षणात मुलाचा वाटा उचलेल. पालक,शिक्षक ,स्थानिक संस्था आणि सरकार यांचा सहकार्य लाभले असे उपक्रम World Environment Day 2025 या दिवशी अधिक व्यापक प्रमाणात राबवता येतील.
आपल्या शाळेत असे उपक्रम राबवले जात असतील तर ते शेअर करा चला एकत्र येऊन हिरवं भविष्य घडवूया!