शालेय विद्यार्थ्यांचा नवीन ID | what is apaar id for students

APPAR ID म्हणजे काय , फायदे, वैशिष्ठ , महत्व आणि APPAR ID Registration बाबत संपूर्ण माहिती 

विद्यार्थ्यांसाठी APPAR ID म्हणजे काय ? | APPAR ID एक शिक्षण क्रांति | apaar id

what is apaar id for students: आजच्या तंत्रज्ञान युगात शिक्षण पद्धतीत बदल होत चालले आहेत. आज डिजिटल साधनांचा उपयोग शिक्षण प्रक्रियेत अधिक प्रभावी बनविण्यासाठी केला जात आहे . अपार आयडी हा एक महत्वाचा डिजिटल ऑनलाइन उपक्रम आहे . शिक्षण प्रणालीत विद्यार्थ्यांचा मागोवा घेण्यासाठी उपयोग वापरला जाणार आहे . 

आजच्या या लेखात आपण विद्यार्थ्यांसाठी अपार आयडी म्हणजे काय ? त्यांचे वैशिष्ट्य,उद्दिष्ट . उपयोग आणि फायदे काय आहेत . याची सविस्तर चर्चा करणार आहोत.

अपार आयडी एक राष्ट्र,एक विद्यार्थी म्हणून काम करेल . हा ID विद्यार्थ्यांना त्यांचा हक्काचा स्वतः चा ओळख ठरवेल . हा युनिक ID आजीवन काळ असणार आहे . या ID मुळे ज्या विद्यार्थ्यांची गळती होत आहे त्याकडे विशेष लक्ष देण्यास मदत होणार आहे . 

अपार आयडी तयार झाल्यावर तो DIGILOCKER या शैक्षणिक SITE वर जोडला जाणार आहे . त्यानंतर विद्यार्थ्यांना सर्व वर्गांचे निकाल  ONLINE पद्धतीने पाहायला मिळणार आहे . 

मित्रांनो , सर्वाना माहीत आहे की, NEP 2020 विद्यार्थ्यांना नवीन कौशल्य विकसित करण्याचे सरकारचे ध्येय आहे . अपार आयडी म्हणजे केवळ विद्यार्थ्यांचा ओळख क्रमांक नाही तर शिक्षण क्षेत्रातील क्रांतीचे एक साधन आहे . तंत्रज्ञानाच्या वापर करून शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडविण्यासाठी APPAR ID या ओळख क्रमांकाची भूमिका महत्वाची ठरते . 

शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा अभ्यास, पर्यावरण संवर्धन अशा विविध गोष्टीमुळे अपार आयडी शिक्षणाला अर्थातच नवीन दिशा मिळणार आहे. 

शेवटी अपार आयडी ही एक अशी प्रणाली आहे की विद्यार्थ्यांना  त्यांच्या प्रगतीबाबत अधिक प्रभावी बनवते, पालकांना शिक्षणात सहभाग करते, आणि शिक्षकांना मार्गदर्शन सुधारण्यासाठी मदत करते . 

अपार आय डी चे संक्षिप्त नाव काय आहे ? | apaar id full form

APPAR हा शब्द “ academic performance and progress analysis record ” हे संक्षिप्त रूप आहे . याचा मुख्य उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासंबंधी साव माहिती एकाच ठिकाणी केंद्रीभूत करणे होय . 

अपार आयडी म्हणजे काय ? | What Is Apaar Id card

APPAR ID हा एक असा युनिक ओळख क्रमांक ( unique identification number ) आहे . हा क्रमांक विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेद्वारे दिला जातो . हा क्रमांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची माहिती संकलित आणि व्यवस्थापित करण्यासाठी वापरला जातो. 

हा एक आधार कार्ड प्रमाणेच प्रत्येक विद्ययार्थयाचे शाळेत 12 अंकी अपार आयडी कार्ड बनवली जात आहेत . 30 नोव्हेंबर 2024 पर्यन्त शेवटची मुदत आहे . केंद्र सरकारने 30 नोव्हेंबेर पर्यन्त जनरेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत . अपार आयडी मध्ये ही 12 अंकी नंबर दिला जाणार आहे .

अपार आयडी दिवस कधी असतो ? | What Is Apaar Id day

29 व 30 नोव्हेंबेर हा अपार आयडी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा असे , महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून अशा सूचना देण्यात आल्या आहेत .

हेही वाचा :

महाराष्ट्रातील नवीन CBSE पॅटर्न काय आहे माहिती वाचा .

अपार आयडी चे महत्व | apaar id card

अपार आयडी विद्यार्थ्यांसाठी का महत्वाचा आहे याचे कारण जाणून घेऊया –

  • प्रत्येक विद्यार्थ्याचा एक वेगळा ओळख क्रमांक असतो – हा क्रमांक प्रत्येक विद्यार्थ्याला विशीतहया करतो आणि त्यांच्या शिक्षणाशी संबंधित सर्व माहिती एक ठिकाणी उपलब्ध करून देतो .
  • विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती मागोवा करता येतो – यांमुळे विद्यार्थ्याच्या गुणांची, हजेरीची ,उपस्थितीची या सर्व घटकांचा मागोवा घेणे सोपे आणि सुलभ करता येते . 
  • शैक्षणिक प्रक्रियेत पारदर्शकता – शाळा , पालक आणि विद्यार्थी या तिन्ही घटकासाठी ही प्रणाली उपयुक्त ठरते . 

अपार आयडी ची वैशिष्ठ्ये

APPAR ID मध्ये पुढील मुद्दे समाविष्ट असतात . 

  1. विद्यार्थ्यांचे पूर्ण नाव 
  2. जन्मतारीख आणि वय 
  3. ओळख क्रमांक ( ID NUMBER)
  4. शैक्षणिक संस्थेचे नाव 
  5. इयत्ता आणि वर्ग 
  6. गुणपत्रिक आणि प्रगतीची नोंद 
  7. उपस्थितीची नोंद तपशील 
  8. सहशालेय उपक्रम सहभाग 
  9. पालकांची माहिती ( नाव, संपर्क क्रमांक ) 

अपार आयडी कसा मिळवावा ? | how to get apaar id

अपार आयडी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांची शाळा किंवा शैक्षणिक संस्थेची संपर्क साधावा लागतो. संस्थेच्या प्रशासन विभागाकडून विद्यार्थ्यांचा अपार आयडी दिला जातो . काही वेळा हा विद्यार्थ्यांचा ओळख क्रमांक आधार कार्ड किंवा इतर शासकीय ओळखपत्राशी जोडला जातो . 

अपार आयडी मिळविण्यासाठी चार पायऱ्या आहेत – 

  • अपार आयडी समजून घेण्यासाठी पालक शाळेला भेट देतात . 
  • आयडी तयार करण्यासाठी पालक संमती फॉर्म भरतात | 
  • UDISE प्रणाली विद्यार्थ्यांच्या PEN विरुद्ध अपार आयडी तयार करते.
  • APPAR ID विद्यार्थ्यांच्या DIGILOCKER खात्यात टाकला जातो. 
  • STEP १- पालक शिक्षक बैठक आयोजित करा . 
  • STEP २- संमती अर्ज वितरित करा . 
  • STEP ३- पालकांची संमती मिळवा 
  • STEP ४- अपार आयडी बद्दल शिक्षित करा . 
  • STEP ५- शारीरिक संमती फॉर्म गोळा करणे . 
  • STEP ६ – APPAR module मध्ये प्रवेश करा . 
  • STEP ७ – शाळा प्रशासन विद्यार्थ्यांचा तपशील माहिती प्रमाणित करणे . 
  • STEP ८ –अपार आयडी तयार करा . 
  • STEP ९ – अपार आयडी शेअर करा . 
  • STEP १०- अपार आयडी तयार करतांना येणाऱ्या त्रुटि . 

अपार आयडी चा उपयोग काय आहे ? |  

अपार आयडी चा उपयोग शैक्षणिक व आधुनिक क्षेत्रात चांगली व्यवस्था निर्माण करणे हा आहे . या ID चा मुख्य उपयोग आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत – 

  1. पालकांसाठी सोयीस्कर माहिती – मुलांच्या शैक्षणिक प्रगतीची माहिती पालक हे सहजपणे घेऊ शकता 
  2. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे विश्लेषण – अपार आयडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती व त्यांच्या गुणांचे विश्लेषण, सह शालेय उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे निरीक्षण करता येते . 
  3. सर्व सरकारी योजनांचा लाभ –  या ID मुळे शैक्षणिक अनुदान, शालेय शिष्यवृत्ती, शासहकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त आहे  
  4. शाळासाठी नियोजन प्रक्रिया सोपी होणार – शाळा अपार आयडी च्या मदतीने विद्यार्थ्यांचा डेटा एकत्रित ठेवता येतो . यामुळे शालेय शैक्षणिक अहवाल तयार करणे सोपे होते . 

अपार आयडी चे फायदे | benefits of APPAR ID

APPAR ID च्या वापरामुळे विद्यार्थ्यांना आणि शैक्षणिक संस्थाना अनेक फायदे होतात – 

  • विद्यार्थ्यांचा वैयक्तिक विकास 
  • देता व्यवस्थापन सुलभता 
  • डिजिटल युगाची जुळव 
  • शैक्षणिक प्रणालीत सुधारणा 

अपार आयडी तयार करतांना घ्यावयाची काळजी 

योग्य माहिती भरा – विद्यार्थ्यांच्या कंगडपत्रातील माहिती अचूक असावी. चुकीची माहिती भरल्यास, दिल्यास अर्ज फेटाळला जाण्याची शक्यता आहे. 

माहिती सुरक्षित ठेवा – अपार आयडी क्रमांक कोणालाही शेअर करू नका . तो सुरक्षित ठेवा . 

नोंदणी केंद्र अधिकृत आहे का तपसा – आपली फसवणूक टाळण्यासाठी फक्त अधिकृत नोंदणी केंद्रावरच आपली नोंदणी केली पाहिजे . 

पावती सुरक्षित ठेवा – पावती हरवू नये, अपार आयडी मिळेपर्यंत फार महत्वाची आहे , त्याशिवाय अपार आयडी मिळणार नाही .

अपार आयडी साठी आवश्यक कागदपत्रे 

  • आधार कार्ड 
  • विद्यार्थी फोटो 
  • जन्म प्रमाणपत्र 
  • शैक्षणिक निकाल पत्रे 
  • (Leaving certificate ) LC शाळा सोडल्याचा दाखला (  लागू असेल तर ) 

अपार आयडी चे फायदे 

  1. कागदपत्राची गरज कमी होते : यांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक वेळी कागद पत्रे देण्याची आवश्यकता राहणार नाही . डिजिटल स्वरूपात माहिती उपलब्ध असल्यामुळे वेळेची खूप बचत होणार व श्रम देखील कमी होणार आहे .
  2. शैक्षणिक पारदर्शकता : अपार आयडी मुळे विद्यार्थ्यांचा प्रगतीचा अहवाल, विद्यार्थ्यांच्या उपस्थिती ,विद्यार्थ्यांचा निकाल या शिक्षकांना कोणत्याही क्षणी तपासणी करता येणार आहे .
  3. डेटा एकत्रीकरण : सर्व विद्यार्थ्यांचा एकास ठिकाणी एकत्रित डिजिटल डेटा मिळणार आहे .
  4. प्रवेश  प्रक्रिया सुलभ होते : महविद्यालये, शाळा मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेली माहिती अपार आयडी द्वारे सहपणे उपलब्ध होणार ,आणि प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी कमी होणार आहे .
  5. आधुनिक शिक्षण प्रणालीचा भाग : शैक्षणिक क्रांति होऊन शैक्षणिक तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे .

अपार आयडी REGISTRATION 

अपार आयडी तयार करण्यासाठी किंवा अधिक माहिती घेण्यासाठी खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइट ला भेट द्या . 

APPAR ID REGISTRATION

DIGILOCKER काय आहे ?  

Digilocker हा एक डिजिटल दस्तावेज संग्रहण सेवा पुरविणारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे . हे भारत सरकारने सुरू केले सेवा आहे . याचा उद्देश डिजिटल डिजिटल दस्तावेज संग्रहित आणि सुरक्षित करणे हाच आहे . 

याच्या सहाय्याने तुम्ही तुमचे महत्वाचे कागद पत्रे ( आधार कार्ड, पासपोर्ट, शालेय प्रमाणपत्रे ) डिजिटल स्वरूपात ठेऊ शकता आणि ऑनलाइन कधीही प्रवेश करू शकता. आणि विशेष म्हणजे मोबाइल द्वारे तुम्ही पॉकेट मध्ये ठेऊ शकता . 

DIGILOCKER चा वापर केल्याने कागद पत्रांचा आदान प्रदान करणे सोयीचे होणार आहे आणि सुरक्षित देखील आहे . याचा वापर करण्यासाठी सरकारने अधिकृतपणे प्रमाणित केलेय कागद पात्रांना यामध्ये सामावून घेतले जाते . 

 MARATHI APPAR STEP BY STEP PROCESS FLOW ANTI ACTIONAL POINT FOR SCHOOLS 

CLICK HERE 

सारांश  : 

अपार आयडी ही शिक्षण क्षेत्रातील एक वेगळी संकल्पना आहे . यामुळे विद्यार्थ्यांची ओळख व सरकारी योजनांचा लाभ सहजपणे मिळतो . व पारदर्शकता पाहायला मिळेल . APPAR ID म्हणजे एक डिजिटल शिक्षणाच्या दिशेने टाकलेले एक वेगळे पाऊल आहे . मित्रांनो , तुम्हाला जर हा ब्लॉग ची माहिती आवडत असेल तर नक्की शेअर करा.  .