Teacher Day Speech in Marathi | शिक्षक दिन मराठी 5 सुंदर भाषणे

Teacher Day Speech in Marathi :  मित्रांनो ! आज आपण सर्व जण येथे चांगली भाषणे वाचन करण्यासाठी आले आहेत . मला आशा आहे की आपण नक्कीच shikshak din marathi bhashan विषयी चांगली माहिती मिळवणार आहोत. 5 सप्टेंबर रोजी आपण सर्वजण संपूर्ण भारतभर  शिक्षक दिन साजरा करतो ,परंतु बऱ्याच जणांना शिक्षक दिन विषयी माहिती नसते. काळजी करू नका ,येथे तुम्हाला अगदी आपल्या मराठी मातृ भाषेत Teacher Day Speech in Marathi माहिती  मी तुम्हाला देणार आहे.

5 सप्टेंबर हा दिन शिक्षक दिन म्हणून का साजरी केला जातो? शिक्षक दिनाचा इतिहास काय आहे?

तर, ऐका आपल्या भारत देशाचे दुसरे राष्ट्रपती, आणि पहिले उपराष्ट्रपती भारतरत्न  डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन  यांचा जन्म 5 सप्टेंबर 1962 रोजी झाला . म्हणजेच आपल्या सर्वांच्या भाषेत महान शिक्षक असलेले डॉ सर्वपल्ली यांचा वाढदिवस दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताच्या शिक्षण व्यवस्थेत खूप मोठे योगदान आहे. अश्या या महान शिक्षकमुळे आज आदर्श नागरिक घडले,आणि पुढेही असे सुजाण नागरिक घडावेत . अश्या या महान शिक्षकाचा आदर आणि सन्मान करण्यासाठी तसेच शिक्षकाचे महत्व व योगदान ,समाजामध्ये जागरूकता पसरवण्यासाठी आपण सर्वजण दरवर्षी  हा शुभ दिन teacher day  साजरा करतो. 

सर्वात पहिल्यांदा शिक्षक दिन (TEACHER DAY) हा सन 1962 साली साजरा केला गेला. संपूर्ण जगभर शिक्षक दिन साजरा केला जातो ,परंतु फरक एवढाच आहे की, इतर देशामध्ये वेगवेगळ्या तारखेला साजरा केला जातो. तसेच , आंतरराष्ट्रीय शिक्षक दिवस हा 5 ऑक्टोबर 1994 साजरा केला जातो. शिक्षक दिनाच्या दिवशी सर्व शाळामध्ये , कॉलजमध्ये विविध कार्यक्रम राबवले जातात. जसे- भाषणे (Teacher Day Bhashan in Marathi) दिली जातात, नृत्य संगीत, स्पर्धा घेतल्या जातात. अक्षर लेखन स्पर्धा होतात. व विशेष कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित केले जाते.

विविध देशातील शिक्षक दिन दिनांक

देश शिक्षक दिन दिनांक 
अल्बेनिया मार्च 
लेबेनॉन 9 मार्च 
मलेशिया 16 मे 
चीन 10 सप्टेंबर
तैवान 28 सप्टेंबर
पोलंड 14 ऑक्टोबर 
ब्राजील 15 ऑक्टोबर 
स्लोवेकिया 28 मार्च 
थायलंड 16 जानेवारी 

डॉ राधाकृष्णन यांच्या महत्वाचे वाक्य – 

आकर्षक भाषण सुरूवाट करण्यासाठी , सर्वात पहिले अतिथि स्वागत आणि त्यांचे अभिवादन करूनच भाषणाची सुरुवात करावी. प्रसिद्ध व्यक्तीच्या विचारांनी करावी. जसे कविता,सुविचार,चारोळ्या.

भाषण – 1 Shikshak Din Marathi Bhashan

“पाटीवर गिरविलेल्या अक्षरांची सुरुवात म्हणजे शिक्षक ,
आज्ञानाच्या अंधारात ज्ञानाची पेटती वाट म्हणजे शिक्षक !”

सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे तसेच आदरणीय शिक्षक आणि माझ्या बाल विद्यार्थी मित्रांनो ! 

आज दिनांक  5 सप्टेंबर भारताचे दुसरे राष्ट्रपति डॉ सर्वपल्ली राधाकृषणन यांचा आज जन्मदिवस . जे एक आदर्श विद्यार्थी प्रिय शिक्षक ,विद्वान, देशभक्त होते म्हणून आज संपूर्ण भारतभर 5 सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करीत असतो. 

मित्रांनो! मी आजच्या दिवशी सर्व प्रथम सर्व शिक्षकांना प्रणाम करतो / करिते . कारण आज याच शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानामुळेच आणि आत्मविश्वासमुळेच मी आज तुमच्या समोर उभा /उभी आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत शिक्षकांना आई वडील इतकाच मान असतो. कारण आईवडील हे आपल्याला जन्म देतात तर , शिक्षक शिक्षक हे आपल्या जीवनाला आकार देतात. 

मित्रहो , पाया भक्कम असेल तर भक्कम इमारत उभी राहते. तसेच शिक्षकही ज्ञानातून आपल्या जीवनाचा पाया भक्कम करत असतात. ज्यावर भविष्यात आपल्या कर्तुत्व ची भक्कम इमारत उभी राहते. याचेच जीवंत उदाहरण म्हणजे  भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम तर राष्ट्रपति किंवा शास्त्रज्ञ ऐवजी स्वतःला शिक्षकच म्हणून घ्यायचे पसंद करायचे. एवढा हा शिक्षकी पेशा श्रेष्ठ आहे. 

मित्रांनो ,आपली संपत्ति ही चोरली जाऊ शकते ,परंतु आपण घेतलेल्या ज्ञानची चोरी कधीच केली जाऊ शकत नाही . म्हणून “ज्ञान हीच खरी संपत्ति आहे .” एक शिक्षक स्वतः दिव्यप्रमाणे जळून विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश पोहोचवत असतात.

डॉ राधाकृषणं नेहमीच म्हणायचे – “भविष्यातील आव्हांनाचा सामना करण्याचे सामर्थ्य देणारा शिक्षक हाच खरा शिक्षक असतो .” 

आजच्या या शिक्षक दिवशी शेवटी मी एवढेच म्हणेल की, आपण आपल्या शिक्षकांचा नेहमीच आदर करायला हवा ,आणि खूप मेहनत व चिकाटीने अभ्यास करून सुजाण नागरिक व्हायला हवे. हीच आपल्या शिक्षकांच्या उपकाराची परतफेड ठरेल.

                                               !! जय हिंद , जय महाराष्ट्र !!  

भाषण – 2 शिक्षक दिनासाठी आकर्षक भाषण 5 | September Teachers Day Speech in Marathi

 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु , गुरुर्देवो महेश्वरा ,

 गुरुर साक्षात परब्रह्म 

तस्मै श्री गुरवे नमः 

आदरणीय मुख्याध्यापक जे सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या बाल विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम माझ्या सर्व शिक्षकांना प्रणाम ! 

मित्रांनो आपणास सर्वांनाच माहिती आहे की 5 सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिवस म्हणून साजरा करतो. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि भारताचे दुसरे राष्ट्रपती तसेच एक महान शिक्षक असलेल्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरे करतो. 

मित्रहो शिक्षक हा शब्द वाटायला खूप लहान वाटतो परंतु त्यामध्ये व्यक्तिमत्त्वाची प्रचंड  शक्ती दडलेली आहे.  शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांचं जीवन हे उत्तम रित्या बदलून जाते. शिक्षण कांच्या ज्ञानामुळेच आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतो. शिक्षका विषयी  कितीही बोलले तर शब्द कमीच पडतील. कारण आयुष्याच्या वाटेवर शिक्षकाचे फार मोठे योगदान आहे. कारण एका महामानवाने म्हटले आहे- शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. 

म्हणूनच म्हणतो /म्हणते, की आपल्या आयुष्यात येणाऱ्या सर्व गुरूंचा नेहमी आदर करा. आजचा हा दिवस म्हणजे आपल्यासाठी सर्वांना शिक्षकांचा आभार मानण्याचा दिवस आहे. 

शेवटी जाता जाता एवढेच म्हणायचं वाटतं-

गुरु घेऊनी माझा शिकवितो भार ||
पोट तिडकीने फार ||
आयुष्याच्या वळणावर आज ||
गवतला माज बोधवृक्षाचा पार ||

आकर्षक सोपे भाषण – 3

अध्यक्ष महाशय, आणि आदरणीय गुरुजन वर्ग आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो !

आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन शिक्षकांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस प्रथम माझ्या सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

 या शिक्षक दिनाच्या निमित्ताने ,मी आज तुम्हाला शिक्षकांच्या विषयी जी की आपण सर्वांनी शांतचित्ताने ऐकून घ्यावी ही नम्र विनंती.. 

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे .आपल्या आयुष्यातील अडचणी सोडवण्यात आणि यशाचा मार्ग दाखवण्यात आई-वडील यांच्यानंतर त्यांचा मोलाचा वाटा असतो. दरवर्षी पाच सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक उत्तम शिक्षक होते. ते नेहमीच आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीचा विचार करत असत.

जर शिक्षकास सन्मान आणि पुरेशी उत्पन्न मिळत नसेल, तर राष्ट्राच्या विकासाबद्दल विचार करणे निरर्थक आहे, असे त्यांचे मत होते. म्हणूनच त्यांनी आपला वाढदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जावा. अशी इच्छा व्यक्त केली तेव्हापासून म्हणजेच 1962 पासून 5 सप्टेंबर हा दिवस संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सर्व शाळा आणि कॉलेजमध्ये शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जातात .

भाषण निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. अनेक शाळांमध्ये मुले स्वतः शिक्षक बनून शाळा चालवतात. आपल्या आवडत्या शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त करतात विद्यार्थी आपल्या शिक्षकांना भेटून त्यांचे आशीर्वाद घेतात. त्यांना पुष्पगुच्छ भेट वस्तु देऊन त्यांचे आभार मानतात शासन तसेच अनेक संस्थांच्या माध्यमातून आदर्श शिक्षकांना पुरस्कार दिले जातात. नेहमी

ज्ञानाची तहान असते तो शिक्षक ,

नेहमी विद्यार्थ्यांची प्रगती पाहतो तो शिक्षक

 नेहमी ज्ञान अंजनाने प्रकल्प करतो तो शिक्षक,

 नेहमीच घडतो आणि घडवतो तो शिक्षक….

आई-वडील आपल्याला जन्म देतात, पालनपोषण करतात. आयुष्यभर आपल्याला साथ देतात .पण शिक्षक आपल्याला जीवन जगण्याची दिशा दाखवतात. आपल्या आयुष्याला आकार देतात. आपल्याला शिस्त लावून स्वतःबद्दल विचार करायला शिकवतात. त्यांचे ऋण आपल्याला कधीच भेटता येणार नाहीत .शिक्षकांना समाजात खूप मानाचा स्थान असते .कारण मुलांना आणि पर्यायाने देशाला घडविणारे शिक्षकच असतात .शिक्षकांनी दाखवलेल्या वाटेवरच मुले मार्गक्रमण करत असतात.

भविष्यात येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना आत्मविश्वासू बनवतात. खरंतर शिक्षकांच्या हातातच देशाचे भविष्य असतं. कारण शिक्षकांमुळे भविष्यातले डॉक्टर शास्त्रज्ञ इंजिनियर शिक्षक पोलीस आणि अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती करून देशाचे नाव उंचावणारे सामर्थ्यवान पिढी तयार होते. म्हणूनच असे म्हणतात- की “ज्या देशातील शिक्षक कर्तृत्ववान असतात .तो देश कधीच मागे राहत नाही” विचार मध आणि व्यक्तिमत्व घडवण्यामागे शिक्षकांचा मोठा वाटा असतो.

उत्तम संस्कार जीवन जगण्याची शिस्त आणि योग्य शिक्षण देऊन जगासमोर उभे राहण्याची ताकद शिक्षकांमुळेच येते. त्यांचे ऋण आपल्याला कधीच भेटतात. म्हणूनच फक्त पाच सप्टेंबरच नव्हे ,तर प्रत्येक दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा केला पाहिजे. शिक्षकांचा आदर केला पाहिजे .सन्मान राखला पाहिजे .कारण तेच आपले भाग्यविधाते आहेत,

शेवटी इतकच म्हणावसं वाटतं – 

अनमोल ज्ञान दिले तुम्ही ,

योग्य मार्ग दाखविला तुम्ही 

जगण्याला दिशा दिली तुम्ही

 आयुष्याला शिस्त लावले तुम्ही

 ऋण क्रिडाया तुमचे नाही शक्य या जन्मी

 नाही शक्य या जन्मी …. 

!!धन्यवाद!!

शिक्षक दिन शुभेच्छा | Teachers Day Wishesh In Marathi

Teacher Day Speech in Marathi

डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची गोष्ट नक्की वाचा | Myth of Dr. Radhakrishnan Sarvapalli

  1. एकदा त्यांच्या विद्यार्थ्यांनी आणि अनुयायांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायचं ठरवलं. त्यांना हे काळल्यावत त्यांनी सांगितले की, “माझ्या वाढदिवस साजरा करण्याएवजी जर तो दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला गेला, तर मला खूप आनंद होईल. “ त्यानंत 5 सप्टेंबेर, डॉ राधाकृशां यांच्या जयंती निमित्या, भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला. 
  2. राधाकृष्णन हे हिंदू धर्माचे महान तत्वज्ञ होते, पान त्यांनी कधीही इतर धर्माचा अपमान केला नाही. एका प्रसंगात ,जेव्हा ऑक्सफर्ड विद्यापीठात तत्वज्ञान शिकवत होते, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या धर्माचा सन्मान करण्याचे महत्व सांगितले. 
  3. ते राष्ट्रपति पदावर असतांना एका समारंभात, त्यांच्या परिचयात एका माणसाने त्यांच्या राष्ट्रपति होण्यावर टिप्पणी केली . त्यावर ते हसत त्यांनी उत्तर दिले, “मी राष्ट्रापाटी असलो तरी मी आजही एक शिक्षकच आहे,आणि शिक्षक होणे हेच माझ्या जीवनाचे खरे ध्येय आहे .”
  4. एकदा विद्यार्थ्यंन बरोबर असतांना, एका विद्यार्थ्याने राधाकृषण्ण यांना आगळा वेगळा प्रश्न विचारून टाकला- तुम्हाला तत्वज्ञान शिकवतांना कंटाळा नाही येत का ? यावर यांनी हसून उत्तर दिले “ जोपर्यंत मी शिकत आहे, तोपर्यंत मी शिकवा राहीन. शिकणे आणि शिकवणे हेच खरे ज्ञान आहे . असे त्यांचे मानणे होते.

आधुनिक काळात शिक्षकांच्या भूमिकेतील बदल – Digital Teacher 

आजच्या आधुनिक उगत तंत्रज्ञानात प्रगती झाली आहे जिथे माहिती मिळवणे अगदी सोपे आणि वेगवान ज्ञान झाले आहे. इंटरनेट, स्मार्टफोन,ऑनलाइन शिक्षण अक्षय साधनामुळे अभ्यासासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत . त्यामुळे शिक्षकांचा पारंपरिक भूमिकेत पाहण्याचा दृष्टिकोण ही बादलाताना दिसत आहे . 

पूर्वीच्या काली शिक्षक हे ज्ञानाचे एकमेव स्रोत होते. परंतु आजच्या युगात माहिती विविध श्रोतातून मिळू शकते.  म्हणून शिक्षकाची भूमिका ही माहिती देण्यापूरती राहिलेली नाही आहे. तर एक चांगला मार्गदर्शक ,प्रेरक आणि समुपदेशक म्हणून काम करण्याचे आहे. 

आज आधुनिक काळात विद्यार्थी शिक्षकांना एक आदर्श म्हणून पाहतात, गुरुकडून फक्त ज्ञान घेत नाही तर, जीवनातील कौशल्य शिकवतात. तंत्रज्ञानशी जुळवून घेण्याची क्षमता आत्मसात करतात. 

निष्कर्ष

आशा आहे की ,आपल्याला माझे लिहलेली माहिती आवडली असेल, यावरून एक शिकायला मिळते की, शिक्षक दिन हा फक्त एक सन नसून आपल्या शिक्षकप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. राधाकृषण्ण यांच्या शिक्षणपरेमची आठवण आपण नेहमी ठेवली पाहिजे, शिक्षक दिनाचे खरे महत्व सांगू शकलो. शिक्षकांचे आपल्या जीवनात केवढे महत्व आहे हे समजले. शिक्षकांना आपण पूर्ण हृदयापासून धन्यवाद द्यायला हवे.