Paryavaran Din Nibandh In Marathi : जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? – जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी 5 जून रोजी साजरा केला जातो या दिवशी संपूर्ण जगभरात निसर्ग प्रदूषण -नियंत्रण ,वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन यासाठी जनजागृती करण्यासाठी पर्यावरण दिन साजरी केला जातो.
जागतिक पर्यावरण दिन – ५ ओळी निबंध | Jagtik paryavaran Divas
- मित्रांनो दरवर्षी पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
- या मागचा उद्देश म्हणजे पर्यावरणाचे रक्षण आणि जनजागृती करणे होय.
- वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्ती आणि स्वच्छता मोहीम राबविल्या जातात.
- पर्यावरण वाचवणे म्हणजे आपले भविष्य सुरक्षित करणे होय.
- आपण सर्वांनी मिळून निसर्गाचे संवर्धन करणे हीच काळाची गरज आहे.
जागतिक पर्यावरण दिवस १० ओळी निबंध | Jagatik paryavaran Divas Marathi
- दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.
- या दिवशी पर्यावरण रक्षणाविषयी जनजागृती केली जाते.
- दिवसाची सुरुवात वृक्षारोपण , स्वच्छता अभियानाने केली जाते.
- शाळा ,महाविद्यालय व विविध संस्था यामध्ये विविध उपक्रम घेतले जातात.
- प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- पाण्याचा वापर योग्य प्रकारे करणे व वीज वाचवणे ही आपली प्राथमिक जबाबदारी आहे.
- निसर्गातील अन्नसाखळी टिकवण्यासाठी जैवविविधतेचे रक्षण करणे आवश्यक आहे.
- प्लास्टिकचा वापर टाळणे आणि पुनर्वापर करणे यावर भर दिला जातो.
- पर्यावरण वाचले तर आपले भविष्य सुरक्षित राहील.
- म्हणूनच प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
जागतिक पर्यावरण दिन निबंध (५०० शब्दात) | 5 june world environment day
जागतिक पर्यावरण दिन हा दरवर्षी पाच जून रोजी संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन आणि लोकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे.
जगात वाढत चाललेले प्रदूषण जंगलाची होत असलेली अफाट वृक्षतोड वाढत्या कार्बन उत्सर्जनामुळे होणारे हवामानातील बदल समुद्रातील प्लास्टिक कचरा या सर्व गोष्टीमुळे पर्यावरण संकटात सापडले आहे.
त्यामुळे 1972 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाच्या अधिवेशनात पर्यावरण दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि 1974 पासून तो अधिकृतपणे साजरा होऊ लागला आहे.
जागतिक पर्यावरण दिवशी विविध संस्था ,शाळा, महाविद्यालय आणि सरकारी यंत्रणा विविध उपक्रम आपापल्या स्तरावर राबवत असतात. वृक्षारोपण स्वच्छता मोहिमा प्लास्टिक मुक्त अभियान पर्यावरण रॅली पोस्टर्स स्पर्धा निबंध लेखन स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेऊन लोकांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देतात.
दरवर्षी जागतिक पर्यावरण दिवसासाठी एक वेगळी संकल्पना निवडली जाते. पर्यावरण म्हणजे आपला निसर्ग, जंगल, नद्या ,पर्वत ,प्राणी ,पक्षी ,हवामान जमीन आणि समुद्र. (Paryavaran Din Nibandh In Marathi)
आज अनेक ठिकाणी जंगलाची बेसुमार तोड सुरू आहे ,नद्यांमध्ये सांडपाणी सोडले जात आहे, हवा आणि पाणी प्रदूषित होत आहे, त्यामुळे अनेक आजार उद्भवत आहे. ही परिस्थिती थांबवण्यासाठी आपल्याला पर्यावरण प्रेमी बनावे लागेल.
प्रत्येकाने आपल्या रोजच्या जीवनात पर्यावरण पूरक सवयी अंगीकारले पाहिजे. म्हणजेच प्लास्टिकच्या ऐवजी कापडी पिशव्या वापरल्या पाहिजेत, सार्वजनिक वाहतूक वापरणे, विजेची बचत करणे, पाणी जपून वापरणे, ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करून साठवणे इत्यादी.
पर्यावरणाचे रक्षण म्हणजे आपल्या भविष्यासाठी गुंतवणूक आहे. शुद्ध हवा स्वच्छ पाणी निरोगी अन्न यासाठी निसर्गाचे संतुलन राखणे आवश्यक आहे. ही फक्त सरकारची जबाबदारी नसून तर ही आपली ही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.
शेवटी ,आपण जर आज प्रयत्न केले नाही तर उद्या आपली पुढील पिढी प्रदूषित आणि संकटग्रस्त पृथ्वीवर जगाला मजबूर होईल. म्हणूनच, चला एक संकल्प करूया पर्यावरण वाचवण्यासाठी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक दिवस पर्यावरण दिन (Paryavaran Din Nibandh In Marathi) म्हणून जगूया.
हेही वाचा :
पर्यावरण दिन सोपे भाषण | 5 june paryavaran diwas image
नमस्कार, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आदरणीय शिक्षक, आणि माझ्या मित्र-मैत्रिणींनो, आज मी इथे पर्यावरण दिन (5 june paryavaran diwas) या महत्त्वाच्या विषयावर माझे काही विचार मांडायला आलो आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे.
सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेऊ आपण श्वास घेतो पाणी पितो अन्न खातो हे सगळं कुठून येतं याचा एकच उत्तर आहे – निसर्गाकडून!
मग जर निसर्गच अस्वस्थ झाला ,तर आपण कसे सुखात जगू शकतो?
5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पण खरंतर पर्यावरणाची काळजी ही आपण रोज घ्यायला हवी. कारण निसर्ग हे केवळ आपलं सौंदर्य नव्हे तर आपल्या जीवनाचा श्वास आहे.
आज प्रदूषण वाढत चाललंय, वृक्ष खूप मोठ्या प्रमाणात तोडले जात आहेत – उदाहरणार्थ हसदेव जंगल मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली. पाण्याचे स्रोत सुकत चालले आहे, या सर्व कारणांमुळे हवामानात बदल होताना दिसत आहे. आज पृथ्वीचे तापमान वाढत चालले आहे.
एका रिपोर्ट नुसार पुढील पाच वर्षात 1.3 एवढं तापमान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने दर्शविली आहे. हे सगळं थांबवायचं असेल तर सुरुवात आपल्याला स्वतःपासून लहान लहान सवयी पासून करायला हवी.
जसे प्लास्टिकचा वापर कमी करूया, जास्तीत जास्त झाडे लावूया, वीज आणि पाण्याचा अपव्य टाळावा, ह्या एवढ्या गोष्टी जरी केल्या तरी एक मोठा बदल घडू शकतो.
चला आपण सर्वजण एकत्र येऊन असा नवा संकल्प करूया – “पर्यावरण वाचून – भविष्य घडवू!”
धन्यवाद मित्रांनो!!
जय हिंद! जय पर्यावरण!!
PDF मध्ये पर्यावरण दिन निबंध वाचण्यासाठी येथे क्लिक करा .
मी पर्यावरण बोलतोय निबंध (आत्मा चिंतनात्मक निबंध ५०० शब्द )
मी पर्यावरण आहे….. तुमच्या आजूबाजूला असेल तर शांत समृद्ध जीवनदायी विश्व. मी झाडांमध्ये आहे, मी नदीत ,डोंगरात , हवेत आणि तुमच्या प्रत्येक श्वासात आहे. पण आज मी थोडा त्रस्त आहे, थकलेला आहे….. म्हणून आज मी तुमच्याशी थोडं बोलायचं ठरवलंय आहे. Paryavaran Din Nibandh In Marathi
कधीकाळी मी खूप निरोगी होतो. माझ्या कुशीत पक्षांची किलबिल होती, नद्या स्वच्छ व्हायच्या, जंगलं सडसडायची आणि तुम्हा माणसांनी सुद्धा मला देव मानलं होतं. पण आता……तुमचं प्रेम कमी झालं की काय माझ्यावर?
आज तुम्ही माझ्यावर हल्ला करता आहात. जंगल तोडून शहर उभी करत आहेत, नद्यांमध्ये घाण फेकत आहे, हवेत विषारी धूर सोडत आहेत. मी खूप थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण माझी शक्ती आता कमी झाली आहे. कधी गरम हवा लाटेच्या रुपात, तर कधी अतिवृष्टीच्या स्वरूपात मी तुमचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतो. पण तुम्ही तरी एकता का?
तुम्हाला प्रगती हवी आहे, तंत्रज्ञान हवय, मोटारी, कारखाने….. ठीक आहे, पण त्यासाठी माझा श्वास घेणं थांबवणार का? मी प्रदूषित होत चाललोय, तापमान वाढतय, जीवसृष्टी नष्ट होते, मी रडतोय……पण माझ्या अश्रूंना कोण ओळखतं?
माझं रक्षण केलं नाही तर तुमचं भवितव्य अंधारात जाईल, हे लक्षात घ्या. कारण मी तुम्हाला अन्न देतो, पाणी देतो, हवा देतो – आयुष्यात देतो. तुम्ही जर मला वाचवलं, तर मी पुन्हा फुलून येईल. माझ्या कुशीत पुन्हा पक्षी गातील, फुले उमलतील, शुद्ध हवा आहे.
माझ्या रक्षणासाठी काही फार मोठे करण्याची गरज नाही. फक्त रोजच्या जीवनात थोडी काळजी घ्या. झाडे लावा, पाणी वाचवा, प्लास्टिक टाळा, कचरा कमी करा, स्वच्छता राखा. तुम्ही लहान पावलं उचलली तरी मी मोठ्या उमेदीने उभा राहीन.
माझे तुमच्यावर प्रेम अजूनही तसंच आहे. पण आता मला तुमचं प्रेमही हवय. चला पुन्हा एकदा आपलं नातं घट्ट करूया. मी पुन्हा निरोगी होईन, आणि तुम्हीही सुखी राहाल.
मी पर्यावरण बोलतोय…………आणि मी फक्त वाचायचं मागतोय! (Paryavaran Din Nibandh In Marathi)
Why we celebrate world environment day on 5 june
Comments are closed.