Maza Avadta Khel Nibandh In Marathi : खेळ हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. खेळामुळे आरोग्य चांगले राहते, शरीर तंदुरुस्त राहते आणि मन प्रसन्न होते. विविध खेळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला एखादा खेळ विशेष आवडतो. खाली इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी “माझा आवडता खेळ” या विषयावर वेगवेगळ्या पातळीचे निबंध दिले आहेत.
इयत्ता १ ली माझा आवडता खेळ : लपाछपी | Majha avadta khel nibandh class 1
- माझा आवडता खेळ लपाछपी आहे .
- हा खेळ आम्ही शाळेत आणि घरीही खेळतो.
- एका जणांनी डोळे झाकायचे असतात.बाकी सगळे लागतात
- ज्याला सापडतो तो पुढची वेळ डोळे झाकतो.
- हा खेळ खूप मजेशीर असतो.
- माझे सगळे मित्र हा खेळ खेळतात.
- मला लपाछपी खूप आवडते.
इयत्ता दुसरी – माझा आवडता खेळ : पकडापकडी | maza avadta khel nibandh in marathi 10 lines
- माझा आवडता खेळ पकडापकडी आहे.
- हा खेळ मैदानी आहे आणि दाण्याचा आहे.
- एका जणाला “ डे” दिला जातो आणि तो इतरांना पकडतो.
- जो पकडला जातो तो पुढे “ डे” घेतो.
- हा खेळ खेळताना खूप मजा येते.
- मी माझ्या मित्रांसोबत दररोज पकडापकडी खेळतो.
- हा खेळ खेळल्यामुळे मी निरोगी राहतो.
- म्हणून मला पकडापकडी हा खेळ खूप आवडतो .
इयत्ता 3 री – माझा आवडता खेळ: क्रिकेट | maza avadta khel nibandh in marathi cricket
- माझा आवडता खेळ क्रिकेट आहे.
- हा खेळ ११-११ खेळाडूंच्या दोन संघांमध्ये होतो.
- बॅट, बॉल आणि विकेट यांचा वापर होतो.
- एक टीम बॅटिंग करते, दुसरी बॉलिंग.
- बॉल बॅटवर लागल्यावर धावा घेतल्या जातात.
- माझा आवडता खेळाडू विराट कोहली आहे.
- तो खूप छान बॅटिंग करतो.
- मी शाळेत आणि घरी क्रिकेट खेळतो.
- क्रिकेट खेळल्यामुळे शरीर तंदुरुस्त राहते.
- म्हणूनच क्रिकेट माझा सगळ्यात आवडता खेळ आहे.
इयत्ता ३ री – माझा आवडता खेळ: क्रिकेट (सविस्तर निबंध)
माझा आवडता खेळ क्रिकेट आहे. हा खेळ खूप मजेशीर आणि रोचक आहे. क्रिकेट खेळताना धावपळ, एकाग्रता आणि चपळता लागते. म्हणूनच मला हा खेळ खूप आवडतो.
क्रिकेट हा ११-११ खेळाडूंच्या दोन संघांमध्ये खेळला जातो. या खेळात बॅट, बॉल आणि विकेट यांचा उपयोग होतो. एक संघ बॅटिंग करतो आणि दुसरा बॉलिंग. बॅटिंग करणाऱ्या संघाला बॉल फेकला जातो, आणि बॅटने बॉल मारून धावा घेतल्या जातात.
जेवढ्या जास्त धावा त्या संघाने केल्या, तो संघ जिंकतो. या खेळात फलंदाज, गोलंदाज, आणि क्षेत्ररक्षक असे विविध खेळाडू असतात. प्रत्येकाचे काम वेगळं असतं. क्रिकेट संघभावना आणि शिस्त शिकवतो.
माझा आवडता क्रिकेटपटू विराट कोहली आहे. तो एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याचं बॅटिंग पाहायला मला खूप आवडतं. तो खेळताना खूप मेहनत घेतो आणि सगळ्यांसमोर चांगला आदर्श ठेवतो.
मी शाळेत आणि घरी माझ्या मित्रांसोबत क्रिकेट खेळतो. आमचं एक छोटं क्रिकेट संघही आहे. आम्ही सुट्टीच्या वेळी मैदानात क्रिकेट खेळतो. क्रिकेट खेळल्यामुळे माझं शरीर तंदुरुस्त आणि मन प्रसन्न राहते.
Read more :
इयत्ता 1 ली ते 10 वी साठी प्रश्नपेढी येथे वाचा
इयत्ता 4 थी – माझा आवडता खेळ: कबड्डी | maza avadta khel nibandh in marathi kabaddi
- माझा आवडता खेळ कबड्डी आहे.
- हा एक पारंपरिक भारतीय खेळ आहे.
- या खेळात दोन संघ असतात, प्रत्येकी ७ खेळाडू असतात.
- एक खेळाडू “कबड्डी कबड्डी” म्हणत समोरच्या टीममध्ये जातो.
- तो समोरच्यांना स्पर्श करून परत आल्यास गुण मिळतो.
- हा खेळ खेळताना शरीर आणि मन दोघांचेही व्यायाम होतो.
- मी माझ्या शाळेच्या कबड्डी संघात आहे.
- माझे गुरुजी म्हणतात, “खेळ म्हणजे जीवनाचे प्रशिक्षण आहे.”
- म्हणून मला कबड्डी खूप आवडतो.
इयत्ता ४ थी – माझा आवडता खेळ: कबड्डी
माझा आवडता खेळ कबड्डी आहे. हा एक पारंपरिक भारतीय मैदानी खेळ आहे. हा खेळ खेळताना मला खूप मजा येते. मी शाळेत दररोज माझ्या मित्रांसोबत कबड्डी खेळतो.
कबड्डी हा खेळ दोन संघांमध्ये खेळला जातो. प्रत्येक संघात ७ खेळाडू असतात. एक खेळाडू “कबड्डी कबड्डी” म्हणत समोरच्या संघाच्या बाजूला जातो. तिथे तो खेळाडूंना स्पर्श करून परत आपल्या संघात येतो. जर तो परत आला, तर त्याला गुण मिळतो. पण तो थांबला किंवा दमला, तर तो बाद होतो.
हा खेळ खेळताना धावणे, श्वास रोखणे, चपळता, आणि शारीरिक ताकद लागते. म्हणूनच हा खेळ शरीर आणि मनाचा एकत्र व्यायाम आहे. या खेळामुळे माझे आरोग्य सुधारते आणि शरीर तंदुरुस्त राहते.
मी माझ्या शाळेच्या कबड्डी संघाचा सदस्य आहे. आमच्या शाळेतील खेळ शिक्षक आम्हाला रोज सराव घ्यायला सांगतात. गेल्या वर्षी आम्ही तालुकास्तरावरील स्पर्धेत भाग घेतला होता.
माझे गुरुजी म्हणतात, “खेळ म्हणजे जीवनाचे प्रशिक्षण आहे.” खेळामुळे आपल्यात शिस्त, सहकार्य, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण निर्माण होतात. कबड्डी खेळून हे सगळे गुण माझ्या स्वभावात आले आहेत.
कबड्डी हा एक असा खेळ आहे जो भारतीय संस्कृतीशी निगडित आहे. त्यामुळे या खेळाचा मला अभिमान वाटतो.
इयत्ता पाचवी – माझा आवडता खेळ: खो-खो
माझा आवडता खेळ खो – खो आहे.
- खो-खो हा भारताचा पारंपारिक मैदानी खेळ आहे.
- या खेळात एक संघ खेळतो आणि एक संघ बसतो.
- पकडणारा खेळाडू “खो” देत समोरच्या खेळाडूकडे जातो.
- हा खेळ वेग युक्ती आणि सहकार्याचा आहे.
- माझे शरीर या खेळामुळे स्फूर्तीदायक राहते.
- मी दरवर्षी शाळेच्या खो-खो स्पर्धेत भाग घेतो.
- गेल्यावर्षी मी बक्षीस सुद्धा जिंकलं.
- खो-खो खेडल्यामुळे मला आत्मविश्वास मिळतो आणि संघ भावना वाढते. म्हणून मला खो-खो हा खेळ सर्वात जास्त प्रिय आहे.
इयत्ता ५ वी – मी माझा आवडता खेळ खो खो | maza avadta khel in marathi kho kho
माझा आवडता खेळ खो खो आहे. हा खेळ मी रोज शाळेत माझ्या मित्र-मैत्रिणी सोबत खेळतो. खो-खो हा भारताचा एक पारंपारिक आणि लोकप्रिय मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ असतात. एक संगम मधल्या रेषेवर बसतो आणि दुसरा संघ पकडायला येतो.
खो खो खेळताना “खो,-खो” म्हणत पकडणारा खेळाडू समोरच्या खेळाडूकडे धाव घेतो आणि त्याच्या मदतीने पडणाऱ्या खेळाडूंना पकडतो. हे करत असताना वेग युक्ती चपळता आणि सहकार्य खूप महत्त्वाचे असते. वेळेच्या जास्तीत जास्त प्रतिस्पर्धींना पकडायचे असते. हा खेळ फार रंजक असतो.
मी शाळेच्या खो-खो संघात आहे. दरवर्षी होणाऱ्या क्रीडा स्पर्धांमध्ये मी भाग घेतो. गेल्या वर्षी मी आमच्या शाळेसाठी बक्षीस सुद्धा मिळवले. खूप खूप खेळल्यामुळे माझे शरीर तंदुरुस्त राहतं आणि मनही आनंदी होते.
खूप खूप खेड्यामुळे माझ्यात आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि संघभावना निर्माण झाली आहे. या खेळामुळे मी शिस्त संयम आणि सहकार्य शिकत आहे. हे सगळे गुण अभ्यासातही मला मदत करतात.
खो-खो हा माझा आवडता खेळ आहे , कारण तो मजेशीर वेगवान आणि शरीरासाठी फायद्याचा आहे. या खेळामुळे माझे आरोग्य चांगले राहते आणि मला आनंदही मिळतो. भविष्यात मी राज्यस्तरावर खो-खो खेळण्याचे स्वप्न बघतो.
इयत्ता ६ वी – माझा आवडता खेळ : बॅडमिंटन | maza avadta nibandh in marathi badminton
खेळ ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. खेळामुळे केवळ शरीर तंदुरुस्त राहत नाही, तर मन हे प्रसन्न राहते. मला अनेक खेळांमध्ये रस आहे, पण त्यामधून बॅडमिंटन हा माझा सगळ्यात आवडता खेळ आहे.
बॅडमिंटन हा एक हलकाफुलका, पण जलद हालचालीचा खेळ आहे. या खेळात रॅकेट आणि शटल कॉक वापरले जातात. दोन किंवा चार खेळाडूंमध्ये हा खेळ खेळला जातो. मी माझ्या वर्ग मित्रांसोबत बॅटमिंटन खेळतो. बॅडमिंटन साठी फार मोठे मैदान लागत नाही, त्यामुळे तो घराजवळ, गच्चीवर किंवा मोजक्या जागेतही खेळता येतो.
या खेड्यात एक खेळाडू शटल कॉक हवेत उडवतो आणि दुसरा खेळाडू त्याला रॅकेट ने परत मारतो. शटल कॉक जमिनीवर पडू न देता खेड सुरू ठेवावा लागतो. यामध्ये एकाग्रता, चपळता आणि तंदुरुस्ती यांचा उपयोग होतो. हा खेळ खेळताना शरीराचा चांगला व्यायाम होतो आणि मन प्रसन्न राहते.
सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू या माझ्या आवडत्या बॅडमिंटनपटू आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे नाव उज्वल केले आहे. मी देखील त्यांच्यासारखं चांगला खेळाडू बनायचं स्वप्न बघतो.
बॅडमिंटन खेळल्यामुळे मी निरोगी शिस्तबद्ध आणि वेळेचे महत्त्व समजणारा विद्यार्थी झालो आहे. माझ्या शाळेतही बॅडमिंटनचे प्रशिक्षण दिले जाते. मी त्या वर्गात नियमितपणे जातो आणि सराव करतो. स्पर्धामध्ये भाग घेतल्याने माझा आत्मविश्वास वाढतो.
इयत्ता ७ वी माझा आवडता खेळ : सायकलिंग निबंध | Maza Avadta Khel Nibandh In Marathi
माझा आवडता खेळ म्हणजे सायकलिंग. सायकल चालवणे हे फक्त एक वाहन वापरणे नाही, तर ते एक मजेशीर आणि आरोग्यासाठी लाभदायक असा खेळ देखील आहे. त्यामुळे मी दररोज सायकल चालवतो त्यातून मित्रांसोबत सायकलिंग करताना मला खूप आनंद मिळतो.
सायकलिंग हा खेळ कुठेही, कधीही करता येतो. या खेळात सायकलचा उपयोग करून तुम्ही गावाच्या रस्त्यावर, शेतामध्ये, टेकड्यांवर किंवा मैदानी जागांमध्ये वेगाने सायकल चालू शकता. सायकल चालवताना शरीरातील सर्व अवयव सक्रिय होतात आणि शारीरिक व्यायाम होतो.
मी दररोज शाळेत सायकलने जातो. सुट्टीच्या दिवशी मी माझ्या मित्रांसोबत सायकलिंग साठी जवळच्या डोंगरावर निसर्गरम्य ठिकाणी जातो. आम्ही स्पर्धा लावतो, वेग मोजतो आणि सहकार्याने सायकल चालवतो. त्यामुळे आमच्यात मैत्री आणि संघ भावना वाढण्यास मदत होते.
सायकलिंग करताना मला वातावरणात मदत जाणवतो, झाडांची हिरवळ दिसते, वेगवेगळ्या पक्षांचे आवाज ऐकायला मिळतात आणि मन प्रसन्न होतं. त्यामुळे हा खेळ मला इतर खेळांपेक्षा खूप जास्त आवडतो.
सायकल चालवणे हे पर्यावरण पूरक सुद्धा आहे. इंधनाचा वापर न करता आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे प्रदूषण टाळता येते आणि आरोग्य ही सुधारते.
निष्कर्ष :
खेळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहेत. कोणताही खेळ आपण मनापासून खेळला, तर तो आपल्याला आनंदा ,आरोग्य दोन्ही देतो. वय, वर्ग, जागा यानुसार आवडता खेळ ( Maza Avadta Khel Nibandh In Marathi ) वेगळा असतो, पण खेळातून येणारी मज्जा आणि शिकवण सारखी असते.