HSC Result 2025 Maharashtra LIVE: राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे आणि लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष आता 12th result website कडे लागले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) अंतर्गत ११ फेब्रुवारी ते १८ मार्च दरम्यान बारावीच्या परीक्षा पार पडल्या होत्या. यंदा परीक्षा लवकर झाल्याने निकालही लवकर लागतोय.
यावर्षी जवळपास 12.5 लाख विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली असून निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. या लेखात आपण बारावीचा निकाल कसा पाहायचा, कोणती वेबसाइट ओपन करायची, आणि स्टेप्स कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
बारावीचा निकाल कुठे पाहायचा? (HSC Result 2025 Maharashtra LIVE)
विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांपैकी कोणत्याही एकावर भेट द्यावी लागेल:
निकाल पाहण्याची पद्धत
- सर्वप्रथम mahresult.nic.in या 12th result website वर जा.
- त्यानंतर “HSC Result 2025” लिंकवर क्लिक करा.
- तुमचा परीक्षा क्रमांक (Roll Number) आणि आईचे नाव / जन्म तारीख टाका.
- “Submit” क्लिक केल्यावर निकाल स्क्रीनवर दिसेल.
- निकालाचा स्क्रीनशॉट घ्या किंवा प्रिंट काढा.
SMS द्वारे निकाल कसा पहाल?
इंटरनेट नसल्यास तुम्ही SMS द्वारे निकाल पाहू शकता.
बारावीचा निकाल पाहण्यासाठी मोबाईलवर टाइप करा:
MHHSC<space>Seat Number
आणि पाठवा 57766 या नंबरवर. काही वेळात तुमचा निकाल मेसेजद्वारे येईल.
गुणपत्रिका कधी मिळेल?
निकाल जाहीर झाल्यानंतर १० ते १५ दिवसांत शाळांमार्फत मूळ गुणपत्रिका दिली जाईल. ही गुणपत्रिका महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे ती काळजीपूर्वक सांभाळा.
महत्त्वाचा सल्ला
निकाल पाहताना फक्त अधिकृत 12th result website वरच भेट द्या. कोणत्याही फेक वेबसाईट किंवा लिंकवर क्लिक करू नका. अडचण आल्यास MSBSHSE च्या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधा.
निकाल हे जीवनातील एक टप्पा आहे. अपेक्षित यश मिळालं तर पुढे वाटचाल ठरवा आणि नाही मिळालं तर नव्या जोमाने प्रयत्न करा.