How Many Forts Of Shivaji Maharaj Are In UNESCO World Heritage : “गडकोट हेच आमचं स्वाभिमानाचं शस्त्र आहेत.”शिवरायांच्या स्वराज्याचे प्रतीक असलेल्या गडकोटांचा आज संपूर्ण जगाला अभिमान वाटावा, असा ऐतिहासिक क्षण 2025 च्या जुलै महिन्यात घडला. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत.
ही माहिती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्वीटद्वारे जाहीर करताच, संपूर्ण महाराष्ट्र आणि जगभरातील शिवप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली.
शिवकिल्ल्यांचा जागतिक स्तरावर गौरव
युनेस्कोच्या 47 व्या जागतिक वारसा समितीच्या पॅरिसमध्ये पार पडलेल्या अधिवेशनात, एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रातील ११ आणि तमिळनाडूमधील १, अशा एकूण १२ किल्ल्यांचा “Maratha Military Landscape” या शीर्षकाखाली युनेस्कोच्या यादीत समावेश झाला.
या 12 किल्ल्यांमध्ये आहेत: UNESCO WORLD HERITAGE LIST FORTS ARE THERE IN MAHARASHTRA OF SHIVAJI MAHARAJ
- रायगड
- राजगड
- प्रतापगड
- पन्हाळा
- शिवनेरी
- लोहगड
- साल्हेर
- सिंधुदुर्ग
- विजयदुर्ग
- सुवर्णदुर्ग
- खांदेरी
- जिंजी (तमिळनाडू)
READ MORE :
शिवाजी महाराज गौरव ची माहिती वाचा
या किल्ल्यांची निवड का झाली?
या किल्ल्यांचे सामरिक, स्थापत्य आणि ऐतिहासिक महत्त्व जागतिक पातळीवर अद्वितीय आहे. महाराजांच्या काळातील माची स्थापत्य, दरवाजांची रचना, आणि गनिमी कावा यांसारखी युद्धतंत्रे जागतिक दृष्टिकोनातून वैशिष्ट्यपूर्ण मानली गेली आहेत.
फडणवीसांनी स्पष्ट केलं की, हे केवळ किल्ले नाहीत, तर मराठ्यांच्या लष्करी रणनीती, स्थापत्यकला आणि स्वराज्य स्थापनेचे प्रतिक आहेत.
या मान्यतेमागील संघर्ष आणि प्रयत्न
या मान्यतेसाठी 2016-17 पासूनच प्रयत्न सुरू होते. संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने युनेस्कोच्या तज्ज्ञांना किल्ल्यांना भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. या प्रक्रियेत डॉ. शिखा जैन यांचे योगदान अमूल्य ठरले. त्यांनी या यादीत किल्ल्यांना समाविष्ट करण्यासाठी तांत्रिक आणि अभ्यासपूर्ण माहिती सादर केली.
किल्ल्यांची वैशिष्ट्ये – एका दृष्टीक्षेपात | How Many Forts Of Shivaji Maharaj Are In UNESCO World Heritage
किल्ला | महत्त्वाचे वैशिष्ट्य |
रायगड | राज्याभिषेक स्थळ, समाधी |
राजगड | स्वराज्याची पहिली राजधानी |
साल्हेर | सर्वात उंच किल्ला, ऐतिहासिक युद्ध |
प्रतापगड | अफजलखान वधाचा साक्षीदार |
शिवनेरी | महाराजांचा जन्मस्थळ |
लोहगड | सुरतेच्या खजिन्याचं ठिकाण |
पन्हाळा | वेढ्यात अडकलेले महाराज |
सिंधुदुर्ग | सागरी सुरक्षा केंद्र |
खांदेरी | जंजिरावर नजर ठेवण्यासाठी बांधलेला किल्ला |
विजयदुर्ग | आरमाराचे पहिले केंद्र |
सुवर्णदुर्ग | आरमाराची राजधानी |
जिंजी (तामिळनाडू) | दक्षिण स्वराज्याची राजधानी |
या यादीत समाविष्ट झाल्याने काय लाभ?
- या किल्ल्यांना जागतिक पर्यटनात मान्यता मिळेल
- पर्यटन वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेस चालना मिळेल
- संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय निधी व मदतीचा मार्ग मोकळा होईल
- 1972 च्या जागतिक वारसा कराराचे संरक्षण
- शिवरायांचा इतिहास जागतिक स्तरावर पोहोचेल
संवर्धनाची गरज आणि आपली जबाबदारी
युनेस्कोचा दर्जा मिळणं हे प्रथम पाऊल आहे. यापुढे संवर्धन, देखभाल, पर्यटन नियोजन आणि गडकोटांचे शैक्षणिक मूल्य जपणं आवश्यक आहे.
संभाजीराजे छत्रपती यांनी देखील यासाठी सरकारकडे ठोस पावलं उचलण्याची विनंती केली आहे. फक्त या १२ ( How Many Forts Of Shivaji Maharaj Are In UNESCO World Heritage ) नव्हे, तर सर्वच किल्ल्यांचे जतन आपलं सामूहिक कर्तव्य आहे.
शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं…
“किल्ले हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, शौर्याचे आणि स्वाभिमानाचे भक्कम स्तंभ आहेत.”
यांना मिळालेला जागतिक दर्जा हा आपल्या इतिहासाच्या उज्ज्वल भविष्याचा आरंभ आहे.
आपण काय करू शकतो?
- गडकोटांना भेट द्या
- स्वच्छता राखा
- इतिहासाचा अभ्यास करा
- आणि हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवा
तुमचं यावर काय मत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना जागतिक गौरव ( How Many Forts Of Shivaji Maharaj Are In UNESCO World Heritage) मिळाल्याचा तुमच्या मनात काय अभिमान आहे? खाली कमेंट करून नक्की सांगा.