Devnagari Lipi : गणपतीने ज्या वर्णसंचांचा वापर करून महाभारत लिहिले असे मानतात. त्या सर्व वर्णसंच्यात स्वर ,व्यंजनाची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी आहे.
त्या वर्ण संचा साठी वेळोवेळी नवी चिन्हे निर्माण केली गेली. ती चिन्हे अनेकदा बदलालीही गेली त्या चिन्हांच्या सध्याच्या प्रचलित संचाला “देवनागरी लिपी ( devnagari lilp ) असे म्हणतात.
देवनागरी लिपी चे विशेषतः काय आहे ? | Devnagari Lipi Importance
- हि लिपी ( Devnagari Lipi )सर्व जगासाठी,जगात अस्तित्वात असलेल्या सर्व भाषांचे सुसंगत लेखन करण्यासाठी अत्यंत सोयीची आहे.
- यातील अ ते ज्ञ ही अक्षरे वळणदार, वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
- 0 ते 9 अंक देखणे आहेत. कोणताही देवनागरी अंक लिहिताना सुरुवातीला टेकवली लेखणी अंक लिहून होईपर्यंत उचलावी लागत नाही.
- या लिपीतील चिन्हे 16 स्वर,33 व्यंजने आणि 3 संयुक्त व्यंजने यांचे प्रतिनिधित्व करतात.
What is Devnagari Lipi ? | देवनागरी लिपी अधिक समजून घेऊ
52 मुळक्षारांच्या परस्पर संयोगाने जोडाक्षरे, बाराखड्यांच्या स्वरूपात लाखो स्वतंत्र अक्षर समूह चिन्हे लिहिता येतात. अशा काही लाख चिन्हांच्या अचूक व नेमक्या आकलनासाठी केवळ मूळ 52 चिन्हांची अक्षर अकर ओळख आणि ती अक्षरे एकमेकांना जोडायची पद्धत यांची जन पुरेशी ठरते !
देवनागरी लिपी “गणेशविद्या” लिपी कशी ठरली?| Ganeshvidya Lipi
भारतीय भाषांसाठी योजलेल्या ganeshvidya आधारित लिप्या वगळता जगातील इतर अनेक लीप्यांमध्ये अशी अल्प परिचयातून उपलब्ध होणारी चिन्ह संपन्नता आढळत नाही.
गणपतीने म्हणजे देवाने ही वर्ण व्यवस्था नागरिकांसाठी बनविली या समजुतीने तिच्या आजच्या एका चिन्हीत रूपाला देवनागरी लिपि ( Devnagari Lipi ) म्हणतात.
या वर्ण व्यवस्थेचा उगम गणपतीच्या हातून कसं झाला याबाबत पुढील एक आख्यायिका प्रचलित आहे !
महर्षि व्यासांना महाभारत हे महाकाव्य लिहायचे होते ! ते वेगाने लिहून होण्यासाठी त्यांनी श्रीगणेशाला लेखनिक होण्याचे आव्हान केले !
गणपतीने हे आवाहन मान्य करताना एक यात घातली . गणपतीने लिहायला प्रारंभ केला की, त्याचे लिखाण सतत सुरू राहील. ही यात पूर्ण करायला महर्षि व्यासांना सतत महाभारताची कथा सांगत राहावी लागणार होती. ही कथा सांगतांना गणपतीने घटलेली अट पाळतांनाही आपल्याला अधूनमधून थोडीशी उसंत मिळावी अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी व्यासांनीही एक युक्ती योजली .
त्यांनी गणपतीला सुचवले की, महभारतात लिहिण्यासाठी गणपतीने मानवी शरीराशी घनिष्ठ संबंध असेल अशी नवी वर्ण व्यवस्था निर्माण करावी आणि त्या वर्णासाठी स्वतंत्र चिन्हे ही निर्माण करावीत तसेच नवी लेखन पद्धती देखील विकसित करावी ! ही नव्याने विकसित केलेली वर्ण व्यवस्था ध्वनीवर आधारित असावी जेणे करून उच्चार आणि लेखनात सुसंगती येईल .
श्री गणेशाने व्यासांची ही सूचना मान्य केली . या सुचनेमुळे महाभारत सांगतांना व्यासांना अधून-मधून थोडी उसंत मिळणार आहे हे गणपतीच्या लक्षात आले . असे असले तरी मानवाला मानवी शरीराशी जोडलेली नवीन वर्ण व्यवस्था मिळून सर्व पृथ्वीचे कल्याणच होणार असल्याच्या भावनेतून गणपतीने व्यासांची सूचना मनःपूर्वक स्वीकारली .
गणपतीने महाभारत लिहतांना व्यास कथा सांगत असतांना त्याच्या सर्व उच्चारांचे सूक्ष्म शरीरशास्त्रीय अवलोकन केले. व्यासांच्या कथनादरम्यान ज्या ध्वनिंचा संबंध मानवी मुखाशी आढळला ते ध्वनी वेगळे करून त्यांना गणपतीने स्वर मानले. ज्या ध्वनीचा संबंध एकेका मानवी मणक्याशी होता अशा ध्वनीना गणपतीने व्यंजने मानले.
स्वर आणि व्यंजने तसेच व्यंजन आणि व्यंजने यांच्या चिन्ह संयोगाने प्रचंड संख्येने स्वतंत्र अक्षरचिन्हे निर्माण होऊ शकतात . जोडाक्षरे संकल्पनाही गणपतीने वेगवान लिखानासाठी निर्माण केली असा समाज पूर्वापार प्रचलित आहे ! मानवी उच्चारशी सर्वाधिक सुसंगत लेखन करण्यासाठी देवनागरी लिपि (Devnagari Lipi ) उपयुक्त आहे !
भारतीय लिप्या व देवनागरी लिपि यातील साम्य काय ? | Truth About Devnagari Lipi
कर्नाटकात जन्मलेल्या आणि काशील आश्रम उभारलेल्या गणेश हेब्बार उपख्य गणेशशास्त्री यांनी लिहून प्रसिद्ध केलेल्या भारतीय लिप्याची एकात्मता आणि भारतीय लिप्याची मौखिकता या दोन पुस्तकामधून पंजाबी, बंगाली,उडीसा ,आसामी, मल्याळम, तमिळ,गुजराती तसच आज वापरत नसलेल्या पण पूर्वी वापरत असलेल्या आणखी काही भारतीय लिप्या व देवनागरी लिपि यातील साम्य दाखवून दिले आहे !
ही लिपि खरेच देवाधिदेव गणपतीने बनवली का ? यावर आस्तिक,नास्तिकचा वाद सुरू आहे , पण ही जगातील अत्यंत उपयुक्त लिपि आहे, याबाबत मात्र आस्तिक आणि नास्तिक दोन्ही समूहानमध्ये बऱ्याच पैकी एकमत आहे .
सध्या कोणीही केलेल्या संशोधनाची नोंद त्या संशोधकाच्या नावाने करण्याची पद्धत आहे . पूर्वी अशी पद्धत नव्हती.
कोणी संशोधन केले , कविता रचली तर त्यातच संशोधकाचे , कवीचे नाव गुंफन्याची अथवा त्यासंबंधी नामनिधान किंवा संज्ञामध्ये संबंधितांचे नाव गुंफन्याची पद्धत होती .
शल्याने शरीर कापून त्यात दुरुस्तीची पद्धत सुरू केली, त्या पद्धतीला शल्याकर्म म्हणतात .
रुग्णांची नियोजनपूर्वक देखभाल पद्धत शुश्रुतने सुरू केली, त्या पद्धतीला शुश्रूषा म्हणतात .
डिझेल नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलेल्या इंधनाला डिझेल नाव आहे .
सुखकर्ता दुखहर्ता .. या आरतीत “दास रामाचा वाट पाहे” असे लिहून समर्थ रामदासांनी स्वतःची ओळख सूचित केली आहे.
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान , तुका म्हणे, येणे वारे ज्ञान सुखिया झाला, केशवासी नामदेव भावे ओवाळीती, कहात कबीर सन भाई साधू अशा ओळीतून जनार्दन स्वामी, तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, कबीर यांनी आपले नाव गुंफले आणि विशिष्ट कलाकृति त्यांनीच निर्माण केल्याचे सूचित केले .
वर्ण , स्वर आणि व्यंजने | Devnagari Lipi alphabet vovels and consonant
देवनागरी वर्णाक्षरांच्या सध्याच्या स्वरूपात ग, ण ,श ही अक्षरे इतरांपेक्षा वेगळी असून केवळ त्यांच्याच बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा काना आहे !
ग, ण श,यांच्यात बाराखडीत डावीकडून पहिल्या स्थानी सुट्टा कान असणे ही बाब लक्षणीय असून ही वर्ण व्यवस्था गणपतीने निर्माण केल्याचा संकेत मानून देवनागरी लिपि ला देवनगरीच्या धार्मिक प्रवृत्तीच्या कोण्या समर्थकणे या लिपिला गणेश विद्या म्हणाले व ते नाव रूढ झाले आहे .
गणपती अथर्व शीर्ष म्हणताना त्यात “ ए सा गणेशविद्या “ असे एक वाक्य येते त्याकहा संदर्भ श्री गणेशानेच् देवनागरी लिपीची ( Devnagari Lipi ) मुळ वर्ण व्यवस्था निर्माण करण्यासही जोडलेला आहे!
देवनागरी वर्ण चे पाच प्रकार कसे पडलेत ?
देवनागरी लिपीत 16 स्वर , 33 व्यंजने आणि 3 संयुक्त व्यंजने आहेत. स्वरांचा मानवी मुखशी तर व्यंजन्नाचा मानवी मणक्याशी संबंध आहे .
कान या मराठी शब्दाची सुरुवात क अक्षराने होते. चेहरा व दोन कान दिसतात तसे क अक्षर चिन्ह दिसते.
ड, ळ अक्षरांनी डोळा शब्द बनतो. उघडा डोळा , भिवई , पापणी मिळून ड कहा भास होतो .
दोन डोळे एकत्र पाहतांना ळ चा भास होतो .
झोपलेल्या माणसाचे नाक पाहून न चा भास होतो .
घास तपासतांना वैद्यबुवांना घ दिसतो.
मानवाला प्राथमिक अवस्थेत ज्या वस्तूंना नवे देण्याची गरज भासली , ती नवे लिहिण्यासाठी देवनागरी लिपि (Devnagari Lipi) अक्षरांना त्या वस्तूंचे आकार दिले असावेत.
मुखाशी संबंधावरून देवनागरी लिपीतील 33 व्यंजने, आणि 3 संयुक्त व्यंजने मिळून 36 वरणाचे मिळून दंतव्य. तालव्य, ओष्ठ्यव्य ,मूर्धन्य ,अनुनासिक ही पाच प्रकार आहेत.
वेगवेगळी व्यंजने उच्चारतांना वेगवेगळ्या मणक्याजवळ संवेदना जाणवतात.
कोणीतरी अभ्यासू व्याकरणकारने आणि शरीर शास्त्राच्या जाणकारने कधीतरी देवनागरी वर्ण आणि मानवी मणके यात आढळलेलेल एकास एक संबंध नोंदवून ठेवला आहे . हा एकास एक संबंध म्हणजे 33 मणके आणि 33 व्यंजने यांचा परस्पर संबंध आहे.
मानेच्या खाली पाठ कणा सुरू होतो तिथपासून वरुन खाली 1 ते 33 क्रमांक मनाक्यांना दिल्यास कोणत्या क्रमकाच्या मानहकयाशी नेमके देवनागरी लिपीतील कोणते व्यंजन जेडलेले ये हे या संबंधात सूचित केलेले आहे ! हा क्रम लिप्याचे हौशी अनहयासक असलेले माझे एक ज्येष्ठ सहकारी सुधीर नारखेडे यांनी मला उपलब्ध करून दिल. मी त्या क्रमानुसार एक चित्र निर्माण केले आहे .
मानवी शरीराशी, मानवी जीवनाशी देवनागरी लिपीचा घनिष्ठ संबंध असल्याने मानवी उच्चारांना याचिक लेखनाची जोड देण्यास आवश्यक सोई देवनागरी लिपीत, जोडाक्षर पद्धतीत आहेत.
कोणत्याही मानवी भाषेतील 99.99 टक्के शब्द या लिपीतून हुबेबूब लिकीटा येत असल्याने ही लिपि ( Devnagari Lipi ) जगाची भाषिक एकात्मता साधू शकेल.
लेखन ,उच्चारात सर्वाधिक सुसंगतीसाठी ही जगातील सर्वोत्तम लिप्या पैकी एक आहे.
देवनागरी लिपि ( Devnagari Lipi ) देवनागरी लिपि चिन्हात आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ,उडीसा, तेलुगू, मल्याळम बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्या मध्ये लक्षणीय एकात्मता आहे !
लिपि चिन्हातिल या बदलांची करणे भौगोलिक ,राजकीय आहेत .
लिखानासाठी भारताच्या उत्तरेत भूर्ज पत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरतात.
भूर्जपत्राला पुरेशी ऊंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्र, रफार ,रुकार ,उकार,अनुस्वार, चंद्र, हालन्त उपचिन्हे वैगरे गोष्टी वर्णाक्षरांच्या वर, खाली जोडता येतात.चिन्हात आणि बंगाली, गुजराती, कन्नड, पंजाबी, तमिळ,उडीसा, तेलुगू, मल्याळम बदल जाणवतो पण सर्व भारतीय लिप्या मध्ये लक्षणीय एकात्मता आहे !
लिपि चिन्हातिल या बदलांची करणे भौगोलिक ,राजकीय आहेत .
लिखानासाठी भारताच्या उत्तरेत भूर्ज पत्रे तर दक्षिणेत ताडपत्रे वापरतात.
भूर्जपत्राला पुरेशी ऊंची असल्याने देवनागरी लिपीतील मात्र, रफार ,रुकार ,उकार,अनुस्वार, चंद्र, हालन्त उपचिन्हे वैगरे गोष्टी वर्णाक्षरांच्या वर, खाली जोडता येतात.
ताडपत्रवर उंची कमी, रुंदी अधिक म्हणून दक्षिणी लीप्यांमधे ही उप चिन्हे वर्णाक्षरांच्या डावी उजवीकडे लिहणे सोयीचे होते.
अनेक देवनागरी अक्षरे आडवी केल्यास दक्षिणी लिपीतील अक्षरे मिळतात.शत्रूला संदेश मिळू नये म्हणून काही भारतीय राजांनी स्वतः ला v त्यांच्या अधिकाऱ्यांना ,प्रजाजांनांना समजणारी ,पण इतरांना न समजणारी भाषा, लिपी तयार केली .
काही राजांनी स्वतंत्र राज्याच्या स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र राजचिन्ह याप्रमाणेच स्वतंत्र लिपिही हवी अशा विचाराने अस्मितेचे आणखी एक प्रतीक म्हणून नवी लिपी घडवून घेतली.
देवनागरी लिपीशी ( Devnagari Lipi ) बरेच साम्य आणि किरकोळ बदलणे अशा विविध कारणांनी विविध नव्या लिप्या निर्माण झाल्या.
अनेक भारतीय लीप्यातून लिहतांना जगातील इतर अनेक लीप्यांच्या तुलनेत कमी जागा,कमी कागद,कमी शाई वापरली जाते. शाईत शिसे किंवा जड धातू वापरतात.शाई कमी लागल्यास शिशाचे v जड धातूंपासून होणारे प्रदुषण कमी होते
१७७७ रू. धनादेशने देताना रोमन लिपी इंग्रजीत one thousand seven hundred seventy Seven only ही ३९ अक्षरे तर मराठीत सतराशे सत्याहत्तर फक्त हि ११अक्षरे लागतात.
जगात रोज कोट्यवधी धनादेश देवाणघेवाण होते, त्यात अक्षरी रक्कम तीन वेळा लिहतात . 14 ते 19 वेळा वाचतात. धनादेश भारतीय भाषांत लिहिल्यास इंग्रजीच्या तुलनेत 70 टक्के वेळ , 72 टक्के शाई वाचते. व्यवहार वेगाने होतात. कार्यक्षमता वाढते.
थोडक्यात देवनागरी लिपि ( Devnagari Lipi ) पर्यावरणाचा विनाश कमी करण्यासाठी उपयुक्त आहे !
देवनागरी लिपीचा पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. या लिपीत कोणताही मजकूर कमी जागेत,कमी परिश्रमत लिहिता येतो म्हणून केवळ आर्थिक व्यवहार नावही तर शिक्षण, संशोधन,व्यापार,सेवाउद्योग,प्रशासन अशा सर्व क्षेत्रात ही लिपि आणि मराठी भाषा याचा दुहेरी वापर केल्यास आर्थिक बचत,पर्यावरण रक्षण आपोआपच होईल.
देवनागरी लिपि भारतीय / जागतिक एकात्मकतेचे साधन ठरेल.
घरी ,बाजारात ,बँकेत ,व्यवसायात, पत्रकात , पवतीत , प्रत्येक व्यवहारात ही लिपि वापरल्यास आपण अधिक सुखी , समृद्ध, आनंदी होऊ !
Devnagari Lipi ही लिपि सर्व जगाला उपयुक्त असल्याने ” गणेश विद्या ” बाबतची माहिती देशी, परदेशी लोकांना सतत दिली पाहिजे . परदेशी व्यवहारात इतर लिपिसह ही लिपि वापरावी . परदेशातून येणाऱ्या माळावर विविध भाषा, लिपीतील मजकूर असतो .
तसा भारतीय व्यवसायिकांनी बाजारात , बँकेत , कचेरीत , व्यवसायात , पत्रकात , पावतीत ,व्यवहारात , पात्र व्यवहारात , वस्तूंच्या वेष्टनात , अवरणावर देवनागरी लिपि वापरुन गणेश विद्येचा प्रसार जगभर करावा!
आणि अनेक क्षेत्रातील मूलभूत गोष्टी भारताने यापूर्वी जगाला दिल्या .
जगतिकीकरणात जगाकडून काही घेतांना जगाला चांगले काही देनेही अपेक्षित आहे. जगातील सर्वोत्तम लिपि जंगल देण्यासाठी “गणेशविद्या ” चे जागतिकीकरण करू या !
बीज गणितातील सिद्धांत ,शून्याची कल्पना, खगोल , भूमिती, आयुर्वेदिक औषधी , मुलींच्या शाळा, कुटुंबनियोजनाचे तत्व, स्वातंत्र्याची इच्छा , बँकेची कल्पना , नये कार रचना , शेतीसुधारणा , विधवा विवाह या सामाजिक सुधारणांपासून अवकाश तंत्रज्ञान , संगणकीय ज्ञान , माहिती तंत्रज्ञान , या अनेक उत्तम गोष्टी आपण जगाला दिल्या , जगाने अशा बाबतीत आपले अनुकरण केले .
जगाला उत्तमोत्तम गोष्टी देणारे सर्व भारतीय “गणेश विद्या ” जगभर पोचविण्याचे कार्य करतील , असा मला विश्वास वाटतो ! आपण सुरुवात तर करू , जग आपले अनुकरण करेल .
- निवेदक – प्रा . अनिल गोरे ( Devnagari Lipi )
- सदस्य : भाषा सल्लागार समिति, महाराष्ट्र शासन;
- सदस्य आणि समन्वयक : कृषि परिभाषा उपसमिती , महाराष्ट्र शासन.
- सदस्य : मराठी भाषा संवर्धन समिति , पुणे महानगरपालिका ;
- आजीव सदस्य : महाराष्ट्र साहित्य परिषद ; आजीव सदस्य : मराठी विज्ञान परिषद , पुणे विभाग ;
- आजीव सदस्य : महाराष्ट्र गरथोटतेजक सभा , पुणे .
- आजीव सदस्य : अक्षर मानव
- सदस्य : कोथरूड गौरव समिति , पुणे .
निवेदन : Devnagari Lipi
हे पत्रक ज्यांच्या पर्यन्त पोचेल त्यांनी गणेश मंडळ अहवाल , संस्था अहवाल, मासिके , पाक्षिके , वार्षीके ,त्रेमासिक , अनियमित कालिके , भ्रमणध्वनी संदेश , संगणकीय विरोप , सूचना फलक , पाट्या , समाज माध्यमे याद्वारे कायदेशीर मार्गाने यातील मजकूर देशात , परदेशात कोट्यवधी लोकांपर्यंत पचवावा , ही वैयक्तिक विनती ! अशा प्रकारे हाच आशय जसाच्या माझ्या नावसह कोणालाही पुढे पाठविण्यास मी या इथेच मुक्त परवानगी देत आहे !
तसेच यातील कोठे छापल्यास प्रत पाठवावी इतर प्रकारे प्रसिद्ध केल्यास त्यांची माहिती कळवावी, ही विनंती !
- अनिल गोरे ( संपर्क क्र. ९४२२००१६७१ )
- marathikaka@marathi
- कृपया अधिक अधिक प्रसार ( Devnagari Lipi ) करा .
- जी महाराष्ट्र जय मराठी
हेही वाचा :