D.TED COURSE: नमस्कार मित्रांनो, D.TED Full FORM- Diploma In Teacher Education आहे. मला बऱ्याच जणांनी विचारले की, मॅडम D. Ted म्हणजे काय? हीच माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे.
D.TED COURSE DETAILS
What is full form of D.TED? – Diploma In Teacher Education.
D. Ted Course म्हणजे काय?
मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, D. Ted हा डिप्लोमा आहे. 2 वर्ष कालावधीचा शिक्षक बनण्यासाठी D. Ted हा Diploma करावा लागतो.12 वी 50 टक्के सह पास होऊन नंतर D. ted ला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता.
तुमचे जर D. ted diploma झाला असेल तर,तुम्ही इयत्ता 1 ली ते 5 वी पर्यंत च्या 6 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थांना शिकवू शकता. जर तुमचे D. Ted va B.A graduate झाले असेल तर इयत्ता 6 वी 7वी व 8वी वर्गांना शिकवू शकता.आणि प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरी करू शकता.
D.TED अभ्यासक्रमासाठी कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते?
D.TED COURSE पूर्ण झाल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा (TET किंवा CTET) paper 1 व पेपर 2 पास करावी लागते. याबाबत सविस्तर माहिती पुढे वाचायला मिळेल.
- टीईटी / TET full form – TEACHER ELIGIBILITY TEST होय. महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा होय.
- CTET full form – CENTRAL TEACHER ELIGIBILITY TEST केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा होय.
D.TED COURSE का करावा?
मित्रांनो, जर तुम्हाला खरोखरच मुलांना शिकवायची आवड असेल तर D.Ted course तुमच्यासाठी योग्य आहे.
- सर्वच क्षेत्रापेक्षा विश्वासू क्षेत्र जर कोणते असेल तर,ते फक्त शिक्षकी पेशा क्षेत्र आहे.
- माझ्या सर्व गृहिणींना सोयीस्कर पडेल असे एकमेव क्षेत्र, महिलांसाठी सगळ्यात चांगली नोकरी शिक्षक आहे. कारण नोकरी आणि घरसंसार एकत्र सांभाळू शकता सहजतेने.
- सगळ्यांचा आवडता विषय म्हणजे सुट्या . शिक्षक पेशात सर्वात जास्त दीड महिना उन्हाळी सुट्या व 21 दिवस दिवाळी सुट्या मिळतात.ज्या मुळे आपण परिवाराला भरपूर वेळ देऊ शकतो. तसेच किरकोळ,अर्जित रजा, पगारी रजा,अजून भरपूर रजा आपण अडचणीच्या वेळी घेऊ शकतो.
- एक चांगले समाजकार्य मुलांना शिकवून आपण एक सुजाण नागरिक, कुशल भावी पिढी निर्माण करू शकतो.
साक्षरता मराठी घोषवाक्ये साठी येथे क्लिक करा.
D.TED COURSE नंतर काय करावे?
D. Ted Diploma जुन्या अभ्यासक्रमनुसार 2 वर्षाचा होता. आत्ता त्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार 4 वर्षाचा करण्यात आला आहे.
D. Ted Diploma पूर्ण केल्या नंतर, तुम्ही सरकारी प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून काम करू शकता. तसेच खाजगी, व अनुदानित प्राथमिक शाळेत तसेच आश्रमशाळेत शिक्षक म्हणून नोकरी करू शकता.
तसेच,जर तुम्ही CTET परीक्षा पास केली असेल तर, केंद्राची शाळा नवोदय मध्ये सरकारी शिक्षक म्हणून काम करू शकता.
D. ted शिक्षकांना पगार किती असतो.?
इयत्ता 1ली ते 5 वी पर्यंत च्या शिक्षकांना 50 हजारापेक्षा जास्त पगार असतो.
6 वी ते 8 वी पर्यंत शिकविणाऱ्या शिक्षकांचा पगार 70 हजाराच्या वर असतो.
D.TED COURSE ची शैक्षणिक पात्रता काय आहे?
उमेदवार 12 वी 50 %सह उत्तीर्ण असावा.यात अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती उमेदवारांना काही प्रमाणात नियमानुसार सुट देण्यात येते.
D.Ted अभ्यासक्रमाची वयोमर्यादा ही 17 वर्ष ते 35 वर्षापर्यंत कोणताही उमेदवार पात्र असेल. नियमानुसार वयोमर्यादा मागासवर्गीय उमेदवारांना सूट असते.
D.Ted course चा कालावधी हा जुन्या शैक्षणिक धोरणानुसार 2 वर्ष आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरण नुसार तो आत्ता 4 वर्ष करण्यात आलेला आहे.
D.TED COURSE साठी खर्च किती लागतो. | D.Ted course fee
D.ted course ची फी ही, आपल्या गुणवत्ता नुसार 12वी क्या टक्केवारी वर राऊंड मध्ये Government College (Diet) ला कुठलीही फी न भरता लागू शकतो.
तसेच खाजगी कॉलेज मध्ये शहराच्या जवळपास जिथे D.Ted college असेल तिथे तुम्हाला 50 हजार ते 1 लाखापर्यंत फी भरावी लागू शकते.
अर्थात जर तुम्ही d.Ted course जर सरकारी कॉलेज मधून केला तर,फी कमी लागते, आणि खाजगी कॉलेज मध्ये केला तर जास्त फी लागते.
D. Ted Course Syllabus | D.Ted अभ्यासक्रम काय असतो .
D.Ted अभ्यासक्रम करत असतांना एक विशिष्ठ अभ्यासक्रम दिलेला आहे. इतर अभ्यासक्रमापेक्षा आगळा वेगळा आहे. हा अभ्यासक्रम इयत्ता 1 ली ते 8 पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा विचार करून तसेच एका विशिष्ठ पद्धतीने अध्यापन ने शिकवण्याची पद्धती ठरवून तयार करण्यात आलेला असतो. त्याचा आपण अभ्यासक्रम पाहणार आहोत-
- भारतीय समाजशास्त्र –
- बालविकास मानस शास्त्र –
- शारीरिक शिक्षणशास्त्र –
- मूल्यमापन शास्त्र –
- आरोग्यशिक्षण अध्यापनशास्त्र –
- गणितशास्त्र –
- इंग्लिश अध्यापन शास्त्र –
- विज्ञान अध्यापन शास्त्र –
एक चांगला शिक्षक बनण्यासाठी कोणती कौशल्ये / गुण असायला हवीत ?
- उत्तम स्वास्थ्य
- उत्साही
- भावनिक स्थिरता
- सहानुभूति
- क्षमाशील
- कर्तव्यदक्ष
- सहिष्णुता
- भाषिक प्रभुत्व
- सामाजिकता
- वेळ नियमितता
- शिस्तप्रिय
- तंत्रस्नेही
D. ted कोर्स नंतर कोणता कोर्स करता येतो?
D. ted झाल्या नंतर आपणास त्यापुढील अभ्यासक्रम पुढे करू शकता .- जसे B.ED, M.ED, PHD, असे अभ्यासक्रम प्रवेश घेऊ शकता .
D.TED आणि B.ED मध्ये फरक काय ?
D.TED हा डिप्लोमा आहे. 1 ली ते 8 वी पर्यन्त च्या वर्गांना हे शिक्षक शिकवतात. तर B.ED ही एक पदवी आहे . हे शिक्षक 12 वी पर्यंतच्या वर्गांना शिकवतात. हा फरक आहे.
WHAT DOES DTED MEAN?
– “DIPLOMA IN TEACHER EDUCATION”