CTET 2025 Application Form Date : आता दरवर्षी चार CTET परीक्षा. शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नवीन शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत आणि NCTE अधिनियम 2025 नुसार आता CTET परीक्षा पूर्णपणे नवे स्वरूप घेणार आहे. यामुळे शिक्षक होण्यासाठी असलेल्या प्रक्रियेमध्ये मोठा आणि ऐतिहासिक बदल होणार आहे.
आता CTET चार स्तरांवर होईल : CTET 2025
नवीन शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) अंतर्गत शिक्षक भरती प्रक्रियेत मोठे आणि ऐतिहासिक बदल होत आहेत. यासाठी NCTE अधिनियम 2025 लवकरच लागू होणार आहे. यानंतर CTET 2025 परीक्षा पूर्णपणे नव्या स्वरूपात होईल.
आत्तापर्यंत CTET 2025( केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ) परीक्षा केवळ दोन स्तरांवर घेतली जायची. पण आता ही परीक्षा चार स्तरांवर घेतली जाणार आहे:
- Pre-Primary (बालवाटिका)
- Primary (इयत्ता 1 ते 5)
- Junior (इयत्ता 6 ते 8)
- TGT/PGT (इयत्ता 9 ते 12)
याचा फायदा असा की, प्रत्येक शैक्षणिक स्तरासाठी स्वतंत्र परीक्षा दिली जाईल. त्यामुळे योग्य आणि पात्र उमेदवार निवडले जातील.
शिक्षक होण्याचं स्वप्न आता अधिक सोपं
CTET परीक्षा आता अधिक स्पष्ट आणि योजनाबद्ध स्वरूपात घेतली जाणार आहे. त्यामुळे शिक्षक बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही उत्तम संधी आहे. पूर्वी फक्त D.El.Ed. (Diploma in Education) धारकांना प्रायमरी स्तरावर (Class 1-5) मान्यता होती. पण आता B.Ed. धारकांनाही सर्व स्तरांवर संधी उपलब्ध होणार आहे.
B.Ed. धारकांसाठी सुवर्णसंधी
NCTE अधिनियम 2025 लागू झाल्यानंतर 1 वर्ष आणि 2 वर्ष कालावधीच्या B.Ed. धारकांसाठी प्री-प्रायमरीपासून ते TGT/PGT पर्यंतच्या शिक्षक भरतीसाठी संधी खुली राहील.
याआधी B.Ed. केवळ प्रायमरीसाठी मान्य नव्हता. फक्त D.El.Ed. (डिप्लोमा) धारकांना मान्यता होती.
- नवीन अभ्यासक्रम
- नवीन परीक्षा पद्धती
- नवीन मूल्यांकन प्रणाली
CBSE आणि NCTE मिळून एक आधुनिक आणि सुरक्षित प्रणाली तयार करत आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या गुणवत्तेमध्ये आणि भविष्यकाळाच्या तयारीमध्ये सुधारणा होईल.
बदलाचे महत्त्वाचे मुद्दे : CTET 2025 Application Form Date
- NCTE अधिनियम 2025 लागू होणार.
- 1 वर्ष व 2 वर्षांच्या B.Ed. धारकांना सर्व स्तरांवर शिक्षक भरतीसाठी पात्रता.
- नवीन अभ्यासक्रम, परीक्षा पद्धती आणि मूल्यांकन प्रणाली येणार.
- CBSE व NCTE मिळून संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणणार.
CTET 2025 अपडेट
- CTET July 2025 परीक्षेसाठी अद्याप फॉर्म ( CTET 2025 Application Form Date ) जाहीर झालेले नाहीत.
- नवीन प्रणालीमुळे थोडा वेळ लागू शकतो.
- अधिकृत वेबसाइटवरून अपडेट पाहत राहा.
अधिकृत वेबसाइट:
CTET 2025 APPLICATION DETAILS : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा
CTET 2025 SYLLABUS | Old syllabus check here |
CTET 2025 EXAM DATE | Comming soon…. |
Ctet 2025 application form | comming soon….. |
CTET 2025 FORM application last date | Comming soon….. |
English :
As per the New Education Policy (NEP 2020) and NCTE Act 2025, CTET exam will now be conducted at 4 levels every year:
- Pre-Primary (Balvatika)
- Primary (Class 1 to 5)
- Junior (Class 6 to 8)
- TGT/PGT (Class 9 to 12)
This is a golden opportunity for B.Ed. holders as they can now apply for all four levels, unlike before where B.Ed. was valid only for upper levels.
New curriculum, new exam structure, and new evaluation process will be implemented soon.
Stay tuned for official CTET July 2025 notification!
It’s Time to Prepare with a New Direction
शिक्षक होण्याचं स्वप्न आता आणखी स्पष्ट, संगठित आणि प्रेरणादायी होईल.
Now, the dream of becoming a teacher will be clearer and more structured.
CTET (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) – वारंवार विचारले जाणारे प्रश्न
CTET साठी पात्रतेचे निकष कोणते आहेत?
कृपया CTET अधिकृत वेबसाइट वरील माहिती पुस्तिका (Information Bulletin) काळजीपूर्वक वाचा.
CTET उत्तीर्ण केल्यावर मला नोकरी मिळेल का?
CTET उत्तीर्ण होणे हे नोकरी मिळवण्याचा अधिकार नाही. ही एक पात्रता निकषांपैकी एक आहे.
CTET साठी किती वेळा परीक्षा देता येते?
CTET साठी प्रयत्नांची मर्यादा नाही.
CTET प्रमाणपत्राची वैधता किती वर्षांची आहे?
आता CTET प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर आहे. (सार्वजनिक सूचना: 21.06.2021)
CTET ची गुणपत्रक व प्रमाणपत्रे कशी मिळतील?
ती DigiLocker वर उपलब्ध असतात. आवश्यक माहिती भरून ती डाउनलोड करता येतात.
निष्कर्ष :
CTET ( केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा ) परीक्षेत हा बदल शिक्षकांसाठी एक मोठा सकारात्मक टप्पा आहे. भविष्यात शिक्षक भरती प्रक्रियेत गुणवत्ता, पारदर्शकता आणि नव्या पद्धतींना प्राधान्य दिलं जाणार आहे. त्यामुळे आता तयारी सुरु करा आणि नवीन स्वरूपात येणाऱ्या CTET परीक्षेसाठी सज्ज व्हा.
तुम्ही शिक्षक बनण्याची तयारी करत असाल तर, हीच योग्य वेळ आहे!