मित्रांनो, शिक्षण प्रक्रियेत “Akarik Mulyamapan Chachani In Marathi ” ही एक महत्वाची प्रक्रिया आहे . अध्ययन करत असतांना विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे, विद्यार्थ्यांच्या ज्ञानचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका वापरल्या जातात. आणि यामध्ये “आकारीक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका” ही एक महत्वाचे साधन आहे . आपण आजच्या या लेखात आकारीक मूल्यमापन (Akarik Mulyamapan) , त्याचे महत्व आणि प्रश्नपत्रिकाचे प्रकारची माहिती घेणार आहोत.
आकारीक मूल्यमापन म्हणजे काय ? | What Is Mean Formative Assessment
आकारीक मूल्यमापन म्हणजे शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची सतत प्रगती, व शिकण्याच्या पद्धतिचे निरीक्षण करणे होय. आकारीक मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मापन केले जाते ,त्यास सातत्यपूर्ण मूल्यमापन ( formative assessment ) होय .
या प्रकारच्या मूल्यमापन करतांना शिक्षक विद्यार्थ्यांची प्रगती पाहत असतात . यावर आधारित पुढील शिक्षणाची योजना शिक्षक करतात . मुख्यतः शिक्षक आकारीक मूल्यमापन ( Akarik Mulyamapan Chachani in marathi) विद्यार्थ्यांच्या सततच्या सहभागावर आणि त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत भर दिल जातो .
याचे महत्वाचे उदिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये सुधारणा करणे आणि शिक्षकांना त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे हाच उद्देश आहे .
आकारीक मूल्यमापनाचे महत्व | Akarik Mulyamapan Chachani In Marathi
आकारीक मूल्यमापन विद्यार्थी च्या शैक्षणिक प्रगती मोजण्याचे एक तंत्र आहे . यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न, उपक्रम, आणि इतर मूल्यांकन तंत्राचा समावेश असतो. यामुळे विद्यार्थीची आकलन क्षमता यांची सखोल माहिती मिळते. त्याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहे –
- विद्यार्थी प्रगती ओळख : आकारीक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या प्रगतीची स्थिति नियमित तपासली जाते. त्यामुळे शिक्षकांना सर्व विद्यार्थ्याची क्षमता , कौशल्ये व कमतरता विद्यार्थ्यांची लक्षात ठेवता येते .
- शिकण्याची पद्धत : मुले कोणत्या पद्धतीने शिकत आहेत. विद्यार्थी विषय समजून घेत आहेत का ? याचा अंदाज घेण्यासाठी शिक्षक आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका या तंत्राचा वापर करून त्वरित बदल घडवू शकतात .
- उत्साह वाढवणे : विद्यार्थी ची प्रगतीबद्दल सतत त्यांना माहिती दिली जाते . त्यामुळे विद्यार्थ्याचा उत्साह वाढतो . आणि मुल अधिक आत्मविश्वासाने शिकतात .
- विद्यार्थी मधील सुधार : आकारीक मूल्यमापन त्यांची कमतरता सुधारण्याची वारंवार संधि देते . विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रियामुळे ते स्वतः मध्ये अधिक सुधार करू शकतात .
- वैयक्तिक शिक्षण : आकारीक मूल्यमापन मुले विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत विकास करण्यास मदत करते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीनुसार शिक्षक सर्व विद्यार्थ्याची मदत देऊ शकतात .
- मुलांचा आत्मविश्वास वाढतो : जेव्हा विद्यार्थी चुका करतात आणि ओळखतात आणि त्या सुधारतात , तेव्हा विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत असतो. Akarik Mulyamapan हे सततचे होत असल्याने विद्यार्थी देखील सतत आपल्या चुका सुधारत असतात .
- तात्काळ प्रतिसाद : मुलांना त्यांच्या प्रगतीबद्दल त्वरित प्रतिसाद दिल जाऊ शकतो . आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका हे तंत्र ,साधन शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या चुका दाखवून देण्यासाठी मदत करत असते. मुलांना त्यांच्या सुधारणा करण्यास वाव मिळतो .
आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका कशा तयार कराव्यात ? | प्रश्न पत्रिका तयार करण्याचे घटक
आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका तयार करत असतांना शिक्षकांनी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे –
- प्रश्न स्पष्ट व संक्षिप्त द्या
- उद्दिष्ट निश्चित करा
- विविध प्रश्न प्रकार समावेश करा
- शैक्षणिक लक्षांना सुसंगत प्रश्न
- प्रतिसाद
- व्यवस्थित वेळ व्यवस्थापन
1. प्रश्न स्पष्ट व संक्षिप्त द्या
प्रश्न पत्रिका तयार करत असतांना प्रश्न असे असावेत की विद्यार्थ्यांना ते सोप्या पड्यातीने समजून घेत येतील. अवघड प्रश्न देणे टाळा .
2. उद्दिष्ट निश्चित करा
प्रश्नपत्रिका तयार करतांना सर्व प्रथम मूल्यांकनाचे उद्दिष्ट काय आहे ते ठरवा . तुम्हाला कोणत्या संकल्पनांचा अभ्यास करायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयांमध्ये प्रगती करावी हे ठरवा .
3. विविध प्रश्नप्रकार समावेश करा
प्रश्नपत्रिकेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न समाविष्ट करणे महत्वाचे आहे . उदा . वस्तुनिष्ठ प्रश्न , जोड्या लावा , लघुत्तरी प्रश्न , किंवा दीर्घ प्रश्न , अशा प्रश्न प्रकारांचा समावेश शिक्षकांनी करावा .
4. शैक्षणिक लक्षांना सुसंगत प्रश्न
प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लक्ष्यशी सुसंगत असावी लागते. त्याच्यामुळे मुलांना अभ्यासाच्या उद्दिष्टयचा पाठपुरावा देखील करता येतो .
5. प्रतिसाद
प्रश्नपत्रिका तयार करतांना प्रश्नपत्रिकेमधील प्रत्येक प्रश्न नंतर प्रतिसाद देण्याची सोय ठेवा . यामुळे काय होते , विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते आणि ते त्या चुका सुधारतात .
6. व्यवस्थित वेळचे व्यवस्थापन
प्रश्न पत्रिका बनवतांना किंवा आकारीक मूल्यमापन करतांना परक्षण पत्रिका मध्ये व्यवस्थित वेळेचे नियोजन करा . खूप लांब प्रश्नपत्रिका मुलांना कंटाळवाणी वाटू शकते हे लक्षयत ठेवावे लागते .
आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका स्वरूप | Formative Assessment
आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका हे शिक्षकांसाठी एक महत्वाचे तंत्र व साधन आहे . याचा मुख्य उद्देश फक्त विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे नसून मुलांच्या विचारशक्तीला अधिक वाव देणे हा आहे . प्रकार बघूया –
- विवेचनात्मक प्रश्न प्रकार
- बहुपर्यायी प्रश्न प्रकार
- सत्य व असत्य प्रश्न प्रकार
- संदर्भ आधारित प्रश्न प्रकार
१ .विवेचनात्मक प्रश्न प्रकार | Descriptive Questions
या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यंन आपले विचार आणि ज्ञान स्वतः चे मत मांडण्याची संधी देतात . जसे- “तुम्ही पाहिलेला संध्याकाळचा देखावा चे वर्णन करा “
२ .बहुपर्यायी प्रश्न प्रकार | MCQ Multiple Choice Questions
या प्रश्न प्रकारात मुलांना वेगवेगळ्या पर्याय देऊन योग्य उत्तर निवडण्याची संधि देतात .
३ .सत्य व असत्य प्रश्न प्रकार | True / False Questions
या प्रकारात मुलांना सत्य व असत्य ,चूक अचूक या प्रकारचे प्रश्न द्यावे . ह्या प्रश्नामुळे मुलांची त्वरित प्रतिक्रिया मिळविण्यासाठी उपयुक्त असतात .
४ .संदर्भ आधारित प्रश्न प्रकार | Contextual Questions
या प्रश्नमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या संदर्भातनुसार उत्तर द्यावे लागते. उदा – ” अचानक आलेल्या पुर परिस्थितीत तुम्ही काय कराल ? “
आकारीक मूल्यमापन चे फायदे | Akarik Mulyamapan Chachani In Marathi
- विद्यार्थ्यांना सतत त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया मिळते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे दोष, अडचणी सुधारण्याची संधि मिळते .
- आकारीक मूल्यमापन विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देते आणि शिकण्यात सातत्य ठेवते .
- मुलांच्या विविध कौशल्याचा अभ्यास करता येतो . आकारीक मूल्यमापन मुलांचे संपूर्ण शैक्षणिक विकासासाठी उपयुक्त ठरते .
- सतत प्रगतीचा आढावा घेऊन त्या विद्यार्थ्याला अधिक मार्गदर्शनाची गरज आहे हे लगेच समजते.
- प्रत्येक मूल हे वेगळ्या गतीने शिकत असते. आकारीक मूल्यमापन मधून शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार अध्ययन करता येते .
- आकारीक मूल्यमापन मध्ये सहकार्याने शिकण्याची संधी ही प्रत्येकाला मिळत असते . या मुलींमपणात मुलांना चर्चा करून अधीक एकमेकांना मदत होऊ शकते .
- सतत प्रश्नपत्रिकमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये सतत संवाद सुरू राहतो. मुलांना येणाऱ्या शंका मूल मोकळ्या पणाने विचारू शकतात . आणि शिक्षकांना त्यांचा प्रतिसाद देण्याची संधि मिळते .
आकारीक मूल्यमापन साठी वर्ग निहाय आणि विषय निहाय प्रश्नपत्रिका मिळवा
लवकरच आपल्या साठी आकारीक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका अपलोड करण्यात येतील . सर्व प्रश्न पत्रिका ह्या विद्यार्थ्यांच्या उद्दिष्ट आणि क्षमता विचारात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत .
DISCLAIMER : आपणास सर्वांना विनंती आहे की ह्या प्रश्नपत्रिका ह्या केवळ आणि केवळ आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या वैयक्तिक वापरासाठी वापरू शकता . अन्यथा कुठेही WHATSAPP ,ब्लॉग , किंवा YOUTUBE साठी कंटेंट तयार करण्यासाठी वापरायची परवानगी देत नाही .
इयत्ता आणि विषय | प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा |
---|---|
इयत्ता पहिली भाषा प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता पहिली गणित प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता पहिली इंग्रजी प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता आणि विषय | प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा |
---|---|
इयत्ता दुसरी भाषा प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता दुसरी गणित प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता दुसरी इंग्रजी प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता आणि विषय | प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा |
---|---|
इयत्ता तिसरी भाषा प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता तिसरी गणित प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता तिसरी इंग्रजी प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता तिसरी प. अभ्यास प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता आणि विषय | प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा |
---|---|
इयत्ता पहिली भाषा प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता चौथी गणित प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता चौथी इंग्रजी प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
इयत्ता चौथी प. अभ्यास प्रश्नपत्रिका | येथे क्लिक |
निष्कर्ष :
आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका ( Akarik Mulyamapan Chachani In Marathi ) ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी एक महत्वाचे आहे . या प्रश्नपत्रिकेद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर पाहणी लक्ष करू शकतो आणि मुलांच्या प्रगतीनुसार शिक्षणाची पद्धत सुधारू शकतो . आकारीक मूल्यमापन हे मुलांच्या समग्र विकासात भर पडते.
हेही वाचा :