बारावीनंतर सगळ्यात चांगले कोर्स कोणते आहेत? | After 12th With Course Is Best For Future 

After 12th With Course Is Best For Future : बारावीनंतर मी काय करू असा प्रश्न पडला आहे काय तुम्हाला? बारावीनंतर करिअरची चिंता आहे का? अशा सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आज या लेखातून तुम्हाला मिळणार आहे. 

 नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला या सर्व तुमच्या बारावीनंतर करिअर बाबतची चिंता दूर करणार आहे. आज मी तुम्हाला असे वेगवेगळे कोर्स सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला बारावीनंतर करिअर करण्यासाठी किंवा निवडण्यासाठी तुमचा मार्ग सोपा होणार आहे. 

12वी  नंतर कोणता कोर्स करावा? Course After 12 th 

कोर्स निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या? 

  • कोर्स निवडताना तुम्हाला कशाची आवड आहे हे ठरवून निवड करा. 
  • कोर्स निवडताना तुमची क्षमता काय आहे ते तपासा. 
  • आणि करिअरला घेऊन तुमची स्वतःची ध्येय काय आहे हे ठरवा.
  • लोकप्रिय कोर्सेस तर भरपूर आहेत, इतर लोक करतात म्हणून करू नका. भविष्यातील करियर संधी बघून कोर्स निवडा. 

तुमच्या करिअरची निवड करत असताना वरील दिलेले महत्त्वाचे गोष्टी लक्षात ठेवा आणि नंतरच करिअरचा निर्णय घ्या. 

काही प्रसिद्ध कोर्सेस ची यादी | After 12th with courses

तुम्हाला बारावीनंतर काही चांगल्या कोर्सेसची निवड करण्यासाठी चांगले आणि लोकप्रिय कोर्सेसची यादी खालील प्रमाणे दिली आहे – 

  1. इंजीनियरिंग / ENGINEERING 
  • बी ई : या कोर्समध्ये अनेक विशेषता निवड करता येतील .
  • बी टेक : या कोर्सेस मध्ये तुम्हाला मेकॅनिकल ,सिविल ,इलेक्ट्रिक आणि संगणक शास्त्र अशा ब्रांचेस निवडता येतील. फोर्स निवडून तुम्ही बांधकाम इंजिनियर, संगणक इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि मेकॅनिकल इंजिनिअर बनू शकतात.
  1. वैद्यकीय / medical course after 12th science 
  • MBBS : डॉक्टर बनण्यासाठी एमबीबीएस करावे लागते. परंतु त्यापूर्वी NEET ENTRANCE परीक्षा देणे आवश्यक असते. 
  • B.PHARM :  बी फॉर्म करून तुम्हाला विविध औषध कंपनीमध्ये औषध निर्माता म्हणून नोकरी लागू शकते. 
  • BDS : दातांचा डॉक्टर ( दंतवैद्यक) बनण्यासाठी बीडीएस करणे आवश्यक आहे. 
  • D.PHARM : डी फॉर्म चा डिप्लोमा करून तुम्हाला मेडिकलचा लायसन्स उपलब्ध होते आणि तुम्ही आरोग्य सेवक किंवा स्वतःच मेडिकल ओपन करू शकतात. 
  • DMLT : डी एम एल टी हा 18 महिन्याचा कोर्स करून तुम्हाला स्वतःचे रक्त लघवी सेंटर टाकता येते. तसेच ब्लड बँक ऑफिसर म्हणून तुम्ही सरकारी नोकरी करू शकता .
  • BCA : संगणक अनुप्रयोग करून तुम्ही विज्ञान क्षेत्रात प्राविण्य मिळवू शकतात. 
  • BSC NURSING : बीएससी नर्सिंग तीन वर्षाचा कोर्स करून तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात सरकारी राष्ट्रीय अभियानांतर्गत नोकरीसाठी पात्र होतात. त्याचप्रमाणे हॉस्पिटलमध्ये HEAD NURSE म्हणून तुम्ही काम करू शकता. 
  • B.SC : पर्यावरण शास्त्रात तुम्ही उत्तमरीत्या करिअर करू शकतात.  भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र गणित यामध्ये प्राविण्य मिळवून तुम्ही पुढील करिअरची संधी मिळू शकतात. 
  1. व्यवस्थापन / MANAGEMENT COURSE AFTER 12TH
  • BBA :  हा कोर्स करून तुम्ही कोणताही व्यवसाय प्रशासन करिअर करू शकतात.
  • MBA :  की हा  पदवीतर  स्तरावरील व्यवसाय व्यवस्थापन किंवा मॅनेजमेंटकरून व्यवसाय मध्ये करिअर करू शकतात. 
  1. कला / ARTS 
  • BA : मित्रांनो ARTS  मध्ये तुम्ही मानवशास्त्र ,इतिहास ,राज्यशास्त्र, मनोविज्ञान ,हिंदी, इतिहास मराठी, समाजशास्त्र,इंग्लिश अश्या विविध विषयांमध्ये कला पदवी प्रदान करू शकतात. माझं वैयक्तिक मत आहे जर तुम्हाला यूपीएससी किंवा एमपीएससी करायची असेल तर तुम्ही  कला हे क्षेत्र निवडले पाहिजे. 
  • LLB : पाच वर्षाचा किंवा तीन वर्षाचा एलएलबी कोर्स ( study of law after 12th ) करून तुम्ही उत्कृष्ट वकील बनू शकतात. यासाठी तुम्ही दहावी पास किंवा बारावी पास किंवा मग बीए असणे आवश्यक आहे.
  • BFA :  ललित कला मध्ये तुमचे करिअर करू शकतात.
  1. वाणिज्य / course after 12th commerce | abroad courses after 12th commerce
  • B.COM : सामान्य प्रकारचे वाणिज्य मध्ये तुम्ही बीकॉम करू शकतात. अकाउंटंट म्हणून तुम्हाला येथे संधी मिळू शकते. तसेच विविध हॉटेल्स आणि कंपन्यांमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते.
  • CA :  चार्ट अकाउंट बनण्यासाठी तुम्हाला सीए करणे आवश्यक आहे. how to became a CA .
  • CS  : मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये कंपनी सेक्रेटरी म्हणून तुम्हाला संधी मिळू शकते. 
  1. संगणक : computer course after 12th आताच्या डिजिटल युगात संगणक फार महत्त्वाचे आहे त्यामुळे संगणका संबंधित सर्व क्षेत्र हे भविष्यासाठी तुमची करिअरची संधी उत्तम रित्या उपलब्ध करून देऊ शकते. 
  2. डिझाईन: fashion designing courses after 12th
  • B.DES : फॅशन ग्राफिक उद्योग डिझाईन साठी हा कोर्स महत्त्वाचा आहे. आजचा हा ट्रेडिंग कोर्स आहे. 
  1.  हॉटेल व्यवस्थापन: / HOTEL MANAGEMENT course after 12th
  • BHM : हॉस्पिटलमध्ये काम करू शकता. 
  1. शिक्षण : EDUCATION diploma course after 12th
  • D.TED : शिक्षण क्षेत्रात शिक्षक डिप्लोमा म्हणून दोन वर्षाचा हा कोर्स असतो प्राथमिक शिक्षक म्हणून तुम्ही सरकारी नोकरी करू शकतात. याबाबत अधिक माहितीचा लेख आपण याआधी प्रसिद्ध केला आहे तो तुम्ही नक्की वाचा.
  • B.ED :  शिक्षण क्षेत्रातील बीएड हा पदवी कोर्स आहे. हा दोन वर्षाचा कोर्स आहे. हा कोर्स केल्यानंतर तुम्ही माध्यमिक शिक्षक म्हणून शिक्षण क्षेत्रात काम करू शकतात. 

सरकारी नोकरीच्या तयारीसाठी कोर्सेस | government competitives exams after 12th science

  • UPSC/MPSC : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी IAS,IPS, राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन तुम्ही चांगले करिअर व सरकारी नोकरी करू शकतात.
  •  बँकिंग कोर्सेस:  ज्यांनी बँकिंग कोर्सेस केलेले आहेत त्यांच्यासाठी IBPS, SBI ,PO/CLERK म्हणून उत्तम नोकरी मिळू शकते.
  •  रेल्वे भरती:  यामध्ये सुद्धा सरकारी नोकरी टेक्निशियन व ग्रुप डी संबंधित पदासाठी तुम्ही पात्र होऊ शकतात व आपले करिअर घडवू शकतात.

बारावीनंतर 2024 मध्ये नवीन लोकप्रिय कोर्सेस | best career option after 12th

 आजच्या तंत्रज्ञान आणि डिजिटल युगात अनेक करिअर उपलब्ध आहेत. तुम्हाला आधुनिक युगात टिकायचे असेल तर काहीतरी युनिक क्षेत्रात करिअर करावे लागेल त्यासाठी मी खालील पर्याय तुम्हाला सुचवत आहे-

  1. डेटा सायन्स आणि अनालिटी:  AI , मशीन लर्निंग यासारख्या क्षेत्रात तुम्ही उत्तम करिअर करू शकतात.
  2.  सायबर सिक्युरिटी:  आज पोलीस डिपार्टमेंट म्हणा किंवा देशाची सुरक्षा म्हणा आपल्याला ऑनलाइन सुरक्षिततेची वाढती गरज पाहता या क्षेत्रात तुम्हाला चांगली संधी उपलब्ध होऊ शकते.
  3.  रोबोटिक सायन्स विविध देशाचा व्यवसाय किंवा स्मार्ट तंत्रज्ञान विविध उद्योगांमध्ये वापर वाढत चालला आहे, त्यामुळे या क्षेत्रात तुम्ही चांगले करिअर करू शकता.

स्किल वर आधारित कोर्सेस | After 12th with course is best for future

  • व्हिडिओ एडिटिंग व फिल्म मेकिंग:  डिजिटल युगात OTT  हे प्लॅटफॉर्म लोकप्रिय आहे त्यामुळे या क्षेत्रात तुम्हाला संधी मिळू शकते.
  •  ॲनिमेशन/VFX :  आणि सिनेमा इंडस्ट्री मध्ये तुम्हाला करिअरची चांगली संधी उपलब्ध होऊ शकते. 
  • फॅशन डिझायनिंग:  आपल्या देशात आणि परदेशात फॅशन डिझाइनिंग या क्षेत्रात फार मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी करिअरची एक चांगली संधी असणार आहे.

परदेशात शिक्षणाची संधी व पर्याय काय आहे? | Abroad courses after 12th

  • STEM कोर्सेस : अमेरिका कॅनडा आणि जर्मनी सारख्या देशात तुम्हाला शिक्षण घेता येते.
  •   बिजनेस मॅनेजमेंट :  युनायटेड किंगडम किंवा ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जाऊन तुम्हाला हे कोर्सेस करता येतात.
  • आर्ट अँड फ्युमेनिटी :  युरोप सारख्या देशात लिबरल आर्ट ,इंटरनॅशनल रिलेशन्स सारखे कोर्सेस तुम्ही करू शकतात. 

काही महत्त्वाची सूचना | CAREER IDEAS 

मित्रांनो, तुमच्याकडे कुठलीही डिग्री असली तरी त्याला अधिक महत्त्व नाही आज-काल तुमच्या स्किल्ल जास्त महत्त्व दिले जाते. त्याचप्रमाणे तुमचा अनुभव आणि कम्युनिकेशन हे तुमच्या करिअरसाठी फार मोठी भूमिका बजावत असतात. करियर निवडत असताना तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून लक्षात ठेवल्या पाहिजे .असे माझे वैयक्तिक मत आहे. 

CONCLUSION: 

मित्रांनो, अशा वरीलपैकी विविध लोकप्रिय अशा कोर्सेस After 12th with course is best for future ची माहिती आपण निवडलेली आहे अशी आशा करते आणि भविष्यात तुमची आवडी क्षमता मार्केट डिमांड काय आहे यावर अवलंबून तुम्हाला संधी मिळू शकते. म्हणून तुम्ही तुमचे आवडीचे क्षेत्राच्या अभ्यासक्रम निवडा असं मी सांगेल.

 तुम्हाला कोणत्या क्षेत्रात जास्त रुची आहे मला  कमेंट करून सांगा  मी तुम्हाला अधिक मार्गदर्शन करू शकते. 

 सर्वांना बारावीनंतर योग्य कोर्स निवडणे हे सगळ्यात मोठे पाऊल असते. कारण तुमच्या आवडीनिवडी क्षमता भविष्यातील मागणीवर लक्ष केंद्रित करून निर्णय घ्यावा लागतो. सायन्स ,कॉमर्स ,आर्ट डिप्लोमा यावरील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला संधी आहेत. परंतु तुम्हाला योग्य मार्गदर्शन घेऊन तुमच्या स्वप्नांचे करिअरची सुरुवात करायची आहे. हा लेख तुम्हाला उपयुक्त वाटले शेअर करा आणि तुमचे विचार कमेंट्स मध्ये सांगा. 

1 thought on “बारावीनंतर सगळ्यात चांगले कोर्स कोणते आहेत? | After 12th With Course Is Best For Future ”

Leave a Comment