जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इ ६ वी अर्ज करा | Admission To Class 6th in JNVS

WhatsApp Group Join Now

Admission To Class 6th in JNVS : भारत सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (1986) अन्वये जवाहर नवोदय विद्यालयाची JNVs स्थापना केली. सध्या हे विद्यालये 27 राज्यांमध्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत आहे. ही शाळा संपूर्णपणे निवासी आणि सहशिक्षणात्मक असून भारत सरकारच्या “नवोदय विद्यालय समिती” या स्वायत्ते संस्थेद्वारे पूर्णपणे आर्थिक दृष्ट्या सहाय्यित व प्रशासित आहे. 

जवाहर नवोदय विद्यालय | how to apply to JNVST class 6th admission

इयत्ता सहावी मध्ये प्रवेश (जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी) द्वारे घेतला जातो. इयत्ता आठवी पर्यंत मातृभाषा किंवा प्रादेशिक भाषा हे माध्यम असून त्यानंतर गणित व विज्ञानासाठी इंग्रजी तर सामाजिक शास्त्रासाठी हिंदीमध्ये वापरले जाते. 

विद्यार्थी CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) च्या परीक्षा देतात. शाळांमध्ये शिक्षण वस्ती गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे सर्व खर्च मोफत आहेत. इयत्ता नववी ते बारावीच्या(९वी ते १२वी) विद्यार्थ्यांकडून विद्यालय विकास निधी VVN म्हणून दरमहा 600 रुपये घेतले जातात.

केंद्र सरकारच्या नियमानुसार, दिव्यांग सर्व मुली व बीपीएल कुटुंबातील विद्यार्थ्यांना या शुल्कातून सूट दिली जाते. मात्र इतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना दरमहा 1500/- किंवा प्रत्यक्षात मिळणारा बाल शिक्षण भत्ता यापैकी जे कमी असेल ते शुल्क भरावे लागते पण VVN शुल्क 600 रुपये पेक्षा कमी नसावा.

योजनेची उद्दिष्टे | what is jnvst exam class 6th 2026

  1. ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे आधुनिक शिक्षण देणे ज्यामध्ये संस्कृतीचा घटक नैतिक मूल्याची जाणीव पर्यावरणाचे जागरूकता,साहसी उपक्रम व शारीरिक शिक्षणाचा समावेश असतो. 
  2. विद्यार्थ्याने तीन भाषांमध्ये विविध स्तरावर प्राविण्य मिळवणे हे सुनिश्चित करणे. 
  3. हिंदी व अहिंदी भाषिक राज्यातील विद्यार्थ्यांनी देवाण-घेवाण करून राष्ट्रीय एकात्मता वाढवणे. 
  4. प्रत्येक जिल्ह्यातून इतर शाळांचा गुणवत्ता सुधारण्यात योगदान देणारे केंद्र म्हणून कार्य करणे.

राज्य केंद्रशासित प्रदेशानुसार जवाहर नवोदय विद्यालयाचे वितरण 

नवोदय विद्यालय योजनेनुसार प्रत्येक जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने एक जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करण्यात येते. सध्या 27 राज्य व आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 654 विद्यालय कार्यरत आहेत. खालील तक्त्यात राज्य केंद्रशासित प्रदेशानुसार कार्यरत विद्यालयांची संख्या दिली आहे: how many jnvst schools in india ?

Sr.noState No.of.jnvsSr.noStateNo.of jnvs
आंध्र प्रदेश१३+२१९ मध्यप्रदेश५१+०२+१
अरुणाचल प्रदेश१७२० महाराष्ट्र३३+०१
आसाम२८+०१२१ मणिपूर०९+०२
बिहार३८+०१२२ मेघालय११+०१
चंदीगड UT२३ मिझोराम
चंदीगड२७+०१२४ नागालँड११
दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दिव UT२५ ओडिसा३०+०१
दिल्ली Ut२+३२६ पंडिचेरी (केंद्रशासित)
गोवा२७पंजाब२२+०१
१०गुजरात३३+०१२८राजस्थान३३+०२
११हरियाणा२१२९सिक्कीम
१२हिमाचल प्रदेश१२३०तेलंगाना
१३जम्मू अँड काश्मीर (केंद्रशासित)१९+०१३१त्रिपुरा
१४झारखंड२४+०२३२केंद्रशासित अंदमान आणि निकोबार बेट
१५कर्नाटका३०+०१३३ उत्तर प्रदेश७५+०१
१६केरळ१४३४उत्तराखंड१३
१७लदाख (केंद्रशासित)३५वेस्ट बंगाल१७+०१
१८ लक्षद्वीप (केंद्रशासित)
Admission To Class 6th in JNVS (jnvst samiti)

Total ६३१+२०+३= ६५४

टीप :

  • अतिरिक्त विद्यालय अनुसूचित जाती जमातीचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आली १८ आहेत. 
  • म्हणजे विशेष नवोदय विद्यालय. 

प्रवेश संख्या व मर्यादा | jnvst admission notification

प्रत्येक नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी कमाल 80 विद्यार्थी प्रवेश दिला जातो. परंतु आवश्यकतेनुसार ही संख्या 40 पर्यंत कमी केली जाऊ शकते. 

महत्त्वाची टीप: 

देशभरात एकूण 689 नवोदय विद्यालय मंजूर आहेत तामिळनाडू वगळता. खालील सहा जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालय मंजूर नाहीत कारण हे शंभर टक्के नागरी लोकसंख्येचे आहेत: 

  1. सेंट्रल दिल्ली 
  2. नवी दिल्ली 
  3. हैदराबाद 
  4. कोलकाता 
  5. मुंबई 
  6. मुंबई उपनगर

Read more :

NEP 2020 NEW NATIONAL EDUCATION POLICY

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST 2026 )

इयत्ता सहावी प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी 2026- 27 या शैक्षणिक क्षेत्रासाठी दोन टप्प्यात घेतली जाईल.

 पहिला टप्पा: 

शनिवार १३ डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता 

खालील राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये परीक्षा होईल. 

आंध्र प्रदेश ,आसाम, अरुणाचल प्रदेश (दिवांग वेली आणि तवांग जिल्हा वगळता ) बिहार, छत्तीसगड, गोवा ,गुजरात, हरियाणा ,हिमाचल प्रदेश (चंपाक ,किनोर ,मंडी, शिरमोर, कुल्लू ,लाहोल ,स्थिती ,सोलर आणि शिमला जिल्हे वगळता.) जम्मू काश्मीर फक्त (जम्मू एक जम्मू दोन साम व उधमपूर ) झारखंड ,केरळ ,कर्नाटक ,मध्य प्रदेश ,महाराष्ट्र मणिपूर ,ओडिसा ,पंजाब, राजस्थान त्रिपुरा ,तेलंगणा, उत्तर प्रदेश ,उत्तराखंड ,पश्चिम बंगाल (दार्जीलिंग वगळता) आणि खालील केंद्रशासित प्रदेश. 

  • अंदमान निकोबार 
  • चंदीगड 
  • दादरा नगर हवेली व दमणदीव
  • दिल्ली 
  • लक्षद्वीप 
  • पांडुचेरी 

दुसरा टप्पा :

शनिवार 11 एप्रिल 2026 रोजी 11:30 वाजता 

खालील राज्य जिल्ह्यामध्ये परीक्षा होईल: 

जम्मू व काश्मीर( जम्मू एक जम्मू दोन सांभा व उदमपूर वगळता )मेघालय ,मिझोरम ,नागालँड, सिक्कीम ,अरुणाचल प्रदेशचे (दिव्यांग वेली आणि तवांग जिल्हे) हिमाचल प्रदेशचे (चंपा, किनोर मंडी, सिरमोर कुल्लू लाहोल स्पीती, सोलन व शिमला जिल्हे )पश्चिम बंगालचा (दार्जिलिंग जिल्हा लढा )केंद्रशासित प्रदेशातील लेह आणि कारगिल जिल्हे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख | last date of jnvst admission 2026

Admission To Class 6th in JNVS साठी ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया: 

  • नोंदणी प्रक्रिया मोफत व सोपी आहे. या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरता येईल. 
  • उमेदवार व पालकांनी संपूर्ण अधिसूचना व माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे. 
  • नोंदणीसाठी आवश्यक डिजिटल दस्तावेज जेपीजी फॉरमॅट 10 ते 100 केबी तयार करून ठेवावे.
    • विद्यार्थ्याचा फोटो 
    • पालकाची सही 
    • आधार तपशील किंवा निवासी प्रमाणपत्र
  • Admission To Class 6th in JNVS अर्ज करताना पुढील तपशील भरावा लागेल: 
  • राज्य जिल्हा तालुका आधार क्रमांक क्रमांक इत्यादी. 
  • नोंदणीसाठी कोणत्याही दिवाळीचा मोबाईल लॅपटॉप टॅब वापर करता येईल. 
  • सर्व जवाहर नवोदय विद्यालयांमध्ये मोफत सहाय्य डेस्क उपलब्ध असतील. 
  • अर्ज भरताना पुरवलेली माहिती बरोबर असणे आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते. 
  • ओबीसी उमेदवारांनी केवळ केंद्र सरकारच्या ओबीसी यादीतील प्रमाणपत्र सादर करावे. राज्य यादी मान्य होणार नाही. 
  • अर्जामध्ये निवडलेला शालेय क्षेत्र गाव शहर काळजीपूर्वक भरावा. इयत्ता तिसरी चौथी व पाचवीच्या शाळेचे क्षेत्र महत्त्वाचे ठरते.

प्रवेश पत्र admit card

  • प्रवेश पत्र ही नवोदय विद्यालय समिती ठरवलेल्या तारखेनुसार अर्ज पोर्टलवर उपलब्ध करून दिली जातील. 
  • विद्यार्थ्यांनी पालकांनी ती मोफत डाऊनलोड करावी. 
  • Admission To Class 6th in JNVS 2026 च्या परीक्षेसाठी प्रवेश पत्र बंधनकारक आहे. त्याशिवाय परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. 

निवड चाचणीचा निकाल: 

  • उन्हाळी विभागातील नवोदय विद्यालयासाठी निकाल मार्च २०२६ अखेरीज जाहीर होण्याची शक्यता आहे. 
  • हिवाळी विभागासाठी निकालने 2026 मध्ये अपेक्षित आहे. 
  • निकाल खालील ठिकाणी उपलब्ध असेल. 
  • संबंधित जवाहर नवोदय विद्यालयाच्या कार्यालयात. 
  • जिल्हाधिकारी कार्यालयात 
  • संबंधित विभागातील नवोदय विद्यालय समितीचे उपायुक्त कार्यालया 
  • नवोदय विद्यालय समितीचे अधिकृत वेबसाईट – https://cbseitms.rcil.gov.in/nvs/
  • संबंधित विद्यालयाचा मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर फोन करून कळवतील तसेच स्पीड पोस्टद्वारे पत्र पाठवतील.
  • जर काही विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला किंवा आवश्यक प्रमाणपत्र सादर केली नाही तर फक्त दोन प्रतिक्षा यादी प्रसिद्ध केल्या जाते. 
  • संपूर्ण प्रवेश प्रक्रिया 31 डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण केली जाईल. 

पात्रता निकष: Admission To Class 6th in JNVS

  • इयत्ता सहावी प्रवेश जिल्हा निहाय दिला जातो. ज्या जिल्ह्यातील शाळेत उमेदवार इयत्ता पाचवी शिकतो आहे त्या जिल्ह्यातील जवाहर नवोदय विद्यालय साठी अर्ज करता येतो. 
  • उमेदवाराला त्या जिल्ह्यात वास्तविक राहणे बंधनकारक आहे. 
  • अर्ज करताना व निवडीनंतर मूळनिवासी प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. 
  • उमेदवारांनी शैक्षणिक सत्र 2025 26 मध्ये इयत्ता पाचवी कोणत्याही सरकारी सरकारी मान्यता प्राप्त अनुदानित शाळेत शिकलेले असावे. 
  • जे विद्यार्थी 2025 26 पूर्वी इयत्ता पाचवी उत्तीर्ण झाले आहेत किंवा पुनरावृत्ती करत आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही. 

नवोदय समितीकडे मागील वर्षाच्या डेटाचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा अधिकार आहे. पुनरावृत्ती करणारे उमेदवार ओळखले गेले तर त्यांचा प्रवेश नाकारला जाईल. 

वयोमर्यादा: 

  • उमेदवाराचा जन्म एक मे 2014 ते 31 जुलै 2016 दरम्यान झालेला असावा. 
  • जन्माचा सरकारी प्रमाणपत्र जन्म दाखला सादर करणे आवश्यक आहे. 
  • एसटी एससी ओबीसी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हीच मर्यादा लागू आहे. 
  • साथिया पद उमेदवाराच्या बाबतीत उमेदवाराला वैद्यकीय मंडळाकडे पाठवले जाईल आणि त्यांचा निर्णय अंतिम राहील. 

शैक्षणिक पात्रता: Admission To Class 6th in JNVS

  • उमेदवाराने संपूर्ण शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये इयत्ता पाचवी शिकलेले असावे. 
  • ही शाळा सहकारी सरकारी अनुदानित मान्यता प्राप्त एनआयओएस द्वारा मान्यता प्राप्त असावी. 
  • ज्या उमेदवाराने इयत्ता पाचवी 31 जुलै 2025 पूर्वी उत्तीर्ण केलेली नाही त्यांना अर्ज करता येणार नाही. 
  • पूर्वी इयत्ता पाचवी शिकलेले उमेदवार पात्र नाहीत. 
  • एनआयओएस NIOS च्या B प्रमाणपत्र धारक विद्यार्थ्यांसाठी शाळेला NIOS ची मान्यता असावी.
  • इयत्ता 3,4आणि 5 सलगपणे सरकारी मान्यता प्राप्त शाळेत शिकलेल्या असावे.
  • एन आय ओ एस चेक बी प्रमाणपत्रधारक विद्यार्थी जर 15 सप्टेंबर 2025 पूर्वी प्रमाणपत्र घेतले असेल आणि योग्य वयोगटात असतील तर पात्र असतील. 
  • मात्र शहरी भागातील विद्यार्थी ग्रामीण कोट्यातील जागांसाठी पात्र नाही. 
  • एनआयओएस विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण शहरी स्थिती ठरवताना पालकांच्या वास्तव्याचे ठिकाण लक्षात घेतले जाईल. 
  • कोणताही विद्यार्थी दुसऱ्यांदा जे एन व्ही एस टी ला अर्ज करू शकत नाही. 
  • अर्जामधील माहिती पडताळली जाईल आणि जर पुनरावृत्ती करणारा उमेदवार आढळला तर त्याची उमेदवारी रद्द केली जाईल. 
  • अशा उमेदवारांना प्रवेश पत्र देखील दिले जाणार नाही. 

आधार संदर्भातील सूचना: 

  • नवोदय योजनेअंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. 
  • जर आधार क्रमांक नसेल तर पालकांच्या संमतीने आधार नोंदणी करणे बंधनकारक आहे. 
  • आधार नोंदणीसाठी जवळच्या आधार केंद्रात किंवा जवाहर नवोदय विद्यालयात सुविधा उपलब्ध आहे. 
  • उमेदवार व पालकांची माहिती आधार डेटा शी जोडली पाहिजे. गरज असल्यास आधार मध्ये सुधारणा करावी. 
  • आधार नसलेल्या विद्यार्थ्यांनी पालकांचे निवासी प्रमाणपत्र अपलोड करून अर्ज सादर करता येतो. पण निवडीच्या वेळी आधार कार्ड सादर करणे अनिवार्य आहे. 

PROSPECTUS 2026 वाचण्यासाठी येथे क्लिक करा . (Admission To Class 6th in JNVS)

ग्रुप जॉईन करा !