आदिवासी पावरा भाषा शिका | Adivasi Pawara Language Household Things Phrasebook

Adivasi Pawara Language Household Things Phrasebook: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचे हे आपला तिसरा लेख आहे. यापूर्वी आपण आदिवासी पावरा भाषा शिका मराठीत अगदी सोप्या भाषेत चे दोन लेख वाचावेत. नंतर हा तिसरा लेख आहे तो वाचवा. कारण step by step learn adivasi pawara language learn करायला शिकत आहोत.

मित्रांनो , आजचा आपला तिसरा लेख हा आदिवासी पावरा भाषेत वापरली जाणारी गृहोपयोगी वस्तूची नावे कशी वापरली जातात हे शिकणार आहोत व त्यावरील उदाहरणे देखील पाहणार आहोत .

आदिवासी पावरा भाषेत घरातील वस्तूची नावे कशी वापरावीत | How To Use Adivasi Pawara Language Household Things Phrasebook

कोणतीही भाषा शिकण्यासाठी आवश्यक असते भरपूर शब्द साठा ( Household Things Phrasebook ) खाली दिलेल्या तक्ताचा वापर करून उदहरणसह भाषा शिकणार आहोत .

मराठी नाव शहादा कडे धडगाव कडे निंबाडी भाषेत
टेबल टेबल टेबल टेबल
खुर्ची कुळची कुळची कुळची
खिडकी खिडकी खिडकी खिडकी
दरवाजा जुपू जुपू जुपलू / जोपलू
दोरी दुवडी / दुवडो दुवडी दुवडी
ओटा उटलू उटलू उटलू
ग्लास गिलास गिलास गिलास
तांब्या कोवहयू कोलहयु कोवहयू
ताट थाट थाट थाट
वाटी वाटकी वाटकी वाटकी
पातेले तोपलो तोपलो तोपलो
माठ कुंडो कुंडो गुवो
डब्बा डोब्बो डोब्बो डोब्बो
चिमटा सांची सांची सांची
टिफिन टीपोण टीपोण टीपोण
चमचा चोमचो / कोढची चोमचो / कोढची चोमचो / कोढची
गिरणी चोक्की चोक्की चोक्की
पाट पाटळू पाटळूपाटळू
तवा तोवू तोवूतोवू
हंडी आंडी आंडी आंडी
चूल चुलू चुलू चुलू
Adivasi Pawara Language Household Things Phrasebook

वरील शब्द वापरुन वाक्य तयार करूया Adivasi Pawara Language Household Things Phrasebook

  1. टेबलावर ग्लास ठेव . – टेबल पोर गिलास मेक ( मेक म्हणजे ठेवणे – आदिवासी पावरा भाषा )
  2. खिडकी बंद कर . – खिडकी बंद कर दे .
  3. दरवाजा उघडून दे . – जुपू उगाळ दे ( उगाळ म्हणजे उघडणे )
  4. चमच्याने भाजी काढ . – कोंढची कोरीन उलोण काड .( उलोण म्हणजे भाजी )
  5. ताटात भात आणि वाटीत खीर वाढ. – ताटो मा कुदरी ने वाटकी मा खीर आप . ( आप म्हणजे वाढून दे. व कुदरी म्हणजे भात )
  6. तांब्यात पाणी नेऊन दे . – कोवहयामा पाणी लाविन आप ( लाविण आप म्हणजे आणून दे .)
  7. गरम पातेले चिमटयाने उचल . – ताटलो तोपलो सांची कोरीन चुट . ( चुटणे म्हणजे उचलणे , ताटलो म्हणजे गरम )
  8. भाकरी करतांना पाटावर बसून कर . – पाटळा पोर बोठिण रुटु रांध . ( रांध म्हणजे स्वयंपाक कर . व बोठिण म्हणजे बसून )
  9. वरण , भात , आणि पोळी टिफिन मध्ये भर . – वरण, कुदरी ने रुटु टिपणा मा भोर . (
  10. बाजरी गिरणीत दळून आण . – बाजरा चोक्की मा दोविन लाव – ( दोविण लाव म्हणजे दळून आण )
  11. माठातील थंड पाणी पी . – कुंडा मायलो हेववो पाणी पिजी . ( मायलो म्हणजे मधील , हेववो म्हणजे थंड )
  12. ओट्यावर अभ्यासाला बस . – अभ्यासोह उतला पोर बोठ . ( पोर बोठ म्हणजे च्या वर बस. )
  13. ओले कपडे दोरीवर सुकव . – तिदला लुगडा दुवडी पोर हुकाड . ( तिदला म्हणजे ओले , व हुकाड म्हणजे सुकव . )
  14. पापड डब्ब्यात भरून ठेव .पापडे डोबामा भोरीन मेक . ( भोरीन मेक म्हणजे भरून ठेव )

मित्रांनो , वरील वाक्याचा जास्तीत जास्त सराव करावा. काही शंका , अडचण आल्यास नक्कीच comment करा. आणि तुमच्या मनाने अजून वरील सारखे Adivasi Pawara Language Household Things Phrasebook शब्द वापरुन 5 वारी वाक्य कमेन्ट मध्ये करण्याचा प्रयत्न करा. मलाही वाटेल की तुम्ही सराव करत आहात . भविष्यात आपण language learn app देखील आणणार आहोत .

घरातील इतर वस्तु ची अजून काही नावे आहेत ती पाहूया

  • बाथरूम मधील वस्तु
  • हॉल मधील वस्तु
  • किचन मधील वस्तु
  • बेडरूम मधील वस्तु

बाथरूम मधील वस्तु | Bathroom Things Name In Pawara Language

मराठी शहादा धडगाव निंबाडी भाषा
साबण हांबू हांबू हांबू
टॉवेल रुमाल रुमाल रुमाल
नळ नोळ नोळ नोळ
टप टोप टोप टोप
बादली बादली बादली बादली
मग मोग्गो मोग्गो मोग्गो

हॉल मधील वस्तु | Hall Things Name In Adivasi Pawara Language

मराठी शहादा धडगाव निंबाडी भाषा
टी वि टी वि टी वि टी वि
सोफा सोफू सोफू सोफू
टी पाई टी पाई टी पाई टी पाई
फोटो फुटुक फुटुक फुटुक
पडदे पडदू पडदू पडदू
किचन झुंबर झुंबर झुंबर
फुलदणी फुलदणी फुलदणी फुलदणी
Adivasi Pawara Language Household Things Phrasebook

किचन मधील वस्तु

मराठी शहादा धडगाव निंबाडी भाषा
फ्रीज फ्रीज फ्रीज फ्रीज
रॅक रॅक रॅक रॅक
मिक्सर् मिक्सर् मिक्सर् मिक्सर्
देवारा देवबाबा देवबाबादेवबाबा
Adivasi Pawara Language Household Things Phrasebook

बेडरूम मधील वस्तु | BEDROOM THINGS NAME IN ADIVASI PAWARA LANGUAGE

मराठी शहादा धडगाव निंबाडी भाषा
बेडशिट बेडशिट बेडशिट
उशी तोकयो तोकयो तोकयो
पलंग पलंग पलंग पलंग
कपाट कपाट कपाट कपाट
आरसा आरहू आरहू आरशु

हेही वाचा :

आदिवासी पावरा भाषा शिका सोप्या आणि साध्या मराठी भाषेत