आकारीक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका | Akarik Mulyamapan Chachani In Marathi

मित्रांनो, शिक्षण प्रक्रियेत “Akarik Mulyamapan Chachani In Marathi ” ही एक महत्वाची प्रक्रिया आहे . अध्ययन करत असतांना विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे, विद्यार्थ्यांच्या ज्ञानचे मूल्यमापन करण्यासाठी अनेक प्रकारच्या प्रश्नपत्रिका वापरल्या जातात. आणि यामध्ये “आकारीक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका” ही एक महत्वाचे साधन आहे . आपण आजच्या या लेखात आकारीक मूल्यमापन (Akarik Mulyamapan) , त्याचे महत्व आणि प्रश्नपत्रिकाचे प्रकारची माहिती घेणार आहोत.

Table of Contents

आकारीक मूल्यमापन म्हणजे काय ? | What Is Mean Formative Assessment

आकारीक मूल्यमापन म्हणजे शिक्षणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांची सतत प्रगती, व शिकण्याच्या पद्धतिचे निरीक्षण करणे होय. आकारीक मूल्यमापन म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मापन केले जाते ,त्यास सातत्यपूर्ण मूल्यमापन ( formative assessment ) होय .

या प्रकारच्या मूल्यमापन करतांना शिक्षक विद्यार्थ्यांची प्रगती पाहत असतात . यावर आधारित पुढील शिक्षणाची योजना शिक्षक करतात . मुख्यतः शिक्षक आकारीक मूल्यमापन ( Akarik Mulyamapan Chachani in marathi) विद्यार्थ्यांच्या सततच्या सहभागावर आणि त्यांच्या शिक्षण प्रक्रियेत भर दिल जातो .

याचे महत्वाचे उदिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना शिकण्यामध्ये सुधारणा करणे आणि शिक्षकांना त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये बदल करणे हाच उद्देश आहे .

आकारीक मूल्यमापनाचे महत्व | Akarik Mulyamapan Chachani In Marathi

आकारीक मूल्यमापन विद्यार्थी च्या शैक्षणिक प्रगती मोजण्याचे एक तंत्र आहे . यामध्ये विविध प्रकारचे प्रश्न, उपक्रम, आणि इतर मूल्यांकन तंत्राचा समावेश असतो. यामुळे विद्यार्थीची आकलन क्षमता यांची सखोल माहिती मिळते. त्याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहे –

  • विद्यार्थी प्रगती ओळख : आकारीक मूल्यमापन विद्यार्थ्यांच्या प्रगतीची स्थिति नियमित तपासली जाते. त्यामुळे शिक्षकांना सर्व विद्यार्थ्याची क्षमता , कौशल्ये व कमतरता विद्यार्थ्यांची लक्षात ठेवता येते .
  • शिकण्याची पद्धत : मुले कोणत्या पद्धतीने शिकत आहेत. विद्यार्थी विषय समजून घेत आहेत का ? याचा अंदाज घेण्यासाठी शिक्षक आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका या तंत्राचा वापर करून त्वरित बदल घडवू शकतात .
  • उत्साह वाढवणे : विद्यार्थी ची प्रगतीबद्दल सतत त्यांना माहिती दिली जाते . त्यामुळे विद्यार्थ्याचा उत्साह वाढतो . आणि मुल अधिक आत्मविश्वासाने शिकतात .
  • विद्यार्थी मधील सुधार : आकारीक मूल्यमापन त्यांची कमतरता सुधारण्याची वारंवार संधि देते . विद्यार्थ्यांच्या या प्रतिक्रियामुळे ते स्वतः मध्ये अधिक सुधार करू शकतात .
  • वैयक्तिक शिक्षण : आकारीक मूल्यमापन मुले विद्यार्थ्याच्या व्यक्तिगत विकास करण्यास मदत करते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रगतीनुसार शिक्षक सर्व विद्यार्थ्याची मदत देऊ शकतात .
  • मुलांचा आत्मविश्वास वाढतो : जेव्हा विद्यार्थी चुका करतात आणि ओळखतात आणि त्या सुधारतात , तेव्हा विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत असतो. Akarik Mulyamapan हे सततचे होत असल्याने विद्यार्थी देखील सतत आपल्या चुका सुधारत असतात .
  • तात्काळ प्रतिसाद : मुलांना त्यांच्या प्रगतीबद्दल त्वरित प्रतिसाद दिल जाऊ शकतो . आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका हे तंत्र ,साधन शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या चुका दाखवून देण्यासाठी मदत करत असते. मुलांना त्यांच्या सुधारणा करण्यास वाव मिळतो .

आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका कशा तयार कराव्यात ? | प्रश्न पत्रिका तयार करण्याचे घटक

आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका तयार करत असतांना शिक्षकांनी खाली दिलेल्या गोष्टी लक्षात ठेवणे महत्वाचे आहे –

  • प्रश्न स्पष्ट व संक्षिप्त द्या
  • उद्दिष्ट निश्चित करा
  • विविध प्रश्न प्रकार समावेश करा
  • शैक्षणिक लक्षांना सुसंगत प्रश्न
  • प्रतिसाद
  • व्यवस्थित वेळ व्यवस्थापन

1. प्रश्न स्पष्ट व संक्षिप्त द्या

प्रश्न पत्रिका तयार करत असतांना प्रश्न असे असावेत की विद्यार्थ्यांना ते सोप्या पड्यातीने समजून घेत येतील. अवघड प्रश्न देणे टाळा .

2. उद्दिष्ट निश्चित करा

प्रश्नपत्रिका तयार करतांना सर्व प्रथम मूल्यांकनाचे उद्दिष्ट काय आहे ते ठरवा . तुम्हाला कोणत्या संकल्पनांचा अभ्यास करायचं आहे आणि विद्यार्थ्यांनी कोणत्या विषयांमध्ये प्रगती करावी हे ठरवा .

3. विविध प्रश्नप्रकार समावेश करा

प्रश्नपत्रिकेमध्ये विविध प्रकारचे प्रश्न समाविष्ट करणे महत्वाचे आहे . उदा . वस्तुनिष्ठ प्रश्न , जोड्या लावा , लघुत्तरी प्रश्न , किंवा दीर्घ प्रश्न , अशा प्रश्न प्रकारांचा समावेश शिक्षकांनी करावा .

4. शैक्षणिक लक्षांना सुसंगत प्रश्न

प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक लक्ष्यशी सुसंगत असावी लागते. त्याच्यामुळे मुलांना अभ्यासाच्या उद्दिष्टयचा पाठपुरावा देखील करता येतो .

5. प्रतिसाद

प्रश्नपत्रिका तयार करतांना प्रश्नपत्रिकेमधील प्रत्येक प्रश्न नंतर प्रतिसाद देण्याची सोय ठेवा . यामुळे काय होते , विद्यार्थ्यांना त्यांच्या चुकीची जाणीव होते आणि ते त्या चुका सुधारतात .

6. व्यवस्थित वेळचे व्यवस्थापन

प्रश्न पत्रिका बनवतांना किंवा आकारीक मूल्यमापन करतांना परक्षण पत्रिका मध्ये व्यवस्थित वेळेचे नियोजन करा . खूप लांब प्रश्नपत्रिका मुलांना कंटाळवाणी वाटू शकते हे लक्षयत ठेवावे लागते .

आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका स्वरूप | Formative Assessment

आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका हे शिक्षकांसाठी एक महत्वाचे तंत्र व साधन आहे . याचा मुख्य उद्देश फक्त विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे मूल्यमापन करणे नसून मुलांच्या विचारशक्तीला अधिक वाव देणे हा आहे . प्रकार बघूया –

  1. विवेचनात्मक प्रश्न प्रकार
  2. बहुपर्यायी प्रश्न प्रकार
  3. सत्य व असत्य प्रश्न प्रकार
  4. संदर्भ आधारित प्रश्न प्रकार

१ .विवेचनात्मक प्रश्न प्रकार | Descriptive Questions

या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यंन आपले विचार आणि ज्ञान स्वतः चे मत मांडण्याची संधी देतात . जसे- “तुम्ही पाहिलेला संध्याकाळचा देखावा चे वर्णन करा

२ .बहुपर्यायी प्रश्न प्रकार | MCQ Multiple Choice Questions

या प्रश्न प्रकारात मुलांना वेगवेगळ्या पर्याय देऊन योग्य उत्तर निवडण्याची संधि देतात .

३ .सत्य व असत्य प्रश्न प्रकार | True / False Questions

या प्रकारात मुलांना सत्य व असत्य ,चूक अचूक या प्रकारचे प्रश्न द्यावे . ह्या प्रश्नामुळे मुलांची त्वरित प्रतिक्रिया मिळविण्यासाठी उपयुक्त असतात .

४ .संदर्भ आधारित प्रश्न प्रकार | Contextual Questions

या प्रश्नमध्ये विद्यार्थ्यांना दिलेल्या संदर्भातनुसार उत्तर द्यावे लागते. उदा – ” अचानक आलेल्या पुर परिस्थितीत तुम्ही काय कराल ?

आकारीक मूल्यमापन चे फायदे | Akarik Mulyamapan Chachani In Marathi

  • विद्यार्थ्यांना सतत त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया मिळते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे दोष, अडचणी सुधारण्याची संधि मिळते .
  • आकारीक मूल्यमापन विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देते आणि शिकण्यात सातत्य ठेवते .
  • मुलांच्या विविध कौशल्याचा अभ्यास करता येतो . आकारीक मूल्यमापन मुलांचे संपूर्ण शैक्षणिक विकासासाठी उपयुक्त ठरते .
  • सतत प्रगतीचा आढावा घेऊन त्या विद्यार्थ्याला अधिक मार्गदर्शनाची गरज आहे हे लगेच समजते.
  • प्रत्येक मूल हे वेगळ्या गतीने शिकत असते. आकारीक मूल्यमापन मधून शिक्षकाला प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार अध्ययन करता येते .
  • आकारीक मूल्यमापन मध्ये सहकार्याने शिकण्याची संधी ही प्रत्येकाला मिळत असते . या मुलींमपणात मुलांना चर्चा करून अधीक एकमेकांना मदत होऊ शकते .
  • सतत प्रश्नपत्रिकमुळे शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये सतत संवाद सुरू राहतो. मुलांना येणाऱ्या शंका मूल मोकळ्या पणाने विचारू शकतात . आणि शिक्षकांना त्यांचा प्रतिसाद देण्याची संधि मिळते .

आकारीक मूल्यमापन साठी वर्ग निहाय आणि विषय निहाय प्रश्नपत्रिका मिळवा

लवकरच आपल्या साठी आकारीक मूल्यमापन चाचणी प्रश्नपत्रिका अपलोड करण्यात येतील . सर्व प्रश्न पत्रिका ह्या विद्यार्थ्यांच्या उद्दिष्ट आणि क्षमता विचारात घेऊन तयार करण्यात आल्या आहेत .

DISCLAIMER : आपणास सर्वांना विनंती आहे की ह्या प्रश्नपत्रिका ह्या केवळ आणि केवळ आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या वैयक्तिक वापरासाठी वापरू शकता . अन्यथा कुठेही WHATSAPP ,ब्लॉग , किंवा YOUTUBE साठी कंटेंट तयार करण्यासाठी वापरायची परवानगी देत नाही .

इयत्ता आणि विषय प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा
इयत्ता पहिली भाषा प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता पहिली गणित प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता पहिली इंग्रजी प्रश्नपत्रिका येथे क्लिक
Akarik Mulyamapan Chachani
इयत्ता आणि विषय प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा
इयत्ता दुसरी भाषा प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता दुसरी गणित प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता दुसरी इंग्रजी प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता आणि विषय प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा
इयत्ता तिसरी भाषा प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता तिसरी गणित प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता तिसरी इंग्रजी प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता तिसरी प. अभ्यास प्रश्नपत्रिका येथे क्लिक
Akarik Mulyamapan Chachani
इयत्ता आणि विषय प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा
इयत्ता पहिली भाषा प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता चौथी गणित प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता चौथी इंग्रजी प्रश्नपत्रिका येथे क्लिक
इयत्ता चौथी प. अभ्यास प्रश्नपत्रिका येथे क्लिक

निष्कर्ष :

आकारीक मूल्यमापन प्रश्नपत्रिका ( Akarik Mulyamapan Chachani In Marathi ) ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी एक महत्वाचे आहे . या प्रश्नपत्रिकेद्वारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर पाहणी लक्ष करू शकतो आणि मुलांच्या प्रगतीनुसार शिक्षणाची पद्धत सुधारू शकतो . आकारीक मूल्यमापन हे मुलांच्या समग्र विकासात भर पडते.

हेही वाचा :

वर्णनात्मक नोंदी पाहण्यासाठी येथे क्लिक करा .