9 August Adivasi Divas | 9 ऑगस्ट आदिवासी दिवस माहिती 

9 August Adivasi Divas: दरवर्षीप्रमाणेच ९ ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो संयुक्त राष्ट्र संघाने म्हणजेच युनोने 1994 मध्ये आदिवासी दिवस घोषित केला होता .जो आज जगभरातील आदिवासी समाजांच्या हक्काचे रक्षण आणि त्यांच्या सांस्कृतिक ओळखीच्या जतनासाठी समर्पित आहे

 भारतात आदिवासी समाजाचा मोठा इतिहास आहे विविध बोलीभाषा यांसारख्या विविध जमातींनी आपली अनोखी संस्कृती आणि परंपरा आजपर्यंत जपत आलेले आहेत आदिवासी लोकांचे लोकगीत, नृत्यकला, भाषा आणि जीवनशैली तसेच औषध शास्त्र या सर्वांचा वारसा भारताला समृद्ध आहे. 

 जागतिक विश्व आदिवासी दिवस या दिवशी आदिवासी हक्क शिक्षण आरोग्य आणि आदिवासी लोकांच्या सामाजिक सशक्तिकरणावर चर्चा होते भारत सरकारने सामाजिक संस्था विविध कार्यक्रमाचे आयोजन करून आदिवासी समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करत असतात

 म्हणून आदिवासी संस्कृतीचे जतन आणि त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी प्रत्येक जणांनी योगदान द्यावे हीच या आदिवासी दिनानिमित्त घेण्यासारखी महत्त्वाची प्रेरणा आहे

विश्व आदिवासी दिवस | Adivasi information in marathi 

९ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस (9 August Adivasi Divas) युनोने घोषित केलेला आहे. संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहाने आदिवासी दिन  आनंदात साजरी केला जातो. नेमकं या दिवसाची विशेषता काय आहे हे आज आपण या लेखातून समजून घेणार आहोत- 

Vishwa Adivasi Diwas | 9 August  जागतिक आदिवासी दिवस (world tribal day )

9 August  हा दिवस आदिवासी बांधव जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करतात. आदिवासी दिवस (world tribal day) हा आदिवासी समुदयांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या सांस्कृतिक वर्षाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो आणि म्हणून  महत्वाचा देखील आहे . 

संयुक्त राष्ट्र यांनी 1994 सालापासून Adivasi divas ची घोषणा केली आहे . त्यानंतर आता आपण दरवर्षी हा 9 August हा दिवस संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहाने , आनंदाने आणि गर्वाने साजरा करतो . 

9 ऑगस्ट आदिवासी दिवस साजरा का करतात? (Adivasi Mahiti Marathi )

  • आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे. 
  •  आदिवासी समाजाच्या परंपरा आणि संस्कृतीची जतन करणे. 
  •  आदिवासी समाजातील शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिक विकासाला अधिक चालना देण्यासाठी. 
  •  आदिवासींच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी. 

हेही वाचा :

आदिवासी पावरा भाषा शिका मराठीत

Adivasi Divas History In Marathi ( आदिवासी दिवसाचा इतिहास )

संयुक्त राष्ट्रसंघ ने 1994 रोजी 9 august हा दिवस जागतिक स्तरावर मुळनिवासी म्हणजेच indigenous people यांच्या अधिकारसाठी , संस्कृति जतन करण्यासाठी जाहीर केला. 

संपूर्ण भारतभर आणि जगभरात देखील आदिवासी समाज आपल्या संस्कृति, आपली परंपरा आणि आदिवासी जीवनशैली साठी एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे . 

आपल्या भारतात झारखंड (Jharkhand),  मध्य प्रदेश (Madhya Pradesh),  छत्तीसगड(Chhattisgarh),  ओडिसा (Odisha),  गुजरात (Gujarat),  राजस्थान (Rajasthan) व ईशान्यकडील राज्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात आदिवासी लोकसंख्या आढळून येते. 

 या दिवशी ९ ऑगस्ट या दिवशी आदिवासी संमेलन, परिषदा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे विविध ठिकाणी आयोजन केले जाते, जिथे आदिवासींच्या सर्व आरोग्याशी किंवा शैक्षणिक क्षेत्राशी तसेच विविध सामाजिक समस्या संबंधित समस्यावर चर्चा होते.

आदिवासी समाजाबद्दल अधिक माहिती | Adivasi Tribal Information In Marathi 

आपण वरील माहिती पाहिल्याप्रमाणे भारतात अनेक ठिकाणी आदिवासी जमाती आहेत,  त्यापैकी गोंड, संथाल, वारली, कॉल, कोरकू, पावरा, भिल इत्यादी जमाती भारतात आढळतात.

आदिवासी समाज हा प्राचीन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य घटक मानला जातो.  प्रत्येक आदिवासी जमातीची भाषा, कला, परंपरा त्यांचे सण, त्योहार वेगळे असतात. त्यांच्या बोलीभाषा देखील वेगळ्या असतात . त्यांच्या बोलीभाषेमध्ये प्रत्येक राज्याच्या भाषेवर प्रभाव झाल्याचे आढळून येते .

आदिवासी समाजाचे वैशिष्ट्य काय आहे? ( 9 August Adivasi Divas )

  •  निसर्ग अशी जवळीक आहे – पुरातन काळापासूनच आदिवासी लोक जंगल नद्या आणि पर्वत यांच्यासोबत एक वेगळेच नाते  जपताना दिसतात.
  •  स्वतःची संस्कृती आणि परंपरा आहे –  आदिवासी लोकांची आपली नृत्य लोकगीते हस्तकला आणि विशेष सण ( होळी, पोळा ) हे आदिवासी संस्कृतीचे वेगळे घटक आहेत.
  •  परंपरागत ज्ञान आणि औषध शास्त्र आहे-  आदिवासी लोक जंगलातील वनस्पती आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर करून आदिवासी पारंपारिक औषधशास्त्र वैद्यकीय उपचार आजही करताना दिसून येतात.
  • भाषा – भिल, gondi , कोरकू, वारली, पावरा इत्यादि 

आदिवासी दिवसाचे महत्त्व काय आहे? 

 मित्रांनो,  9 ऑगस्ट हा देशभर “जागतिक आदिवासी दिन” म्हणून साजरा केला जातो. खरं तरआदिवासी दिवस आदिवासी समुदायांच्या हक्क संस्कृती आणि योगदानाची आठवण करून देतो. भारत देशातील विविध आदिवासी गटांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकार आणि संस्था विविध कार्यक्रम आयोजित करतात. 

वरील माहिती पाहिल्याप्रमाणे , भारतात दहा कोटींपेक्षा जास्त आदिवासींची लोकसंख्या आहे. आता महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी गट व जिल्हे  कोणते आहेत ते आपण पाहूयात, (9 August Adivasi Divas)

धुळे नंदुरबार जिल्ह्यात भिलाऊ बोलीभाषा बोलली जाते,  पालघर आणि ठाणे जिल्ह्यात वारली बोली भाषा, रायगड आणि रत्नागिरी या ठिकाणी कोळी बोली भाषा बोलली जाते आणि गडचिरोली व  चंद्रपूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने गोंड बोली भाषा मोठ्या प्रमाणात बोलली जाते. 

आदिवासी समाज गट  आदिवासी समाज आढळणारे प्रमुख जिल्हे
भिलधुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा
वारलीपालघर जिल्हा, ठाणे जिल्हा
कोळी रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा
गोंडगडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा

आदिवासी समाजासाठी सरकारी योजना कोणकोणत्या आहेत? 

आदिवासी समाजासाठी भारत सरकारने विविध सरकारी योजना राबवून दिल्या आहेत. त्यापैकी काही महत्त्वाच्या सरकारी योजना खालील प्रमाणे देण्यात आलेल्या आहे.

  1.  ई – श्रम पोर्टल-  आदिवासी कामगारांचे नोंदणीकरण करण्यासाठी. 
  2.  वन धन योजना-  जंगल उत्पादनांचा व्यवसाय करण्यासाठी. 
  3.  आदिवासी शिक्षण विकास-  मोफत शिष्यवृत्तीसाठी.
  4. पीएम जनमान  योजना – आदिवासी युवकांना रोजगार

आदिवासी समाजाची विशेषता किंवा विशेष घटक

 मित्रांनो, आदिवासी समाजाची एक वेगळीच विशेषता आहे,  कारण आदिवासी समुदायातील सर्व आदिवासी बांधव विशेष घटक कला नृत्य सण धर्म यामध्ये वेगळेपण दिसून येते.  त्यांची अधिक माहिती खालील प्रमाणे.- 

  • कला – आदिवासी लोकांची वारली चित्रकला व गोंडकला प्रसिद्ध आहे.
  •  नृत्य – आदिवासींचे धनगर नृत्य कोळी नृत्य आणि भिल नृत्य प्रसिद्ध आहे. 
  •  सण –  पोळा , भुलाबाई, हरियाली यांसारखी सणे महत्त्वाची असतात.
  • धर्म – आदिवासी समाज हा निसर्ग पूजक असून (वृक्ष, नदी, डोंगर यांची पूजा करतात. )

आदिवासी समाजाच्या विविध समस्या 

मित्रांनो, विचार केला तर आजही आदिवासी समाजाला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. परंतु महत्त्वाच्या अशा समस्या आहेत ज्या आज आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत- 

  • नेहमी रोजगाराची अनिश्चितता
  •  जमीन हक्काचे विविध प्रश्न
  •  शिक्षणाचा मोठ्या प्रमाणात अभाव
  •  जंगल कायद्यामुळे मर्यादा 

निष्कर्ष : Conclusion  

९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस (9 August Adivasi Divas ) साजरा करण्यापूरता नाही, तर आदिवासी समाजाच्या सर्व अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी देखील आहे . आपण सर्वांनी मिळून आदिवासी यांचे हक्क, परंपरा आणि संस्कृति या सर्वांचे संरक्षण करणे आवश्यक आहे .

मित्रांना आदिवासी समाज हा भारताच्या समृद्ध वर्षाचा अविभाज्य असा घटक भाग आहे आदिवासींच्या परंपरा आणि जीवनशैलीत संपूर्ण निसर्गाशी असलेली अनोळखी नाते दिसून येते.

 परंतु आजही त्यांना अनेक सामाजिक आर्थिक शैक्षणिक समस्या आव्हानांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.  त्यामुळे आदिवासींच्या हक्कासाठी अनेक प्रगतीसाठी प्रयत्न करणे ही आपली एक जबाबदारी आहे.

या विशेष जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपण आदिवासी समाजाच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. एकता समता आणि प्रगती या तत्त्वावर आधारलेली समाज व्यवस्था टिकवण्यासाठी प्रत्येक जणांनी पुढाकार घ्यायला हवा! 

या विशेष दिनाच्या निमित्ताने आपण आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अधिक प्रयत्न करण्याचा संकल्प करूया. “एकता, समता आणि प्रगती” या तत्त्वांवर आधारलेली समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा!

Leave a Comment